chocolate
आपला भारत देश विविध सणांनी आणि उत्सवांनी भरलेला देश आहे. सर्व धर्म, सांप्रदायाचे उत्सव आपण आनंदात आणि उत्साहात साजरे करते. त्याचप्रमाणे आजचा दिवसही विशेष आहे. तुम्हाला गोड खायला फार आवडत असेल तर आजचा हा खास दिवस तुमच्यासाठीच आहे असे समजा. आज 7 जुलै, आजचा हा खास दिवस जगभरात चॉकलेट डे म्हणून साजरा केला साजरा केला जातो. आजचा हा दिवस आपल्या प्रियजनांना चॉकलेट दिवसाच्या शुभेच्छा आणि निरनिराळे चॉकलेट देऊन साजरा करण्यात येतो.
आजचा हा खास दिवस असाच वाया घालवू नका. या दिवशी काही खास करूयात आपल्या जिवाभावाच्या व्यक्तींना काही गोड भेट देऊयात. आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वोत्तम चॉकलेटविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. हे चॉकलेट तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तींना भेट देऊन त्यांचा दिवस खास बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात या लिस्टमध्ये कोणत्या चॉकलेटचा समावेश आहे.
न्यूटेला स्लॅब संडे ( Nutella Slab Sundae )
जागतिक चॉकलेट दिनानिमित्त तुम्ही आपल्या प्रियजनांना बास्कीन रॉबिनचा ‘न्यूटेला स्लॅब संडे’ गिफ्ट करू शकता. मऊ ब्राउनी क्लासिक व्हॅनिला आइस्क्रीमच्या स्लॅबसह शीर्षस्थानी मखमली न्युटेला आणि कुरकुरीत हेझलनट प्रॅलिनसह पेश केलेला हा पदार्थ तुमचा दिवस बनवून जाईल. तोंडात विसरघळणारी मऊ ब्राउनी आणि त्यावरील रिच चॉकलेटची चव कधीही न विसरण्यासारखी आहे. याची किंमत आहे 195 रुपये इतकी आहे.
स्वस्तात मस्त अशी चॉकलेट शोधत असाल तर हा एक तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. बास्कीन रॉबिन हा चॉकलेट बार अगदी कमी किमतीत रिच फ्लेव्हर देऊन जातो. सर्व चॉकलेट प्रेमींनी एकदा तरी याचा आस्वाद नक्की घ्यावा. चॉकलेट मूस आइस्क्रीम, ब्राउनी केकचे तुकडे आणि मिल्क चॉकलेटमध्ये कॅरमेलने पेश केला जाणारा हा बार तुमचे सर्व टेन्शन विसरायला लावेल. यात कोणतीही भेसळ नाही, गडबड नाही आहे तर फक्त शुद्ध चॉकलेट. याची किंमत आहे 85 रुपये.
जर तुम्हाला डार्क चॉकलेट आवडत असेल आणि तुम्हाला एक उत्कट अनुभव घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला कॅडबरी बॉर्नव्हिल रिच कोको 70% डार्क चॉकलेट बार घेण्याचा सल्ला देतो. उत्कृष्ट कोकोपासून तयार केलेले, हे प्रीमियम डार्क चॉकलेट उत्तम आणि आनंददायी आहे. या चॉकलेटची केवळ चवच चांगली नाही तर हे आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. हा चॉकलेट बार विविध प्रकारात उपलब्ध होतो त्यामुळे याचे अनेक फ्लेवर्स तुम्ही एक्सप्लोर करू शकता. यातील रिच कोको डार्क चॉकलेट 80 ग्रॅम बारची किंमत आहे 110 रुपये.
जगभरात प्रसिद्ध फेरेरो रोचरची बातच निराळी. तुम्हाला चॉकलेट डे निमित्त कोणाला काही खास गिफ्ट करायचे असल्यास आणि तुमच्याकडे चांगले बजेट असल्यास तुम्ही नक्कीच फेरेरो रोचरचा विचार करू शकता. यात तुम्हाला संपूर्ण हेझलनट क्रीमी चॉकलेट फिलिंग, कुरकुरीत वेफर, मिल्क चॉकलेट , रोस्टेड हेझलनट आणि शेवटी रिच चॉकलेटचा शेवटच्या थर मिळतो. हे चॉकलेट बॉल्सची चव स्वर्गसुखासारखी वाटते. याचा रिच फ्लेव्हर तुम्ही कधीही विसरू शकणार नाहीत. याच्या 50g चॉकलेट बॉक्सची किंमत आहे 152 रुपये.
स्लिक चॉकलेटचे प्रेमी असाल तर तुमच्यासाठी हे चॉकलेट परफेक्ट आहे. हे दूध आणि कोकोने भरलेले स्मूथ आणि रिच चॉकलेट तुम्हाला आनंदमय करेल. याला रिच चॉकलेट, मलईदार दूध आणि कुकीजचे तुकडे यासर्वांचा मेळ घालून बनवण्यात आले आहे. तोंडात घालताच क्षणार्धात विरघळणारा हा चॉकलेट बार कोणाचाही राग शांत करण्यात सराईत आहे. गिल्टी प्लेजरचे उत्तम उदाहरण म्हणजे हे चॉकलेट. याच्या 30g बारची किंमत आहे 45 रुपये.