Weight Loss Tips: हसत-खेळत वजन होईल कमी, डाएटचीही गरज नाही; फक्त 'या' टिप्स फॉलो करा
चुकीची जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे लठ्ठपणाची समस्या आता सामान्य झाली आहे. आजच्या काळात अधिकतर लोक हे लठ्ठपणाने त्रासलेले आहेत. एकदा का आपले वजन वाढले की मग ते कमी करणे फार कठीण असते अशात लोक अनेक वेगवगेळ्या उपायांनी आपले वजन कमी करू पाहतात. बऱ्याचदा यासाठी डाएटचा पर्याय निवडला जातो. पण डाएटचा पर्याय सर्वांना जमतोच असे नाही. कधी कधी असेही होते की, आपण डाएट करण्याचा प्रयत्न तर करतो मात्र सारखी सारखी लागणारी भूक आपल्याला खाण्यावर नियंत्रण ठेवू देत नाही.
नारळपाणी की उसाचा रस… उन्हाळ्यात कोणते पेय आहे आरोग्यासाठी फायदेशीर? आजच जाणून घ्या
आम्ही तुम्हाला सांगतो की, फक्त डाएट आणि व्यायामच नाही तर काही सोप्या टिप्स फॉलो करूनही तुम्ही घरच्या घरी तुमचे वजन कमी करू शकता. यासाठी फार काही करण्याचीही गरज नाही, तुम्ही दैनंदिन दिनचर्येत काही शारीरिक हालचालींचा समावेश करून तुमचे वाढलेले वजन कमी करू शकता. तुम्हाला डान्स करायला आवडत असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरेल. अनेकांना हे ठाऊक नाही पण आपण डान्स करूनही आपले वाढलेले वजन कमी करू शकतो. चला हे कसे करायचे आणि याचे फायदे काय ते सविस्तर जाणून घेऊया.
मेटाबॉलिजम बूस्ट करा
जर तुम्ही दररोज डान्स सुरुवात केली तर तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम वाढण्यास सुरुवात होईल. कंटाळवाण्या व्यायामाऐवजी, तुम्ही मजेदार डान्सच्या मदतीने तुमच्या शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी वितळून काढू शकता. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की दररोज अर्धा तास डान्स केल्याने सुमारे १५० ते २०० कॅलरीज बर्न होऊ शकतात.
वेगवेगळ्या डान्स फॉर्मची मदत घ्या
झुम्बा हा डान्सचा प्रकार शरीरातील अतिरिक्त चरबी वितळवण्यासाठीचा एक लोकप्रिय डान्स फॉर्म आहे. हा डान्स नियमितपणे करून तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता. याशिवाय, शरीरातील मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी हिप-हॉप नृत्य प्रकार देखील प्रभावी ठरू शकतो. जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर तुम्ही बेली डान्स करू शकता. याशिवाय, वजन कमी करण्यासाठी फ्रीस्टाइल डान्सिंग देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. आरोग्य तज्ञांच्या मते, एरोबिक डान्स फॉर्मच्या मदतीनेही जलद गतीने वजन कमी करता येते.
डान्समुळे तुम्हाला लठ्ठपणाची समस्या दूर करण्यास मदत तर होतेच, शिवाय यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होऊ लागतो. डान्स शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला तुमचा मूड सुधारायचा असेल तर दररोज नाचायला सुरुवात करा. नृत्य तुमच्या हाडांचे आणि स्नायूंचेही आरोग्य मजबूत ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते. तर मग वाट कसली पाहत आहात, आजच तुमच्या दिनचर्येत नृत्याचा समावेश करा आणि निरोगी, आनंदी आयुष्य जगा!
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.