(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळा ऋतू अखेर सुरु झाला आहे आणि या ऋतूत उन्हाच्या उष्ण लाटा देखील आता लोकांना हैराण करत आहेत. उन्हाळा म्हटला की, सूर्याच्या प्रखर उष्णतेत जीवाची नुसती काहिली होते. अनेकांना याकाळात उष्माघाताचा त्रासही होतो. तर चक्कर येणे, डीहायड्रेशन अशा समस्या नव्याने जन्म घेतात. या ऋतूत पाण्याचे सेवन फायदेशीर मानले जाते ज्यामुळे लोक वेगवेगळ्या ड्रिंक्सचा आपल्या आहारात समावेश करतात. यातील काही लोकप्रिय ड्रिंक्स म्हणजे, उसाचा रस आणि नारळ पाणी! उन्हळ्यात या दोन्हींचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते आणि ते आरोग्यासाठी फायद्याचेही ठरते मात्र या दोन्हींपैकी आरोग्यसाठी सर्वात फायदेशीर काय आहे किंवा सर्वोत्तम पर्याय कोणता ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
सकाळची पौष्टीक सुरुवात! मटकीचे घावन कधी खाल्ले आहेत का? चवीला अप्रतिम, घरचेही होतील खुश
उसाचा रस पिण्याचे फायदे
उसाचा रस पूर्णपणे नैसर्गिक आहे, जो शरीराला त्वरित ऊर्जा देतो. याचे सेवन केल्याने शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच यामुळे आपले यकृत निरोगी राहण्यास देखील मदत होते. उन्हाळ्यात उसाचा रस शरीराला थंडावा देतो आणि तो प्यायल्याने उष्माघाताची शक्यता कमी होते. यामध्ये आढळणारे घटक त्वचा चमकदार ठेवण्यास आणि शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे
उन्हाळ्यात नारळ पाणी पिल्याने आपल्या शरीरात डीहायड्रेशनची समस्या जाणवत नाही. हे पचन सुधारण्यास आणि आम्लता कमी करण्यास देखील मदत करते. वजन कमी करायचे असल्यास तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाण्याचे सेवन करू शकता. यात कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यात मदत होते. यासोबतच, नारळाचे पाणी रक्तदाब संतुलित ठेवण्यास देखील मदत करते.
उन्हाळ्यात केस सतत गळतात? केसांच्या वाढीसाठी ‘या’ तेलाचा नियमित करा वापर, केस होतील मजबूत
कोणते पेय आहे अधिक फायदेशीर?
नारळ पाणी आणि उसाचा रस या दोन्हीचे स्वतःचे असे फायदे आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यातील कोणताही पर्याय निवडू शकता. जर तुम्हाला त्वरित उर्जेची आवश्यकता असेल तर तुम्ही उसाचा रस पिऊ शकता, परंतु जर तुम्हाला तुमचे शरीर हायड्रेट करायचे असेल तर तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता. मधुमेह असलेल्या लोकांनी नारळाच्या पाण्याचे सेवन केले तर त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि उष्णतेपासूनही आराम मिळेल. उसाच्या रसात मात्र साखरेचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन टाळावे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.