Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधी कायमची होईल नष्ट! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल रोल-ऑन

काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 24, 2026 | 10:08 AM
काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधी कायमची होईल नष्ट! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल रोल-ऑन

काखेत वाढलेला काळेपणा आणि दुर्गंधी कायमची होईल नष्ट! स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल रोल-ऑन

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्यासह वर्षाच्या बाराही महिने शरीराला खूप जास्त घाम येतो. घामावाटे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. शरीराला घाम येणे ही नैसर्गिक क्रिया आहे. पण बऱ्याचदा चारचौघांमध्ये गेल्यानंतर शरीराला घामाची दुर्गंधी येते. तर काहीवेळा खूप जास्त लाजिरवणाऱ्यासारखे वाटते. काखेत वाढलेला काळेपणा, घामामुळे शरीराला येणारा दुर्गंधीचा वास महिलांना खूप जास्त त्रासदायक वाटतो. काखेमध्ये वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी महागड्या क्रीम आणून लावल्या जातात. पण वारंवार चुकीच्या केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होते आणि काखेतील त्वचेवर काळेपणा आणखीनच वाढतो.(फोटो सौजन्य – istock)

उन्हामुळे हातापायांवर टॅनिंग वाढले आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पहा, आठवडाभरात त्वचेवर येईल चमकदार ग्लो

काखेत वाढलेले दुर्गंधी आणि काळेपणा कमी करण्यासाठी काहीवेळा महिला बाजारातील महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. या ट्रीटमेंट केल्यामुळे काहीकाळ त्वचा अतिशय उजळदार दिसते. पण कालांतराने त्वचा पुन्हा एकदा काळी होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून नॅचरल रोल-ऑन बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या नॅचरल रोल-ऑनच्या वापरामुळे काखेत वाढलेला काळेपणा कमी होण्यासोबतच दुर्गंधीच्या त्रासापासून कायमची सुटका मिळेल. केमिकल रसायनाच्या वापरामुळे काखेतील त्वचेची छिद्र बंद होऊन जातात. ज्याच्या परिणामामुळे काखेतील त्वचा काळी पडणे, खाज सुटणे किंवा गाठी तयार होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

नॅचरल रोल-ऑन बनवण्याची कृती:

रोल-ऑन बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये गुलाब पाणी घेऊन त्यात तुरटीचा छोटा तुकडा घालून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर तुरटी पूर्णपणे विरघळल्यावर ताज्या कोरफडीचा गर घालून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात पेपरमिंट ऑइल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण काहीवेळ तसेच ठेवून नंतर बाटलीमध्ये भरून ठेवा. तयार केलेला स्प्रे दिवसभरातून दोनदा नियमित काखेत मारल्यास काही दिवसांमध्येच फरक दिसून येईल. तुरटीच्या स्प्रेमुळे काखेत जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल आणि त्वचा उजळदार दिसेल.

कॉफी आणि दारूचं नाही तर… हेल्दी म्हणून खात असलेले ‘हे’ पदार्थही उन्हाळ्यात वाढवतात डिहायड्रेशनची समस्या

त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर कायमच केमिकल युक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा उजळदार दिसते. तुरटीमध्ये असलेले नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म घामाच्या वासापासून सुटका मिळवून देतात. तुरटीमध्ये असलेल्या घटकांमुळे काखेत जमा झालेले विषाणू नष्ट होण्यास मदत होते. कोरफड जेल काखेतील त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करते. पेपरमिंट ऑइलच्या वापरामुळे त्वचेमध्ये थंडावा टिकून राहील आणि काखेत वाढलेला काळेपणा कमी करण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Darkness and bad smell in the armpits will disappear forever make natural roll ons using these ingredients in the kitchen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • home remedies
  • how to get glowing skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच
1

काळवंडलेल्या त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! १० रुपयांच्या ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच बनवा ब्लीच

चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग जास्वदींच्या फुलांमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल देखणी
2

चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग जास्वदींच्या फुलांमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल देखणी

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट
3

केसांची मूळ कमकुवत झाली आहेत? मग ‘या’ हिरव्या पानांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल आयुर्वेदिक तेल, केस होतील घनदाट

जपानी महिलांप्रमाणे पांढरीशुभ्र त्वचा हवी आहे? मग घरीच तयार करा Japanese Night Cream, त्वचेवर येईल ग्लो
4

जपानी महिलांप्रमाणे पांढरीशुभ्र त्वचा हवी आहे? मग घरीच तयार करा Japanese Night Cream, त्वचेवर येईल ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.