
Vitamin B12 च्या कमतरतेमुळे शरीरातील नसा होतील कमजोर, शरीरात दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास नसा होतील निकामी
विटामिन बी १२ ची पातळी कशामुळे कमी होते?
विटामिन बी १२ च्या कमतरतेचा कोणत्या अवयवांवर परिणाम दिसतो?
विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची आवश्यकता असते. लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि मज्जासंस्थेचे कार्य योग्य चालू राहण्यासाठी शरीरात विटामिन बी १२ ची पातळी योग्य प्रमाणात असणे फार आवश्यक आहे. पण धावपळीच्या जीवनशैलीचा आरोग्यावर परिणाम झाल्यानंतर शरीराचे कार्य बिघडून जाते. शरीरात असंख्य बदल जाणवू लागतात. आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण करतो. थकवा, अशक्तपणा, हातपायांना मुंग्या येणे, विसरभोळेपणा यांसारखी लक्षणे विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर दिसू लागतात. पण सामान्य समस्या समजून याकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.(फोटो सौजन्य – istock)
Summer Tips: उन्हाळ्यात माठातले पाणी का प्यावे? माठातले पाणी पिण्याआधी घ्या ‘या’ गोष्टींची काळजी
विटामिन बी १२ च्या कमतरतेचा परिणाम मेंदू, नस, हृदय आणि डोळ्यांवर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे योग्य वेळी रक्त तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करून तुम्ही विटामिन बी १२ ची कमी झालेली पातळी वाढवू शकता. शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी विटामिन बी १२ शरीरात असणे फार आवश्यक आहे. शरीराला दररोज साधारण २.४ मायक्रोग्राम बी १२ ची आवश्यकता असते. पण रक्तातील विटामिन बी १२ ची पातळी कमी झाल्यानंतर शरीरावरच नाहीतर मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम दिसू लागतात. शरीरात दिसून येणारी लक्षणे वेळीच न ओळखल्यास मज्जासंस्था, नसांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे शरीराला आवश्यक तेवढे ऑक्सिजन मिळत नाही. ज्यामुळे शरीरात कायमच थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अशक्तपणा वाढल्यामुळे कोणतेही काम करण्याची अजिबात इच्छा होत नाही. तसेच मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यामुळे हातापायांत सुया टोचल्यासारख्या वेदना होतात. तर काहीवेळा मांडीमध्ये झिणझिण्या किंवा भाजल्यानंतर त्वचा जळते तसा त्रास होऊ लागतो. तसेच विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे जिभेवर सूज येणे, फोड येणे, छाले पडणे, जीभ लाल होणे इत्यादी स्पष्ट लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे जिभेला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा न झाल्यामुळे दिसू लागतात.
विटामिन बी १२ ची कमतरता निर्माण झाल्यानंतर मेंदू, मज्जासंस्था, हृदय, डोळे आणि पचनसंस्थेवर परिणाम दिसू लागतो. त्यामुळे शरीरात दिसून येणारी लक्षणे वेळीच ओळखणे फार आवश्यक आहे. विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे नसांवरील संरक्षक आवरण कमकुवत होऊन जातो. रक्तातील होमोसिस्टीनची पातळी वाढून कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. बद्धकोष्ठता, अपचन किंवा ऍसिडिटी वारंवार होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
Ans: सतत थकवा आणि अशक्तपणा, स्मरणशक्ती कमी होणे किंवा गोंधळलेले वाटणे.
Ans: दूध, दही, पनीर आणि ताक फोर्टिफाइड अन्न (जसे की फोर्टिफाइड सोया दूध, तृणधान्ये)
Ans: मुख्यत्वे शाकाहारी आहार किंवा शरीराद्वारे बी-१२ शोषण्यास असमर्थता