सकाळी उठल्यानंतर तोंड कडू झाल्यासारखे वाटते? अॅसिडिटी की लिव्हरसंबंधित आजार? कडवटपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय
तोंडातील लाळेत कडवटपणा कशामुळे वाढतो?
लिव्हरचे आजार झाल्यानंतर लाळेची चव का बिघडते?
तोंडात वाढलेला कडवटपणा कमी करण्यासाठी उपाय?
सकाळी उठल्यानंतर बऱ्याचदा आरोग्यासंबंधित आजारांची लक्षणे शरीरात दिसून येतात. पण या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. सतत दुर्लक्ष केल्यामुळे शरीरसंबंधित आजार वाढतात आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. सकाळी उठल्यानंतर सामान्यपणे तोंडात कडूपणा जाणवतो. तोंडात कडवट लाळ जमा झाल्यामुळे पाणी प्यायल्यानंतर सुद्धा तोंड कडू झाल्यासारखेच वाटते. अॅसिड रिफ्लक्स, लिव्हरचे आजार, ड्राय माऊथ, मधुमेह किंवा काही औषधांचे सेवन केल्यामुळे तोंडात कडवटपणा जाणवू लागतो. तोंडाची चव बिघडल्यानंतर बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. शरीराची पचनसंस्था बिघडल्यानंतर तोंडातून दुर्गंधीचा वास येऊ लागतो. दैनंदिन आहारात होणारे बदल, पाण्याची कमतरता आणि योग्य वेळी उपचार न घेतल्यामुळे तोंडातील लाळेत इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर तोंडात कडवटपणा कशामुळे जाणवतो? यावर कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
फ्रिजशिवाय देखील पाणी राहील खूप वेळ थंड! स्वयंपाकघरातील माठासाठी वापरा ‘या’ सोप्या ट्रीक्स
तोंडाची चव बिघडण्याच्या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘डिस्ग्युसिया’ असे म्हंटले जाते. रात्री झोपेत लाळेची निर्मिती कमी झाल्यानंतर तोंडातील बॅक्टेरिया सक्रिय होतात आणि तोंडाची चव पूर्णपणे बिघडून जाते. जर नेहमीच तुमच्या तोंडात कडवटपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावेत. शरीरामध्ये अंतर्गत पित्त किंवा अॅसिड रिफ्लक्स झाल्यानंतर पोटातील पाचक रस चुकीच्या दिशेने प्रवास करतात, ज्यामुळे जिभेची चव बिघडण्याची शक्यता असते. सकाळी उठल्यानंतर तोंडात कडवट लाळ जमा झाल्यास कोणताही पदार्थ खाण्याची अजिबात इच्छा होत नाही.
लिव्हर शरीरात जमा होणारे विषारी घटक बाहेर काढून टाकण्याचे आणि पित्त तयार करण्याचे काम करतो. पण फॅटी लिव्हर, पित्ताशयातील खडे किंवा लिव्हरला सूज आल्यामुळे शरीरातील पित्ताचे अभिसरण वाढू लागते. रक्तातील बिलीरुबिनचे प्रमाण वाढल्यामुळे लाळेवाटे कडवटपणा बाहेर पडू लागतो. ज्यामुळे काहीवेळा तोंड कडू लागणे, डोळे पिवळे पडणे, लघवीचा रंग पिवळा गडद होणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागतात. लिव्हरसबंधित आजारांची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य वाटणारी लक्षणे दिसतात. पण कालातंराने लक्षणे वाढतात.
अँटी-बायोटिक्स, रक्तदाबाची औषधे, लिथियम किंवा मल्टिव्हिटॅमिन्स इत्यादी औषध शरीरातील आवश्यक विटामिन शोषून घेतात. तर काहीवेळा औषध तोंडातील लाळेची चव पूर्णपणे बिघडून टाकतात. पाणी प्यायल्यानंतर सुद्धा कडवटपणा जाणवू लागतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे लाळेमध्ये ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढू लागते. मधुमेहामुळे होणाऱ्या ‘कीटोॲसिडोसिस’ या स्थितीमध्ये श्वासाला फळांसारखा गोड किंवा काहीवेळा तोंडातील लाळेमध्ये कडवटपणा जाणवू लागतो.
तोंडात जमा होणाऱ्या कडवट लाळेपासून सुटका मिळवण्यासाठी दात घासणे किंवा माउथवॉशचा वापर करून काहीच फरक पडणार नाही. याशिवायदिवसभरात चार लिटर पेक्षा जास्त पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात पुरेशी लाळ तयार होते आणि तोंडातील बॅक्टेरियांची वाढ होत नाही. तसेच रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे तोंडात कोरडेपणा वाढत नाही. तसेच जेवण आणि झोपेमध्ये तीन तासांचे अंतर असावे. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होईल.






