Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fruits Affects Dental Health: लिंबू, संत्री खाण्याची आवड दातांना पडू शकते महागात! ॲसिडिक फळे खाताना ‘या’ चुका टाळा

Acidic fruits cause tooth enamel erosion: दातांना निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या फळांचे सेवन करताना काळजी घ्यावी, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 10, 2026 | 07:25 PM
Photo- yandex

Photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • फळे दातांचे नुकसान करू शकतात?
  • लिंबू, द्राक्षे अन् अननसामुळे दातांची झीज?
  • जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी
दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तोंडाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञ प्रत्येकाला दिवसातून दोनदा व्यवस्थित दात घासण्याचा आणि गोड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला देतात. परंतु, दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हे उपाय पुरेसे नाहीत. तुम्ही दररोज काय खाता आणि पिता याचाही तुमच्या दातांच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो.

अनेक लोक चांगल्या आरोग्यासाठी फळांचे (fruits) सेवन वाढवतात, लिंबू पाणी पितात किंवा ताज्या फळांचा रस पितात. या पदार्थांमधून शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे मिळतात, परंतु काही पदार्थांमधील आम्ल दातांच्या संरक्षक थराला नुकसान पोहोचवू शकते. दातांच्या या बाहेरील थराला इनॅमल म्हणतात. दातांचे संरक्षण करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका असते. जेव्हा अॅसिडच्या संपर्कामुळे इनॅमल कमकुवत होते, तेव्हा दात गरम, थंड किंवा गोड पदार्थांप्रति संवेदनशील होऊ शकतात. जर हे दीर्घकाळ चालू राहिले, तर दातांच्या मजबुतीवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणती फळे खाताना काळजी घेतली पाहिजे, जाणून घेऊयात. (Acidic fruits cause tooth enamel erosion)

Dental Health: रोजच्या ‘या’ सवयींमुळे दात होतात खराब; वेळीच टाळा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

कोणती फळे सर्वात अॅसिडिक आहेत?

अन्नातील अॅसिडचे प्रमाण त्याच्या PH मूल्यावरून मोजले जाते. युनायटेड स्टेट्स एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शन एजन्सी (EPA) नुसार, ज्या पदार्थांचा PH 7 पेक्षा जास्त असतो ते अल्कलाइन  मानले जातात, तर ज्यांचा pH 7 पेक्षा कमी असतो ते अॅसिडिक असतात. PH जितका कमी, तितकी आम्लतेची पातळी जास्त.

  • लिंबाचा रस (२.०० – २.६०)
  • द्राक्षे (२.९० – ३.८२)
  • डाळिंब (२.९३ – ३.२०)
  • ब्लूबेरी (३.११ – ३.३३)
  • अननस (३.२० – ४.००)

अॅसिड दातांना कसे नुकसान पोहोचवते?

वारंवार अॅसिडीक पदार्थांच्या संपर्कामुळे दातांचा बाहेरील थर, म्हणजेच इनॅमल, कमकुवत होऊ शकतो. यामुळे दात लवकर किडतात. यामुळे गरम, थंड किंवा गोड पदार्थ खाताना दातांना मुंग्या आल्यासारखे वाटू शकते. दातांच्या पृष्ठभागावर रंग बदलणे आणि झीज होणे ही देखील याची लक्षणे असू शकतात.तोंडातली लाळ अॅसिड निष्प्रभ करण्यास आणि दातांमधील खनिजे पुन्हा भरण्यास मदत करते. परंतु, सातत्याने अॅसिडयुक्त पदार्थ आणि पेयांचे सेवन केल्याने दात खराब होण्याचा धोका वाढू शकतो.

दाताला निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

व्हिटॅमिन सी शरीरासाठी अत्यावश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होऊ शकतो, ज्यामध्ये हिरड्यांमधून रक्त येते. त्यामुळे, लिंबूवर्गीय फळे खाणे टाळण्याऐवजी, त्यांचे मर्यादित प्रमाणात सेवन करा.

  • लिंबूवर्गीय फळे खाल्ल्यानंतर साध्या पाण्याने चूळ भरा.
  • फळांचा रस दीर्घकाळापर्यंत हळूहळू पिणे टाळा.
  • अॅसिडयुक्त पेये पिताना तुम्ही स्ट्रॉ वापरू शकता.
  • फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरा.
  • तुमच्या दातांचे नुकसान होऊ नये यासाठी तोंडाची चांगली स्वच्छता राखा.
Hair Fall Reasons: केस गळण्यामागे फक्त शॅम्पू-तेल नाही, ‘या’ आरोग्याच्या समस्याही असू शकतात कारणीभूत; एकदा वाचाच

Web Title: Dental health tips acidic fruits damage tooth enamel pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • fruit
  • Fruit juice
  • teeth problems
  • teeth tips

संबंधित बातम्या

Dental Health: रोजच्या ‘या’ सवयींमुळे दात होतात खराब; वेळीच टाळा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान
1

Dental Health: रोजच्या ‘या’ सवयींमुळे दात होतात खराब; वेळीच टाळा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.