Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dholya Ganpati History: वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास

Dholya Ganpati Historyवाईच्या कृष्णा नदीकाठावर सात घाट आहेत. महागणपती मंदिर वाईमधील गणपती आळी घाटावर असून मंदिराच्या समोर काशी विश्वेश्वर मंदिर आहे. ढोल्या गणपतीची स्थापना १७६२ श्री गणपतीराव भिकाजी रास्ते यांनी केली आणि मंदिर उभारले. चला तर जाणून घेऊया वाईच्या ढोल्या गणपतीचा इतिहास.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 13, 2026 | 05:30 AM
वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास

वाईचा प्रसिद्ध ढोल्या गणपती! कधी झाली स्थापना, जाणून घ्या सविस्तर इतिहास

Follow Us
Follow Us:

Dholya Ganpati History: वाई हे एक प्राचीन शहर आहे. महाभारताच्या काळात ते ‘विराट नगरी’ म्हणून ओळखले जात असे कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या असंख्य मंदिरांमुळे या शहराला ‘मंदिरांचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. वाईमध्ये कृष्णा नदीच्या काठावर सात घाट आहेत, ज्यामुळे या शहराला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

‘हनुमान अंश’ पाहून ‘कैंची धाम’ला जाण्याचा विचार करत आहात? मग आधी वाचा संपूर्ण Travel Guide

वाईच्या ढोल्या गणपतीचा इतिहास:

इथेच वसले आहे महागणपती मंदिर किंवा ढोल्या गणपती मंदिर. महागणपती मंदिर वाईमधील गणपती आळी घाटावर वसलेले आहे. या मंदिराच्या समोर काशी विश्वेश्वर मंदिर आहे. गणपतीची ही विशाल मूर्ती एकाच काळ्या पाषाणातून कोरलेली आहे, ज्या पाषाणातून काशी विश्वेश्वर मंदिरातील नंदीची मूर्ती बनवली आहे. हे मंदिर १७६२ मध्ये श्री गणपतीराव भिकाजी रास्ते यांनी बांधले होते असे सांगण्यात येते. वैशाख शुक्ल पक्ष त्रयोदशी १६९१ अर्थात १७६९ मध्ये या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे भव्य मंदिर निर्माण कऱण्यासाठी साधारण १० वर्ष लागले होते आणि याशिवाय १५ लाख रुपयांचा खर्चही झाला होता असं सांगण्यात येतं.

बाप्पाच्या मूर्तीचा इतिहास:

कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या मंदिरांपैकी, वाईमधील सर्वात लोकप्रिय मंदिर म्हणजे ढोल्या गणपती मंदिर. ही मूर्ती १० फूट उंच आणि ८ फूट रुंद आहे. मराठीत ‘ढोल्या’ म्हणजे प्रचंड किंवा जाड, म्हणूनच याला ‘ढोल्या’ म्हटले जाते. गणेशाची मूर्ती बसलेल्या स्थितीत असून ती अत्यंत आनंदी आणि सकारात्मक दिसते. दरम्यान ही मूर्ती लहान होत आहे असाही समज दिसून येत आहे.

Parelcha Raja: भव्यदिव्य मूर्ती आणि समाजकल्याणकारी उपक्रम, परेलचा राजा इतिहास

या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या मागील बाजूस असलेला ‘माशासारखा’ आकार. कृष्णा नदीच्या पुरापासून मंदिराचे संरक्षण करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. मंदिराच्या मागील बाजूस असलेला माशासारखा आकार पाण्याचा प्रवाह विभागून मंदिरावरील दाब कमी करतो, ज्यामुळे मंदिर पुरापासून सुरक्षित राहते. वाईमधील अनेक स्थानिकांचा ठाम विश्वास आहे की या मंदिरात केलेली कोणतीही इच्छा किंवा प्रार्थना अर्थात नवस केला असेल तो हमखास पूर्ण होतो. तुम्ही वाईला गेलात तर इथे नक्की भेट द्या.

Web Title: Dholya ganpati history wais famous dholya ganpati when was it consecrated learn the detailed history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival
  • History

संबंधित बातम्या

World Stroke Day: आज जागतिक स्ट्रोक दिन; जाणून घ्या २९ ऑक्टोबरचा इतिहास..
1

World Stroke Day: आज जागतिक स्ट्रोक दिन; जाणून घ्या २९ ऑक्टोबरचा इतिहास..

Sankashti Chaturthi: गणरायाच्या आशीर्वादाने दूर होतील सर्व विघ्ने! संकष्टी चतुर्थीला प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा
2

Sankashti Chaturthi: गणरायाच्या आशीर्वादाने दूर होतील सर्व विघ्ने! संकष्टी चतुर्थीला प्रियजनांना पाठवा ‘या’ खास शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.