
गणरायाच्या आशीर्वादाने दूर होतील सर्व विघ्ने! संकष्टी चतुर्थीला प्रियजनांना पाठवा 'या' खास मराठमोळ्या शुभेच्छा
Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थी हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथ्या दिवशी विघ्नहर्ता श्रीगणेशाला समर्पित केली जाते. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून बाप्पाला गोड पदार्थांचा किंवा मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. संकष्टी चतुर्थीला या व्रतामुळे घरातील विघ्न, संकट, रोग, आणि आर्थिक अडचणी दूर होतात व सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे. संकष्टी चतुर्थी हे व्रत महिला किंवा पुरुष दोघेसुद्धा करू शकतात. संपूर्ण दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी बाप्पाला महानैवेद्य अर्पण करून त्यानंतरच उपवास सोडला जातो. त्यामुळे तुमच्यासोबतच इतरांचा दिवस सुद्धा आनंद आणि भक्तीमय जाण्यासाठी नातेवाईकांना संकष्टी चतुर्थीच्या या मराठमोळ्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.(फोटो सौजन्य – istock)
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो,
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
फुलांची सुरुवात कळीपासून होते,
जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते,
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते,
गणपती बाप्पा मोरया – संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
संकष्टी चतुर्थी निमित्त,
आपणास आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा..!
तुमच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना,
श्री गणराय पूर्ण करोत..
हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना !
सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होई सर्व काम..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी
तुमच्या मनोकामन पूर्ण होऊ द्या!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो,
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस
संकष्टी चतुर्थी बनवा खास
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
गणपती बाप्पा मोरया!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!
ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
भक्ति गणपती, शक्ति गणपती
सिद्धी गणपती, लक्ष्मी गणपती महागणपती
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा
“संकट कोणतेही असो, ते तारण्यासाठी कायम असतोस तू… विघ्नहर्त्याच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होवोत. गणपती बाप्पा मोरया, संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा!”
“दुर्वांची जुडी, मोदकाचा प्रसाद, बाप्पा तुमच्यावर सदैव करो आशीर्वादाचा वर्षाव! संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!”
“वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा॥ श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळो. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!”
सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!