परेलच्या राजाचा इतिहास (फोटो सौजन्य - Pinterest)
या ऐतिहासिक मंडळाची सुरुवात १९४७ साली झाली. भारताच्या स्वातंत्र्याच्या वर्षी काही स्थानिक गणेश भक्त आणि परेल विभागाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नरे पार्क मैदानावर हा उत्सव सुरू केला. नरेपार्क मैदानात सर्व गणेश कार्यकर्ता एकता येऊन या गणेशोत्सव मंडळाचा वटवृक्ष झाला.
प्रमुख आकर्षणांपैकी एक
हळूहळू या छोट्या प्रयत्नाचे एका विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आणि आज ते मुंबईच्या सर्वात प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या गणपतीला आता परेलचा राजा म्हणून ओळख मिळाली आहे. २०२६ मध्ये आपल्या ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे
या बाप्पाची मूर्ती ही नेहमीच भव्य असते. परळचा राजा त्याच्या भव्य आणि विशाल मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. वेळोवेळी, येथे २३ फूट ते २८ फूट आणि कधीकधी त्याहूनही उंच मूर्ती स्थापित केल्या गेल्या आहेत. मंडळ केवळ भव्य उत्सवच साजरे करत नाही, तर गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक आणि समाजकल्याणकारी उपक्रमांमध्येही सक्रियपणे सहभागी होत आहे. दरवर्षी या गणपतीची मूर्ती वेगवेगळ्या रुपात असते आणि यावर्षी अत्यंत मनमोहक मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. परेलच्या राजाची ही मूर्ती यावर्षी सगळीकडेच चर्चेचा विषय ठरली आहे. मनमोहक डोळे आणि डोक्यावरील टोपी हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलाय.
Khetwadi Ganraj: मुंबईच्या खेतवाडीचा गणराजाचा इतिहास काय? जाणून घ्या गणरायाची रंजक कहाणी
नरेपार्कचा प्रसिद्ध बाप्पा
दरवर्षी, बाप्पाचा दरबार सजवण्यासाठी देशातील प्रसिद्ध मंदिरे किंवा ऐतिहासिक स्मारकांवर आधारित भव्य आणि अनोखे मंडप आणि चित्ररथ तयार केले जातात. अनेकदा लोक परळ भागातील ‘लालबागचा राजा’ आणि ‘मुंबईचा राजा – गणेश गल्ली’ या दोन्ही बाप्पा आणि नरेपार्कच्या बाप्पामध्ये गफलत करतात, परंतु परेलचा राजा अर्थात नरेपार्कच्या बाप्पाची स्वतःची एक वेगळी आणि ऐतिहासिक ओळख आहे. तुम्हीही यावर्षी जाणार का या मूर्तीच्या दर्शनाला? आम्हालाही नक्की कळवा






