Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर तर फक्त निमित्त! ‘या’ वाईट सवयींमुळे होतो मधुमेह; अनेकांना ठाऊकच नाही

Does only sugar cause diabetes: मधुमेह हा फक्त जास्त साखर खाल्ल्यामुळे होत नाही, तर आनुवंशिकता, वाढते वजन, इन्सुलिनची कार्यक्षमता आणि बैठी जीवनशैली यांसारखे अनेक घटक त्यामागे कारणीभूत असतात.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 01, 2026 | 08:34 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • ‘या’ वाईट सवयींमुळे होतो मधुमेह
  • फक्त साखरच कारणीभूत नसते
  • मधुमेहापासून बचावासाठी काय करावे?
मधुमेह हा आजच्या काळातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या जीवनशैलीशी संबंधित आजारांपैकी एक आहे. अनेकांच्या मनात अजूनही असा समज आहे की जास्त साखर खाल्ल्यामुळेच मधुमेह होतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते हा समज पूर्णपणे योग्य नाही. मधुमेह होण्यामागे केवळ साखरेचे सेवन जबाबदार नसून शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता, आनुवंशिकता, वाढते वजन आणि दैनंदिन जीवनशैलतील काही सनयी यांसारख्या गोष्टी महत्त्वाची भूमिका बजावतात.

Stomach Flu: वारंवार पोटात इन्फेक्शन होतंय? ‘ही’ कारणे असू शकतात जबाबदार

फक्त साखरच कारणीभूत नसते

गोड पदार्थ किंवा साखरेचे अतिसेवन वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. वजन वाढल्यामुळे शरीरात इन्सुलिनचा प्रभाव कमी होतो आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. मात्र, फक्त साखर खाल्ल्यामुळेच मधुमेह होतो, असे म्हणणे चुकीचे आहे.

आनुवंशिकतेचाही मोठा प्रभाव

कुटुंबातील आई, वडील किंवा जवळच्या नातेवाईकांना मधुमेह असल्यास हा आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे अशा व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करून रक्तातील साखरेची पातळी तपासत राहणे गरजेचे आहे.

बैठी जीवनशैली ठरते धोकादायक

दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करणे, नियमित व्यायामाचा अभाव आणि शारीरिक हालचाली कमी असणे यामुळे वजन वाढते. त्याचा परिणाम शरीराच्या इन्सुलिन वापरण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो आणि मधुमेहाचा धोका वाढतो.

लठ्ठपणा आणि असंतुलित आहार

जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले अन्न, फास्ट फूड, साखरयुक्त पेये आणि अधिक कॅलरीयुक्त आहार यामुळे लठ्ठपणा वाढतो. विशेषतः पोटाभोवती वाढलेली चरबी मधुमेहासाठी घातक मानली जाते.

ताण आणि अपुरी झोपही कारण ठरू शकते

दीर्घकाळ मानसिक ताण, अपुरी झोप आणि अनियमित दिनचर्या यांचा शरीरातील हार्मोन्सवर परिणाम होतो. त्यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन बिघडण्याची शक्यता वाढते.

मधुमेहापासून बचावासाठी काय करावे?

  • नियमित व्यायाम आणि शारीरिक हालचाली करा.
  • संतुलित, पौष्टिक आणि ताज्या अन्नाचा आहार घ्या.
  • वजन नियंत्रणात ठेवा.
  • गोड पदार्थ आणि साखरयुक्त पेयांचे सेवन मर्यादित ठेवा.
  • पुरेशी झोप घ्या आणि ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
  • नियमित आरोग्य तपासणी करून रक्तातील साखरेची पातळी तपासा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Diabetes causes risk factors prevention beyond sugar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 08:34 PM

Topics:  

  • diabetes
  • Diabetics
  • home remedies for Diabetes

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.