Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Update: लघवीच्या नमुन्यातून मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान! नव्या चाचणीमुळे वैद्यकीय क्षेत्रात आशादायक चित्र

Health Update: स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक मॅक्सिमिलियन डायन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यापेक्षा वेगळा मार्ग निवडला. त्यांनी डीएनएशी संबंधित असलेल्या आरएनए रेणूंच्या विश्लेषणावर भर दिला. आरएनएमुळे शरीरातील कोणती जनुके सक्रिय आहेत आणि कर्करोगाच्या पेशींमध्ये नेमके काय बदल घडत आहेत

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 02, 2026 | 11:40 AM
लघवीच्या नमुन्यातून मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान! नव्या चाचणीमुळे वैद्यकीय क्षेत्रात आशादायक चित्र

लघवीच्या नमुन्यातून मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान! नव्या चाचणीमुळे वैद्यकीय क्षेत्रात आशादायक चित्र

Follow Us
Follow Us:

Health Update: मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान आता केवळ लघवीच्या नमुन्याच्या तपासणीतून करणे शक्य होण्याची आशा निर्माण झाली आहे. लघवीतील आरएनए रेणूंचे विश्लेषण करणाऱ्या नव्या चाचणीच्या माध्यमातून मूत्राशयाचा कर्करोग ओळखण्यात संशोधकांना यश आले आहे. विशेष म्हणजे, कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील रुग्ण ओळखण्यातही ही चाचणी प्रभावी ठरली आहे. हे संशोधन ‘नेचर मेडिसिन’ या प्रतिष्ठित वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.(फोटो सौजन्य – istock)

Liver Damage: लिव्हरसबंधित आजाराच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, हलक्यात घेणे पडेल शरीरासाठी महागात

सध्या कर्करोगाच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या लिक्विड बायोप्सी चाचण्यांमध्ये प्रामुख्याने रक्तातील कर्करोगाच्या पेशींमधून बाहेर पडणाऱ्या डीएनएचा अभ्यास केला जातो. मात्र, स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधक मॅक्सिमिलियन डायन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यापेक्षा वेगळा मार्ग निवडला. त्यांनी डीएनएशी संबंधित असलेल्या आरएनए रेणूंच्या विश्लेषणावर भर दिला. आरएनएमुळे शरीरातील कोणती जनुके सक्रिय आहेत आणि कर्करोगाच्या पेशींमध्ये नेमके काय बदल घडत आहेत, याची माहिती मिळू शकते.

लघवीचा मुत्राशयातील गाठींशी थेट संपर्क

या संशोधनासाठी कर्करोगग्रस्त आणि निरोगी अशा एकूण ५१५ व्यक्तींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये नव्या तंत्रज्ञानाने मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी १०० पैकी ९५ रुग्ण ओळखण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या अवस्थेतील कर्करोगाचे संकेतही या चाचणीतून मिळाले. याशिवाय कर्करोगाचा प्रकार आणि तो पुन्हा उद्भवण्याचा धोका याबाबतही महत्त्वाची माहिती मिळू शकते. लघवीचा मूत्राशयातील गाठींशी थेट संपर्क येत असल्याने कर्करोगाच्या निदानासाठी ती उपयुक्त ठरू शकते, असे संशोधकांचे मत आहे. आता याच तंत्रज्ञानाचा वापर मूत्रपिंड आणि प्रोस्टेटच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठीही करता येतो का, याचा अभ्यास सुरू आहे.

Health Care: थोडस पाणी प्यायल्यानंतर सुद्धा लगेच लघवीला जावे लागते? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर किती पाणी प्यावे

कमी त्रासदायक आणि सोपी पद्धत

भविष्यात मूत्रमार्गाशी संबंधित विविध कर्करोगांचे निदान एकाच लघवीच्या चाचणीतून करण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र, हे तंत्रज्ञान अद्याप प्राथमिक संशोधनाच्या टप्प्यात आहे. नियमित कर्करोग तपासणीसाठी त्याचा वापर करण्यापूर्वी अधिक व्यापक संशोधन आणि वैद्यकीय चाचण्या आवश्यक आहेत. कमी त्रासदायक आणि तुलनेने सोप्या पद्धतीने कर्करोगाचे लवकर निदान करण्याच्या दिशेने हे संशोधन महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लघवीच्या नमुन्यातून मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान करता येते का?

    Ans: होय. लघवीच्या नमुन्याची तपासणी करून त्यामध्ये कर्करोगाशी संबंधित पेशी, प्रथिने किंवा विशिष्ट बायोमार्कर्स शोधता येतात.

  • Que: मूत्राशयाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत?

    Ans: लघवीतून रक्त जाणे, वारंवार लघवीला होणे, लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे आणि लघवी करण्याची तीव्र इच्छा होणे ही काही संभाव्य लक्षणे आहेत.

  • Que: मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी कोणत्या चाचण्या केल्या जातात?

    Ans: युरिन सायटोलॉजी, सिस्टोस्कोपी, बायोप्सी आणि आवश्यकतेनुसार अल्ट्रासाऊंड किंवा सीटी स्कॅन यांसारख्या तपासण्या केल्या जातात.

Web Title: Diagnosing bladder cancer from a urine sample a new test brings a promising outlook to the medical field sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Cancer Awareness
  • Cancer prevention
  • Health Update

संबंधित बातम्या

वयाची ४० वर्ष पूर्ण होण्याआधी महिलांना स्तनाच्या कर्करोगाबद्दल माहित असायला हव्यात ‘या’ गोष्टी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
1

वयाची ४० वर्ष पूर्ण होण्याआधी महिलांना स्तनाच्या कर्करोगाबद्दल माहित असायला हव्यात ‘या’ गोष्टी, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Cancer: तोंडाच्या आतील बदलांकडे दुर्लक्ष नको; सुपारी, पान आणि गुटख्यामुळे वाढतो कर्करोगाचा धोका! वेळीच व्हा सावध
2

Cancer: तोंडाच्या आतील बदलांकडे दुर्लक्ष नको; सुपारी, पान आणि गुटख्यामुळे वाढतो कर्करोगाचा धोका! वेळीच व्हा सावध

Breast Cancer: ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता वाढवण्याची का आहे गरज? जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Breast Cancer: ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता वाढवण्याची का आहे गरज? जाणून घ्या सविस्तर माहिती

ACTREC Navi Mumbai : रक्ताच्या नमुन्यातून कर्करोगाच्या पेशींचा शोध! ‘ऑन्कोडिस्कव्हर’हे नविन तंत्रज्ञान चर्चेत
4

ACTREC Navi Mumbai : रक्ताच्या नमुन्यातून कर्करोगाच्या पेशींचा शोध! ‘ऑन्कोडिस्कव्हर’हे नविन तंत्रज्ञान चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.