Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ACTREC Navi Mumbai : रक्ताच्या नमुन्यातून कर्करोगाच्या पेशींचा शोध! ‘ऑन्कोडिस्कव्हर’हे नविन तंत्रज्ञान चर्चेत

ACTREC Navi Mumbai : नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या अॅक्टरेक येथे आयोजित ‘कॅमो २०२६’ परिषदेत अॅक्टोरियस इनोव्हेशन्स अँड रिसर्च कंपनीने ‘ऑन्कोडिस्कव्हर’ हे रक्तातील कर्करोगाच्या पेशी शोधणारे तंत्रज्ञान आणि एनजीएस आधारित जनुकीय चाचण्या सादर केल्या.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 27, 2026 | 07:08 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • जनुकीय बदलांचे सविस्तर विश्लेषण 
  • ‘ऑन्कोडिस्कव्हर’ला  मान्यता  
  • प्रतिमांकन चाचण्यांमध्ये कर्करोग दिसत नाही  
ACTREC Navi Mumbai :  कर्करोगाचे निदान, उपचारांची परिणामकारकता आणि आजाराच्या पुनरागमनाचा धोका यांचा अधिक अचूक मागोवा घेण्यासाठी रक्ताच्या नमुन्यावर आधारित आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या प्रगत कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण केंद्रात (अॅक्टरेक) आयोजित ‘कॅमो २०२६’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत अॅक्टोरियस इनोव्हेशन्स अँड रिसर्च कंपनीने ‘ऑन्कोडिस्कव्हर’ हे रक्तातील कर्करोगाच्या पेशी शोधणारे तंत्रज्ञान आणि पुढील पिढीतील जनुकीय क्रमविश्लेषणावर आधारित (एनजीएस) चाचण्या सादर केल्या.

या दोन्ही तंत्रज्ञानांच्या एकत्रित वापरामुळे कर्करोगाशी संबंधित पेशी आणि जनुकीय बदलांची माहिती मिळवून उपचारांचे नियोजन अधिक प्रभावी करण्यास मदत होऊ शकते.

जनुकीय बदलांचे सविस्तर विश्लेषण 

कंपनीने सादर केलेल्या एनजीएस चाचण्यांद्वारे कर्करोगाशी संबंधित जनुकीय बदलांचे सविस्तर विश्लेषण करता येते. त्यामुळे रुग्णाच्या आजाराचे स्वरूप लक्षात घेऊन योग्य उपचार निवडणे, उपचार सुरू असताना आजारातील बदलांचे निरीक्षण करणे आणि उपचारानंतर कर्करोगाच्या काही पेशी शिल्लक राहिल्या आहेत का, यासंबंधीचे संकेत शोधणे शक्य होऊ शकते. या चाचण्यांमध्ये सीटी-डीएनए, जी-डीएनए आणि आरएनए या जनुकीय घटकांचे विश्लेषण केले जाते.

‘ऑन्कोडिस्कव्हर’ तंत्रज्ञानाच्या मदतीने रक्तातील अतिशय कमी प्रमाणातील कर्करोगाच्या पेशी शोधणे आणि त्यांची संख्या मोजणे शक्य असल्याचे कंपनीने सांगितले. यासाठी विशेष तंत्रज्ञानासह प्रतिदीप्ती सूक्ष्मदर्शिकेचा वापर केला जातो. जनुकीय चाचण्यांसोबत या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कर्करोगाच्या पेशींविषयी आणि त्यांच्याशी संबंधित जनुकीय बदलांविषयी पूरक माहिती मिळू शकते.

Skin Infection: त्वचेवर लालसरपणा आणि सूज दिसल्यास व्हा सावध! जाणून घ्या संसर्गाची गंभीर लक्षणे

‘ऑन्कोडिस्कव्हर’ला  मान्यता   

डॉ. जयंत खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आलेल्या ‘ऑन्कोडिस्कव्हर’ला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेची मान्यता मिळाली असून, साध्या रक्ताच्या नमुन्यातून कर्करोगाच्या पेशी शोधण्यासाठी मान्यता मिळालेले हे भारतातील पहिले आणि एकमेव वैद्यकीय परीक्षण असल्याचा कंपनीचा दावा आहे. हे तंत्रज्ञान पंधराहून अधिक प्रकारच्या घन स्वरूपातील कर्करोगासाठी वापरता येते, असेही कंपनीने नमूद केले.

‘द्रव ऊतकपरीक्षण’ (लिक्विड बायोप्सी) या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ प्रा. क्लाउस पँटेल आणि प्रा. कॅथरीन अलिक्स-पानाबिएर यांनी परिषदेत या तंत्रज्ञानाच्या एकत्रित वापराचे महत्त्व अधोरेखित केले. कर्करोगाच्या पेशींवरील संशोधनाचा उपयोग नियामक मान्यता मिळालेल्या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी केल्याचे प्रा. पँटेल यांनी नमूद केले. तर, ‘ऑन्कोडिस्कव्हर’ आणि एनजीएस चाचण्यांमधून मिळणारी माहिती कर्करोगाच्या नियमित उपचारांमध्ये अधिक प्रभावीपणे वापरण्याची संधी असल्याचे प्रा. अलिक्स-पानाबिएर यांनी सांगितले.

प्रतिमांकन चाचण्यांमध्ये कर्करोग दिसत नाही

वैद्यकीय प्रतिमांकन चाचण्यांमध्ये कर्करोग दिसत नसला, तरी रक्तात कर्करोगाच्या काही पेशी किंवा जनुकीय संकेत शिल्लक असण्याची शक्यता असते. अशा पेशींचा शोध आणि त्यांचे निरीक्षण भविष्यात आजाराच्या पुनरागमनाचा किंवा इतर भागांत प्रसार होण्याचा धोका समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते, असे डॉ. जयंत खंडारे यांनी स्पष्ट केले.

डॉ. जयंत खंडारे आणि अरविंदन वासुदेवन यांनी २०१३ मध्ये अॅक्टोरियस कंपनीची स्थापना केली. रक्तातील कर्करोगाशी संबंधित जैविक संकेत शोधणाऱ्या तंत्रज्ञानाच्या विकासावर ही कंपनी काम करत असून, ‘ऑन्कोडिस्कव्हर मेटास्टॅट’ ही प्रणाली सध्या संशोधनाच्या टप्प्यात आहे.

अॅक्टरेकच्या सहकार्याने आयोजित या परिषदेत डॉक्टर आणि संशोधकांना रक्ताच्या नमुन्यावर आधारित पेशींचे परीक्षण आणि जनुकीय चाचण्या यांच्या एकत्रित वापरातून कर्करोगाच्या निदानापासून उपचारांच्या निरीक्षणापर्यंत कोणत्या नव्या शक्यता निर्माण होऊ शकतात, यावर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले.

Early Breast Cancer: स्तनाचा कर्करोग पुन्हा उद्भवण्याच्या जोखमीकडे लक्ष देणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या नियमित तपासणीचे महत्त्व

Web Title: Oncodiscover cancer detection technology camo 2026 actrec navi mumbai sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 07:08 PM

Topics:  

  • ahealth news
  • Breast Cancer
  • Cancer Awareness

संबंधित बातम्या

Breast Cancer: 3 महिने स्तनाग्रावर खपल्या, उपचार करूनही फरक नाही; तपासणीत आढळला सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग
1

Breast Cancer: 3 महिने स्तनाग्रावर खपल्या, उपचार करूनही फरक नाही; तपासणीत आढळला सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग

Early Breast Cancer: स्तनाचा कर्करोग पुन्हा उद्भवण्याच्या जोखमीकडे लक्ष देणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या नियमित तपासणीचे महत्त्व
2

Early Breast Cancer: स्तनाचा कर्करोग पुन्हा उद्भवण्याच्या जोखमीकडे लक्ष देणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या नियमित तपासणीचे महत्त्व

जिद्द, धैर्य अन् जगण्याची नवी उमेद! स्तनाच्या कर्करोगावर मात केलेल्या ५५ महिलांचा गौरव; वॉकहार्ट हॉस्पिटल्सचा उपक्रम
3

जिद्द, धैर्य अन् जगण्याची नवी उमेद! स्तनाच्या कर्करोगावर मात केलेल्या ५५ महिलांचा गौरव; वॉकहार्ट हॉस्पिटल्सचा उपक्रम

Overripe Banana Benefits : जास्त पिकलेली केळी आरोग्यासाठी फायदेशीर? संशोधनातून समोर आली नवी माहिती
4

Overripe Banana Benefits : जास्त पिकलेली केळी आरोग्यासाठी फायदेशीर? संशोधनातून समोर आली नवी माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.