थोडस पाणी प्यायल्यानंतर सुद्धा लगेच लघवीला जावे लागते? शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर किती पाणी प्यावे
Health Care: वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव, कमी पाण्याचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. कधी ऊन तर कधी थंडी वारा असल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची हानी पोहचण्याची शक्यता असते. दिवसभर शरीराला आवश्यक असलेल्यास प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्यायल्यास शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. पण बऱ्याचदा थोडंसं पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागते.(फोटो सौजन्य – istock)
Protein: चिकन – अंड्यापेक्षा कमालीचे प्रोटीन ‘या’ पदार्थात, 100 ग्रॅममध्ये 36 ग्रॅमचा जबरदस्त डोस
पाणी प्यायल्यानंतर पचनसंस्थेतून शरीरात शोषून घेतले जाते. किडनी रक्तातील अतिरिक्त पाणी आणि विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागत असेल, मूत्राशयात जमा झालेले लघवीचे प्रमाण असण्याची शक्यता असते. याशिवाय चहा, कॉफी किंवा कॅफिनयुक्त पेयांचे सेवन केल्यामुळे लघवीच्या प्रमाणात वाढ होते. याशिवाय थंडीचे वातावरण, काही औषधांचे सेवन केल्यामुळे लघवीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॅफीनयुक्त पेयांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे.
वातावरणातील बदल आणि शारीरिक समतोल राखण्यासाठी दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे फार आवश्यक आहे. तसेच तहान लागल्यानंतर पाण्याचे लगेच सेवन करावे. उन्हात काम करत असल्यास किंवा व्यायाम करताना जास्त घाम येत असल्यास पाण्याचे आवश्यक सेवन करावे. शारीरिक हालचाल केल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, ज्याच्या परिणामुळे थकवा, अशक्तपणा येऊन आरोग्य बिघडते. कलिंगड, काकडी, संत्री यांसारख्या पाणीदार फळांचे आणि भाज्यांचे सेवन करावे. लघवीचा रंग फिकट दिसणे म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी संतुलित असल्यास चिन्ह आहे.
Constipation Problem: बद्धकोष्ठतेने पोट फुगतं पण दुखत नाही? डॉक्टरांना नक्की कधी भेटावं
वारंवार लघवीला जाणे, रात्री अनेकदा लघवीसाठी उठावे लागणे, लघवी करताना जळजळ होणे, खूप तहान लागणे किंवा अचानक वजन कमी होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून शरीराची काळजी घ्यावी. वारंवार लघवीला जावे लागते म्हणून कमी पाण्याचे सेवन करू नये. शरीरास आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी प्यायल्यास शरीर निरोगी राहते.
Ans: थोडे पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला होणे हे नेहमीच गंभीर समस्येचे लक्षण नसते. मात्र, मूत्राशयाची अतिसंवेदनशीलता, ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर, मूत्रमार्गातील संसर्ग किंवा मधुमेह यांसारख्या कारणांमुळे वारंवार लघवीला जावे लागू शकते.
Ans: पाण्याची गरज वय, वजन, शारीरिक हालचाली, हवामान आणि आरोग्याच्या स्थितीनुसार बदलते. साधारणपणे प्रौढ व्यक्तींनी दिवसभर पुरेसे द्रवपदार्थ घ्यावेत.
Ans: होय, वारंवार लघवी होणे हे मधुमेहाचे एक लक्षण असू शकते. यासोबत जास्त तहान लागणे, भूक वाढणे, थकवा आणि वजन कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास रक्तातील साखरेची तपासणी करावी.






