Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breast Cancer: ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता वाढवण्याची का आहे गरज? जाणून घ्या सविस्तर माहिती

Breast Cancer: स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या काही घटकांची माहिती असणेही महत्त्वाचे आहे. कुटुंबातील कोणाला स्तनाचा कर्करोग झालेला असेल तसेच लठ्ठपणा आणि धूम्रपान यांसारख्या घटकांमुळेही स्तनाचा कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 28, 2026 | 11:31 AM
ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता वाढवण्याची का आहे गरज? जाणून घ्या सविस्तर माहिती

ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता वाढवण्याची का आहे गरज? जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us
Follow Us:

Breast Cancer: ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने अनेकदा या आजाराची लक्षणे दुर्लक्षित केली जातात. स्तनात गाठ किंवा इतर बदल जाणवल्यानंतरही तपासणीसाठी विलंब होत असल्याने काही महिला आजाराच्या पुढील टप्प्यात रुग्णालयात पोहोचतात. त्यामुळे स्तनाची नियमित स्वतः तपासणी, लक्षणांची योग्य माहिती आणि वेळेत वैद्यकीय सल्ला घेण्याबाबत ग्रामीण भागात अधिक जनजागृती होण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.याविषयी डॉ. प्रसाद कुलट, वरिष्ठ प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, औंध, पुणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.(फोटो सौजन्य – istock)

Breast Cancer: 3 महिने स्तनाग्रावर खपल्या, उपचार करूनही फरक नाही; तपासणीत आढळला सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग

ग्रामीण भागातील अनेक महिलांना स्वयं स्तन तपासणी करण्याची पद्धतही माहिती नसते. वयाच्या २५ वर्षांनंतर महिन्यातून किमान एकदा स्वयं स्तन तपासणी करणे गरजेचे आहे. स्तनामध्ये गाठ जाणवणे, स्तनाचा आकार बदलणे, त्वचेवर लालसरपणा किंवा त्वचेची जाडी वाढणे, स्तनाग्र आतल्या दिशेने ओढले जाणे, स्तनाग्रातून काही द्रव किंवा रक्तस्राव होणे तसेच स्तनात अचानक वेदना जाणवणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

ग्रामीण भागात आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय साधनांची मर्यादित उपलब्धता हीदेखील स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान होण्यातील मोठी अडचण आहे. अनेक महिलांना आजाराची लक्षणे माहिती नसल्याने त्या बराच काळ त्रास सहन करतात. काही वेळा आजाराची लक्षणे वाढल्यानंतर किंवा प्रकृती बिघडल्यानंतरच त्या रुग्णालयात येतात. त्यामुळे उपचार सुरू होण्यास उशीर होतो आणि आजार गंभीर अवस्थेत पोहोचण्याचा धोका वाढतो.

स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवणाऱ्या काही घटकांची माहिती असणेही महत्त्वाचे आहे. कुटुंबातील कोणाला स्तनाचा कर्करोग झालेला असेल तसेच लठ्ठपणा आणि धूम्रपान यांसारख्या घटकांमुळेही स्तनाचा कर्करोगाचा धोका वाढू शकतो. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आणि आवश्यकतेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

स्तनाच्या कर्करोगाचे वेळीच निदान झाल्यास त्वरित उपचार सुरू करता येतात. शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरपी यांसारख्या उपचारांमुळे रुग्णाच्या बरे होण्याच्या शक्यता वाढू शकतात. सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यास काही रुग्णांमध्ये स्तनाचा पूर्ण भाग काढण्याऐवजी केवळ कर्करोगग्रस्त भाग काढून शस्त्रक्रिया करणे शक्य होते.

Early Breast Cancer: स्तनाचा कर्करोग पुन्हा उद्भवण्याच्या जोखमीकडे लक्ष देणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या नियमित तपासणीचे महत्त्व

त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी स्तनाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. महिन्यातून एकदा स्वयं स्तन तपासणी करणे, आवश्यक त्या नियमित तपासण्या करून घेणे आणि स्तनामध्ये कोणताही संशयास्पद बदल जाणवल्यास उपचारासाठी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान आणि वेळेत उपचार हे महिलांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरते.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान कसे करता येते?

    Ans: स्तनांमध्ये होणारे बदल ओळखणे, लक्षणे दिसल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आणि वय व वैयक्तिक जोखमीनुसार योग्य स्क्रीनिंग करणे महत्त्वाचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मॅमोग्राफी किंवा इतर तपासण्या केल्या जाऊ शकतात.

  • Que: स्तनाची गाठ जाणवल्यास काय करावे?

    Ans: गाठ जाणवल्यास घाबरून न जाता शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गाठ दुखत नसली तरी तिची तपासणी करणे महत्त्वाचे आहे. केवळ लक्षणांवरून कर्करोगाचे निदान करता येत नाही.

  • Que: ग्रामीण महिलांना स्तनाच्या कर्करोगाची तपासणी कुठे करता येते?

    Ans: प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय किंवा स्तनरोगतज्ज्ञांकडे संपर्क साधता येतो. उपलब्ध तपासणी सुविधा आणि पुढील उपचारांसाठी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांची मदत घेता येते.

Web Title: Why is there a need to raise awareness about breast cancer among women in rural areas find out the details sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 11:31 AM

Topics:  

  • Breast Cancer news
  • cancer
  • Cancer prevention

संबंधित बातम्या

Breast Cancer: 3 महिने स्तनाग्रावर खपल्या, उपचार करूनही फरक नाही; तपासणीत आढळला सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग
1

Breast Cancer: 3 महिने स्तनाग्रावर खपल्या, उपचार करूनही फरक नाही; तपासणीत आढळला सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग

Early Breast Cancer: स्तनाचा कर्करोग पुन्हा उद्भवण्याच्या जोखमीकडे लक्ष देणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या नियमित तपासणीचे महत्त्व
2

Early Breast Cancer: स्तनाचा कर्करोग पुन्हा उद्भवण्याच्या जोखमीकडे लक्ष देणे का आहे महत्वाचे? जाणून घ्या नियमित तपासणीचे महत्त्व

Breast Cancer Screening : महाराष्ट्रात स्तन कर्करोग तपासणी, ‘आयब्रेस्टएक्झाम’ द्वारे १ लाखांहून अधिक महिलांची तपासणी
3

Breast Cancer Screening : महाराष्ट्रात स्तन कर्करोग तपासणी, ‘आयब्रेस्टएक्झाम’ द्वारे १ लाखांहून अधिक महिलांची तपासणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.