
दत्त जयंती निमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा
हिंदू पंचागात येणाऱ्या मार्गशीर्ष पौर्णिमेला दरवर्षी दत्तजयंती साजरा केली जाते. यंदाच्या वर्षी ४ डिसेंबरला दत्तजयंती साजरा केली जाणार आहे. या दिवशी भक्त गुरुचरित्राचे पारायण, स्तोत्रे आणि आरत्या म्हणत दत्त महाराजांची पूजा करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप मानले जातात.त्यांच्या जयंतीच्या दिवशी केलेल्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की दत्त जयंतीला पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.दत्त गुरूंकडे अनिष्ट शक्तींचा नाश करण्याची शक्ती होती, म्हणून त्यांना कठीण काळात तारक अवतार मानले जाते. दक्षिण भारत आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दत्तगुरूंची प्राचीन मंदिर आहे. त्यामुळे दत्तजयंती निमित्त तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि प्रियजनांना या गोड शुभेच्छा पाठवू शकता.(फोटो सौजन्य – pinterest)
त्रिमूर्ती अवतार, दत्त रुपी साकार,
त्रिभुवनी पसरे, भक्तीचा सागर
होता साक्षात्कार, घडतो चमत्कार,
गुरु माऊली चरणी माझा नमस्कार
दत्त जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
आता नको दिव्यदृष्टी,
आता नको ही जडसृष्टी
फक्त असावी आपल्यावर,
आपल्या सद्गुरुंची कृपादृष्टी!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
ब्रह्मदेवे आपुल्या करे ।
लिहिली असती दुष्ट अक्षरे
श्रीगुरुचरणसंपर्के ।
दुष्टाक्षरे ती शुभ होती ॥
श्री दत्त जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
दत्त जयंतीच्या मंगलमय दिवशी
आपण सर्वांना आयुष्यात येणाऱ्या
संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळो
आणि आपल्या आयुष्यात काय
सुखसमृद्धी येवो ही सदिच्छा!
दत्त महाराजांना सांगु नका
की माझ्यावर संकटे फार मोठी आहेत,
तर त्या संकटाना सांगा की तुझ्यापेक्षा
माझे महाराज मोठे आहेत.
!! श्री गुरुदेव दत्त!!
दत्ता दिगंबरा या हो
स्वामी मला भेट द्या हो
दत्ता दिगंबरा या हो
सावळ्या मला भेट द्या हो
सर्वांना दत्त जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!
गुरू तोच श्रेष्ठ
ज्याच्या उपदेशामुळे
कोणाचे तरी चरित्र सुधारते
दत्त दिगंबर.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः
दत्त जयंतीच्या शुभेच्छा!
त्रिमूर्तीचा अवतार, भक्तवत्सल, दिगंबरा!
श्री दत्त जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा!
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!
दत्त जयंतीच्या मंगलदिनी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
गुरुचरणांवर श्रद्धा ठेवून, दत्त जयंतीचा हा दिवस भक्तीभावाने साजरा करूया.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
श्रीगुरूंचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव असोत.
दत्त जयंती निमित्त तुम्हाला आरोग्य, सुख आणि शांती लाभो.
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ चा जप करत,
दत्त महाराजांच्या कृपेने तुमचे जीवन सुखी होवो.
दत्त जयंतीच्या शुभेच्छा!
दत्तगुरूंचे तेज तुमच्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येवो.
दत्त जयंतीच्या पवित्र पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा!
त्रिकाळ ज्ञानी, योगीराज श्री दत्तगुरूंच्या चरणी वंदन
तुम्हाला दत्त जयंतीच्या खूप आनंददायी शुभेच्छा!
श्री दत्त महाराजांचे मार्गदर्शन तुमच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर मिळो
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Dattaguru : गुरुचरित्र पारायणाचा मानवी आयुष्यावर काय परिणाम होतो? काय सांगतं अध्यात्म आणि विज्ञान ?
या शुभदिनी तुमच्या घरी सुख-समृद्धी आणि आनंदाची अखंडित कृपा राहो
दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
श्री दत्तात्रयांचा कृपाप्रसाद तुमच्या जीवनात सदैव बरसो
दत्त जयंतीच्या पावनपर्वाच्या शुभेच्छा!
दत्तासारखा गुरु मिळो, ज्याची कृपा लाभो
दत्त जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला भक्तीमय शुभेच्छा!
दत्त नामाचे स्मरण करून,
या पवित्र दिनी आपले जीवन धन्य करा
श्री दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरो,
हीच श्री दत्त चरणी प्रार्थना
दत्त जयंतीच्या शुभेच्छा!
अत्री अनसूयेचा पुत्र, दत्त गुरूंचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमी राहो
दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा!
दत्त कृपेने तुमचे जीवन सफल होवो, आणि प्रत्येक संकट दूर होवो.
दत्त जयंतीच्या भक्तीपूर्ण शुभेच्छा!
दत्त जयंतीच्या या उत्साहाच्या क्षणी,
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.
खूप खूप शुभेच्छा!
त्रिशूळधारी, कमंडलूधारी, योगीजन वंदित श्री दत्त महाराजांना कोटी कोटी प्रणाम
दत्त जयंतीच्या शुभेच्छा!