गुरुचरित्र किंवा स्वामी समर्थ सारामृताचं पारायण केलं जातं. दत्तसंप्रदायातील अनेक भाविक भक्तीभावाने पारायणाला बसतात. दत्तसंप्रदायातील प्रत्येक शिकवणीला अध्यात्म आणि वैज्ञानिक दृष्टीकोन देखील आहेत. दत्तसंप्रदायात गुरुचरित्र पारायण मानवी जीवनासाठी किती महत्वाचं आहे हे वारंवार सांगितलं जातं.
गुरुचरित्र हे केवळ कथा नाही, तर गुरु-तत्त्वाचे प्रकट रूप मानले जाते. पारायणावेळी मन, वाणी आणि भावना गुरुचरणी अर्पण होत असल्याने साधकात गुरु-कृपा सहज उतरते, असे अध्यात्मात सांगितले गेले आहे. वास्तुशास्त्रात सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही ऊर्जेला खूप बारकाईने महत्व दिलं जातं. जर घरात सतत कलह होत असेल किंवा सतत नकारात्मक ऊर्जा जाणवत असल्यास तुम्ही घरी गुरुचरित्र किंवा स्वामी सारामृताचं पारायण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते, दत्तसंप्रदायात सांगितलं जातं. गुरुचरित्र हे भक्ती, श्रद्धा, सेवा, ज्ञान आणि समाधान यांचा सुंदर संगम म्हणून ओळखला जातो.
आजच्या ताणतणावाच्या युगात गुरुचरित्र पारायण मन, बुद्धी आणि जीवनाच्या अनेक स्तरांवर सकारात्मक परिणाम घडवतं. मनाला स्थिर आणि शांत ठेवण्यास मदत करतं. ग्रंथातील कथा, चमत्कार आणि गुरूंचे उपदेश व्यक्तीच्या अंतर्मनात श्रद्धा आणि धैर्य निर्माण करतात. पारायण करताना जपलेले नियम, संयम आणि भक्तिभाव जीवनात शिस्त किती महत्वाची आहे हे पटवून देतं. असं म्हटलं जातं की पारायणाने दया, क्षमा, परोपकार, नम्रता आणि समत्वबुद्धी असे सद्गुण माणसाच्या अंगी रुजतात.
धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात सततचं नैराश्य पाचवीला पुजलेलं आहे. यासगळ्याला सामोरं जाणं अनेकदा कठीण होतं. त्यामुळे गुरुचरित्र पारायण या सगळ्यावर मानसिक शांतता देतं. , गुरुचरित्र पारायण मनाला शांत आणि स्थिरता देतं. पारायणाचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो आणि मेंदूची एकाग्रता वाढते.
Ans: दत्तसंप्रदायात गुरु म्हणजे परमेश्वराचा अंश मानला जातो. गुरुचरित्र वाचनाने गुरु-तत्त्वाशी मनाची नाळ जुळते, गुरु-कृपा प्राप्त होते आणि जीवनात आध्यात्मिक प्रगती होते.
Ans: पारायणाची प्रथा एका क्षणी सुरु न होता, ज्ञानदेव, महानुभाव पंथ, नाथपंथ आणि टेंबे स्वामींच्या काळापासून “गुरुचरित्र वाचणे, ऐकणे, स्मरण करणे” या साधनेतून हळूहळू विकसित झाली. पुढे शिष्यांच्या पिढ्यांमध्ये ही परंपरा दृढ झाली.
Ans: मन शुद्ध, शांत आणि स्थिर होते भक्ती, श्रद्धा, सेवा आणि नम्रता वाढते जीवनातील अडचणींवर मानसिक धैर्य मिळते साधकाला गुरु-कृपेचा अनुभव सहज येऊ लागतो घरात पवित्रता व सकारात्मकता वाढते






