फोटो सौजन्य- pinterest
सनातन धर्मामध्ये दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे. दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला असल्याने दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दत्तात्रेयाचा उत्सव गुरुवार, 4 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सणाला दत्त जयंती या नावाने ओळखले जाते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे एकत्रित अवतार म्हणून केले आहे. असे मानले जाते की दत्तात्रेयांची पूजा केल्याने त्रिमूर्तीची पूजा केल्यासारखेच फळ मिळते.
मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जाणारा हा जन्मोत्सव भक्तांसाठी आध्यात्मिक यश मिळविण्याचा एक विशेष प्रसंग आहे. असे मानले जाते की या दिवशी दत्तात्रेयांची पूजा केल्याने लवकर अपेक्षित यश मिळते. या शुभ दिवशी गंगा नदीत स्नान करून पूर्वजांना प्रार्थना केल्याने मागील जन्मांच्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी श्रद्धा आहे. धार्मिक ग्रंथांनुसार दत्तात्रेयांचा जन्म ऋषी अत्रि आणि त्यांची आई अनसूया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन केले आहे. दत्तात्रेय त्यांच्या 24 गुरूंसाठी देखील प्रसिद्ध आहेत. असे म्हटले जाते की दत्तात्रेयांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतले.
पौर्णिमा तिथीची सुरुवात गुरुवार 4 डिसेंबर रोजी सकाळी 8.37 वाजता होणार आहे आणि या तिथीची समाप्ती शुक्रवार, 5 डिसेंबर सकाळी 4.43 वाजता होणार आहे.
दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 5:14 ते 6:06 वाजेपर्यंत आहे. यावेळी अभिजित मुहूर्त असणार नाही. तर संधिप्रकाश मुहूर्त संध्याकाळी 5.58 ते 6.24 वाजेपर्यंत असेल. अमृत काळ दुपारी 12.20 ते 1.58 वाजेपर्यंत असेल.
मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून आवरुन झाल्यानंतर उपवास आणि पूजा करण्याचे व्रत घ्या.
दत्त जयंतीची पूजा करताना एका चौरंगावर किंवा पाटावर लाल रंगांचे वस्त्र पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर दत्ताची मूर्ती ठेवा.
त्यानंतर दत्तात्रेयांना फुले आणि हार अर्पण करा.
यानंतर, शुद्ध तुपाचा दिवा लावा.
भगवान दत्तात्रेयांना गुलाल, अबीर, चंदन, पवित्र धागा इत्यादी अर्पण करा.
आरती करुन घ्या आणि नैवेद्य अर्पण करा.
शक्य असल्यास, पूजेनंतर गरजू लोकांना अन्न, धान्य, कपडे इत्यादी दान करा.
सनातन धर्मामध्ये दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे. त्यांना त्रिमूर्तीचे अवतार मानले जाते. दत्तात्रेयांना तीन डोके आणि सहा हात आहेत. ते त्यांच्या सर्व हातांवर अलंकार घालतात. या दिवशी पूजा केल्याने तिन्ही देवांचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते. यामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. वैष्णव-शैव पंथांमध्ये, भगवान दत्तात्रेयांना गुरुस्वामी, गुरुराज आणि गुरुदेव म्हणून पूजले जाते. त्यांची अनेक मंदिरे दक्षिण भारतात आढळतात. हा उत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा केला जातो, विशेषतः दक्षिण भारतात. नाथ पंथ आणि सूफी पंथाचे लोक देखील भगवान दत्तात्रेयांची पूजा करतात आणि त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवतात.
ओम द्रां दत्तात्रेय नम:
ओम श्री गुरुदेव दत्त
याशिवाय दत्तात्रेय स्तोत्र, अवधूत गीतेचे श्लोक, गुरु स्तुती, श्री दत्त चालीसा यांचे पठणही या दिवशी शुभ मानले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: दत्त जयंती गुरुवार, 4 डिसेंबर रोजी आहे
Ans: भगवान दत्तात्रेय हे त्रिदेवांचे ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे अवतार आहेत. ते योग, अध्यात्म, ज्ञान आणि वैराग्याचे प्रतीक आहेत
Ans: गाणगापूर, नरसिंहवाडी, औदुंबर, गिरनार, कडप्पा ही मुख्य तीर्थक्षेत्रे आहेत






