Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Digestion Health: गणेशोत्सवात जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने पोटाचा होऊ शकतो त्रास, पचनाचे आरोग्य महत्त्वाचे

Digestion Health: गणेशोत्सवात प्रचंड प्रमाणात गोड खाल्ले जाते. अशावेळी पचनाचा त्रास होणं स्वाभाविक आहे. पण हा त्रास टाळायचा असेल आणि आरोग्य चांगले राखायचे असेल तर तज्ज्ञांचा सल्ला खास तुमच्यासाठी

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 15, 2026 | 08:52 PM
गोड खाल्ल्याने होऊ शकतात पोटाच्या समस्या (फोटो सौजन्य - iStock)

गोड खाल्ल्याने होऊ शकतात पोटाच्या समस्या (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवात गोड पदार्थांचा पोटावर भार 
  • पचनाच्या होऊ शकतात समस्या 
  • तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला 
Digestion Health: गणेशोत्सवाच्या काळात अनेकजण मोदक, लाडू, पुरणपोळी, रसमलाई, गुलाबजामून आणि इतर अनेक प्रकारच्या मिठाईचा आनंद घेतात. मात्र, गोड पदार्थ खाताना प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे आणि पचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे गोड पदार्थ शक्यतो कमी खावेत किंवा त्यांचे प्रमाण ठरवून घ्यावे. उदाहरणार्थ, दिवसातून एकच गोड पदार्थ खाणे योग्य ठरू शकते. त्यामुळे या गणेशोत्सवात चविष्ट पदार्थांचा आनंद घेतानाच आपल्या आरोग्याचीही काळजी घ्या आणि पोटाच्या समस्या टाळा. डॉ. विशाल सेठ, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल, पुणे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

नक्की काय घडते 

गणेशोत्सव हा आनंद, उत्सव, कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा आणि पारंपरिक पदार्थांचा आनंद घेण्याचा काळ आहे. या काळात लोक विविध ठिकाणी जातात, कुटुंबीय आणि मित्रांच्या घरी गणेशदर्शनासाठी भेट देतात. अशा वेळी अनेकजण आपल्या नेहमीच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात आणि भरपूर गोड पदार्थ खातात. नंतर पुन्हा आहाराची काळजी घेऊ, असा विचार केला जातो.

मोदक, लाडू, पुरणपोळी आणि इतर सणासुदीचे पदार्थ हे गणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग आहेत.मात्र, सलग अनेक दिवस जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो.त्यामुळे अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे, पोट जड होणे आणि पोटात अस्वस्थ वाटणे अशा समस्या होऊ शकतात.त्यामुळे सणासुदीच्या पदार्थांचा आनंद घ्या, पण ते मर्यादित प्रमाणात खा. अधूनमधून खाण्याची सवय रोजची होऊ देऊ नका.

एक घास ३२ वेळा चावून खाण्यामागचे रहस्य काय? जाणून घ्या पचनक्रियेवर होणारे परिणाम

पचनसंस्थेवर काय परिणाम होतो?

सणाच्या काळात लोक घरी, नातेवाईकांच्या घरी किंवा गणेश मंडपांना भेट देताना मिठाई खातात. त्यामुळे दिवसभरात आपण किती गोड पदार्थ खाल्ले आहेत, हे अनेकदा लक्षातही येत नाही. पारंपरिक मिठाईंमध्ये साखर आणि चरबीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मिठाई खाल्ल्याने पचनावर परिणाम होऊ शकतो आणि पोट जड किंवा फुगल्यासारखे वाटू शकते. काही लोकांमध्ये जास्त खाल्ल्यामुळे अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा अन्न वर येण्याचा त्रास वाढू शकतो.गॅस आणि अपचनाच्या तक्रारीही होऊ शकतात.

यावर नक्की काय करावे 

शक्य असल्यास गोड पदार्थ टाळणे चांगले. मात्र, ते पूर्णपणे टाळणे शक्य नसेल, तर त्याचे प्रमाण कमी ठेवणे महत्त्वाचे आहे.दिवसातून फक्त एक मोदक किंवा इतर एकच मिठाई खा. अन्न घाईघाईने न खाता हळूहळू आणि व्यवस्थित चावून खा. एकापाठोपाठ जड जेवण करू नका. यामुळे पचनसंस्थेवर जास्त ताण येऊ शकतो. गोड पदार्थांसोबत तळलेले पदार्थ आणि जड जेवण घेतल्यास पचनासाठी आणखी त्रास होऊ शकतो.

ज्यांना आधीपासून अ‍ॅसिडिटी किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांना जास्त खाल्ल्यानंतर छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे किंवा पोटात अस्वस्थ वाटणे अशा समस्या अधिक जाणवू शकतात. गणेशोत्सवाच्या काळात आणखी एक सामान्य समस्या म्हणजे जेवणाच्या वेळा बदलणे. कुटुंबीयांच्या घरी नंतर जेवण होणार आहे, हे माहीत असल्यामुळे काहीजण नेहमीच्या वेळचे जेवण टाळतात. त्यानंतर जेव्हा जेवण मिळते, तेव्हा ते खूप जास्त प्रमाणात खाल्ले जाते. दिवसभर मिठाई आणि स्नॅक्स खाल्ल्यानंतर रात्री उशिरा जड जेवण केल्यानेही काही लोकांमध्ये अॅसिड रिफ्लक्सचा त्रास वाढू शकतो.

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं

पचनाच्या समस्या टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

पचनाच्या समस्या टाळण्यासाठी गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ खाताना त्यांचे प्रमाण कमी ठेवा. पुरेसे पाणी प्या आणि जेवणाच्या वेळा नियमित ठेवा. दररोज ४५ मिनिटे व्यायाम किंवा शारीरिक हालचाल करा. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. दिवसभर शक्य तितके सक्रिय राहा आणि सतत बसून राहणे टाळा. जड जेवण करू नका. प्रोबायोटिक्स असलेले पदार्थ आहारात घ्या. सोडा आणि कोल्ड ड्रिंक्स टाळा.

जर तुम्हाला वारंवार खूप जास्त अ‍ॅसिडिटी होत असेल, सतत पोटदुखी होत असेल, उलट्या होत असतील, अन्न किंवा पाणी गिळताना त्रास होत असेल किंवा कोणतेही कारण नसताना वजन कमी होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. या समस्यांसाठी केवळ सणासुदीचे जास्त खाणे कारणीभूत आहे असे समजू नका. अशा वेळी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट म्हणजेच पोट आणि पचनसंस्थेच्या आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Digestion health in ganeshotsav 2026 how to take care of health by experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • digestion
  • Ganeshotsav 2026
  • Health Tips

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: ढोल-ताशांचा गजर अन् डीजेच्या दणक्यावर पोलिसांची नजर; २०० ठिकाणी मोजली जाणार ध्वनी पातळी
1

Ganeshotsav 2026: ढोल-ताशांचा गजर अन् डीजेच्या दणक्यावर पोलिसांची नजर; २०० ठिकाणी मोजली जाणार ध्वनी पातळी

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन
2

Ganeshotsav 2026: यवतमाळ जिल्ह्यात ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे उत्साहात आगमन

Prasad Home Delivery : लांब रांगेत उभं राहणं विसरा; घरबसल्या मिळवा  Dagdusheth, Siddhivinayakचा प्रसाद! ‘या’ ॲपवरून ऑर्डर करा
3

Prasad Home Delivery : लांब रांगेत उभं राहणं विसरा; घरबसल्या मिळवा Dagdusheth, Siddhivinayakचा प्रसाद! ‘या’ ॲपवरून ऑर्डर करा

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय
4

Rishi Panchami Vrat Katha: ऋषीपंचमीला नक्की वाचा पौराणिक कथा, मासिक पाळीशी संबंध काय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.