(फोटो सौजन्य: istock)
भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी
अनेकांना हे ठाऊक नाही पण आपल्या शरीरातील अधिकतर समस्या या आपल्या रोजच्या चुकांमुळे किंवा चुकीच्या सवयींमुळे उद्भवत असतात. या चुका हळूहळू आपल्या शरीरावर परिणाम करु लागतात आणि पुढे जाऊन गंभीर समस्या निर्माण करतात. तुम्हालाही पचनाच्या समस्या असतील तर गट हेल्थवर लक्ष देणे गरजेचे आहे. चला नेहमीच्या कोणत्या सवयी ज्या गट हेल्थवर परिणाम करु शकतात ते जाणून घेऊया.
प्रोसेस्ड फूडचे सेवन
आपल्या रोजच्या दिनचर्येत अनेकजण प्रोसेस्ड फूडचे सेवन करतात. कामाचा ताण आणि वेळ वाचवण्यासाठी तसेच आळसापोटी अधिकतर लोक जेवण बनवत नाही तर प्रोसेस्ड फूडवर अवलंबून राहतात. यात मॅगी नूडल्सचाही समावेश होतो. तुम्ही जर रोजच्या जीवनात प्रोसेस्ड फूडचे सेवन करत असाल तर आजच ही सवय टाळा. यात अनहेल्दी फॅट्स, साखरेचे जास्त प्रमाण आणि प्रिजर्व्हिटीज असतात जे आपल्या आतड्यांना त्रास देतात. यामुळे गट हेल्थला नुकसान पोहचत असते.
कमी पाणी पिणे
आपल्या सर्वांना माहिती आहे की, पाणी आपल्या आरोग्यासाठी किती गरजेचे आहे. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यात पाण्याची मोठी मदत होत असते. पाणी तुमच्या ओव्हरऑल बाॅडीला हेल्दी ठेवण्यास मदत करत असते. पोषक तत्वांचे शोषण आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाणी कमी पिल्याने शाैचास समस्या निर्माण होतात आणि याचा आतड्यांवर परिणाम होऊ लागतो. यामुळे तुमची पचनक्रियाही बिघडू शकते.
नाश्ता स्किप करणे
आधुनिक जीवनशैलीत अनेकांनी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये काही बदल केले आहेत. बरेच लोक कामाच्या गडबडीत सकाळचा नाश्ता स्किप करतात आणि रात्रीचे जेवण फार उशीराने करतात. जेवणाची वेळ देखील निरोगी आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते. वेळेवर न खाणे किंवा कोणत्याही वेळी जेवण टाळणे, या दोन्ही सवयींमुळे एन्झाइमच्या स्रावावर आणि आम्ल निर्मितीवर परिणाम होतो. यामुळे पचनक्रिया खराब होते आणि आतड्यांना त्रास होऊ लागतो.
रात्री उशीरापर्यंत जागे राहणे
रात्रीच्या वेळी जर तुम्हाला उशीरापर्यंत जागे राहण्याची सवय असेल तर ही सवय देखील तुमच्या आरोग्यावर परिणाम करत असते हे लक्षात घ्या. अनेकदा लोक मध्यरात्रीपर्यंत जागे राहतात ज्यामुळे पचनावरच नाही स्किनवरही याचा वाईट परिणाम दिसू लागतो. यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात, स्ट्रेस लेव्हलमध्ये वाढ होते आणि गट हेल्थलाही नुकसान पोहचते.






