Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Digital Stress: सतत मोबाईल वापरामुळे वाढतोय डिजिटल स्ट्रेस; तुम्हीही करत नाही ना ‘या’ चुका?

Digital Stress Causes: डिजिटल युगात वाढता स्क्रीन टाइम, सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे डिजिटल स्ट्रेस ही समस्या वेगाने वाढत आहे. यापासून कसाबचाव कराल, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 26, 2026 | 07:39 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • डिजिटल स्ट्रेस म्हणजे काय?
  • डिजिटल स्ट्रेसची प्रमुख कारणे
  • ही लक्षणे ओळखा
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इंटरनेटशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पनाही करणे कठीण झाले आहे. काम, शिक्षण, मनोरंजन आणि संवाद यासाठी स्क्रीनचा वापर सातत्याने वाढत आहे. मात्र, तंत्रज्ञानामुळे जीवन अधिक सोयीचे झाले असले तरी त्याचा अतिरेक मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतो. यालाच ‘डिजिटल स्ट्रेस’ असे म्हटले जाते. सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, सोशल मीडियावरील सक्रियता, जास्त स्क्रीन टाइम आणि कायम ऑनलाइन राहण्याची भावना यामुळे हा ताण निर्माण होतो.

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा

डिजिटल स्ट्रेस म्हणजे काय?

डिजिटल साधनांच्या अतिवापरामुळे मनावर निर्माण होणारा मानसिक ताण म्हणजे डिजिटल स्ट्रेस. सतत माहिती मिळणे, अनेक कामे एकाच वेळी करण्याची सवय आणि प्रत्येक मेसेजला तत्काळ प्रतिसाद देण्याचा दबाव यामुळे मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे मानसिक थकवा आणि अस्वस्थता वाढू शकते.

डिजिटल स्ट्रेसची प्रमुख कारणे

  • अनेक तास मोबाईल किंवा लॅपटॉप वापरल्याने डोळ्यांवर ताण येतो, डोकेदुखी, झोपेच्या समस्या आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी निर्माण होतात.
  • वारंवार येणारे मेसेज, ई-मेल आणि अॅप अलर्ट मेंदूला सतत सतर्क ठेवतात. त्यामुळे चिडचिड आणि तणाव वाढू शकतो.
  • इतरांच्या आयुष्याशी सतत तुलना करणे, लाइक्स आणि फॉलोअर्सची चिंता यामुळे आत्मविश्वास कमी होऊन मानसिक ताण वाढतो.
  • वर्क फ्रॉम होम आणि डिजिटल कामामुळे कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही अनेकांना सतत उपलब्ध राहण्याचा ताण जाणवतो.

ही लक्षणे ओळखा

  • वारंवार मोबाईल तपासण्याची इच्छा असणे
  • चिडचिड आणि अस्वस्थता वाटणे
  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे
  • झोप न लागणे
  • मानसिक थकवा जाणवणे
  • कामात उत्साह न वाटणे
  • सोशल मीडियापासून दूर राहिल्यावर अस्वस्थ  जाणवणे.

डिजिटल स्ट्रेसपासून बचाव कसा कराल?

मोबाईल आणि लॅपटॉप वापरण्यासाठी निश्चित वेळ ठरवा. अनावश्यक अॅप्सची नोटिफिकेशन्स बंद ठेवा. झोपण्याच्या किमान 30 ते 60 मिनिटे आधी स्क्रीनपासून दूर राहा. तसेच योगा, व्यायाम, पुस्तक वाचन आणि कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मानसिक ताण कमी करण्यास मदत होऊ शकते. तसेच, तुमच्या आवडीचा धंद जोपासा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन

Web Title: Digital stress mobile screen time effects mental health prevention tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • Digital news
  • mental stress
  • mobile

संबंधित बातम्या

Health Update: ४९.५% तरुण एकटेच सहन करतात वेदना! मुंबईसह १० शहरांमधील धक्कादायक आकडेवारी
1

Health Update: ४९.५% तरुण एकटेच सहन करतात वेदना! मुंबईसह १० शहरांमधील धक्कादायक आकडेवारी

Instant E-PAN Card: नवं PAN कार्ड काढायचंय? आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही!  मोबाईलवरच 10 मिनिटांत करा काम
2

Instant E-PAN Card: नवं PAN कार्ड काढायचंय? आता रांगेत उभं राहण्याची गरज नाही! मोबाईलवरच 10 मिनिटांत करा काम

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील
3

भारताच्या तरुणांमध्ये वाढतोय मानसिक तणाव? 49.5% जण स्वतःच सामना करतात, फक्त 9.2% घेतात प्रोफेशनल मदत; ‘एमपॉवर 2026’ सर्वेक्षणातील

Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर
4

Amazon Pay आणि Pahle India चा मोठा रिपोर्ट – लहान शहरांनी मारली बाजी, डिजिटल कर्जात टॉपवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.