२१ जुलै घटना २०१२ : एर्डन एरुस - यानी जगातील पहिली एकट्याने मानव-शक्ती प्रदक्षिणा पूर्ण केली. २००८ : राम बरन यादव यांना नेपाळचे पहिले राष्ट्रपती घोषित करण्यात आले. २००२ : वर्ल्ड कॉम कंपनीने दिवाळखोरी घोषित केली. १९८३ : अंटार्क्टिका खंडातील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सियस यापृथ्वीवरील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद केली गेली. १९७७ : लिबिया-इजिप्शियन युद्ध सुरुवात. १९७०: अस्वान हाय धरण, इजिप्त हे जगातील सर्वात मोठे बंधारा धरण ११ वर्षांच्या बांधकामानंतर पूर्ण झाले. १९६१: मर्क्युरी-रेडस्टोन ४ मिशन गुस ग्रिसम हे अंतराळात जाणारे दुसरे अमेरिकन बनले. सुरु झाली आणि संपली. १९६१: अमेरिकन नागरिकी युद्ध - बुल रनची पहिली लढाई: युद्धाची पहिली मोठी लढाई १९५९: एनएस सवाना हे पहिले अणुऊर्जेवर चालणारे मालवाहू जहाज कार्यरत झाले.. १९५४ : पहिले इंडोचिनी युद्ध - जिनिव्हा परिषदेने व्हिएतनाम देशाचे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये विभाजन केले. १९४४: दुसरे महायुद्ध - ग्वामची लढाई: अमेरिकन सैन्याने ग्वामवर उतरले आणि या लढाईची सुरवात झाली. १९४४: क्लाऊस व्हॉन स्टाऊफेनबर्ग - ऍडॉल्फ हिटलरची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्याच्या गुन्ह्यासाठी फाशी. १९२५: माल्कम कॅम्पबेल हे जमिनीवरील १५० माइल्स प्रति तास (१५०mph२४१kmph) वेगाचा टप्पा पार करणारे पहिले व्यक्ती बनले. १९०४ : लुई रिंगोली - हे जमिनीवरील १०० माइल्स प्रति तास (१००mph १६१kmph) वेगाचा टप्पा पार करणारे पहिले व्यक्ती बनले. १८३१ : बेल्जिअम- देशाचा पहिला राजा लिओपोल्ड यांचा शपथविधी झाला. इ.स.पू. ३५६: एफिसस आर्टेमिस मंदिर नष्ट झाले. २१ जुलै जन्म १९६८ : आदित्य श्रीवास्तव भारतीय अभिनेते १९६०: [blurb content=""][blurb content=""] (निधन: ८ मार्च १९८८) १९४७: चेतन प्रतापसिंग चौहान - भारतीय क्रिकेटपटू, उत्तर प्रदेशचे आमदार (निधन: १६ ऑगस्ट २०२०) १९४५: बॅरी रिचर्ड्स - दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू १९३४ : चंदू बोर्डे - भारतीय क्रिकेटपटू आणि निवड समितीचे अध्यक्ष - पद्म भूषण, पद्मश्री, अर्जुना पुरस्कार १९३०: रा. चिं. ढेरे - भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक १९२०: आनंद बक्षी गीतकार (निधन: ३० मार्च २००२) १९११: उमाशंकर जोशी भारतीय लेखक, कवी आणि विद्वान - ज्ञानपीठ पुरस्कार (निधन: १९ डिसेंबर १९८८) १९१० : वि. स. पागे - स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक (निधन: १६ मार्च १९९०) १८९९: अर्नेस्ट हेमिंग्वे अमेरिकन लेखक- नोबेल पुरस्कार (निधन: २ जुलै १९६१) १८५३ : शंकर बाळकृष्ण दीक्षित - ज्योतिर्विद (निधन: २७ एप्रिल १८९८) २१ जुलै निधन २०२०: लालजी टंडन- मध्य प्रदेशचे २२वे राज्यपाल (जन्म: १२ एप्रिल १९३५) २०१३ : लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी भारतीय मार्शल आर्टिस्ट (जन्म: १ जानेवारी १९८१) २००९: गंगूबाई हनगळ किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: ५ मार्च १९१३) २००२ : गोपाळराव बळवंतराव कांबळे - मराठी चित्रकार २००१ : शिवाजी गणेशन दाक्षिणात्य अभिनेते (जन्म: 3. ऑक्टोबर १९२८) १९९८ : ऍलन शेपर्ड अमेरिकन अंतराळवीर १९९७: राजा राजवाडे - साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १९३६) १९९५: सज्जाद हुसेन संगीतकार मेंडोलीनवादक (जन्म: १५ जून १९१७) १९९४ : डॉ. र. वि. हेरवाडकर मराठी बखर वाङ्मयाचे अभ्यासक १९७२: जिग्मे दोरजी वांगचुक भूतानचे राजे (जन्म: २ मे १९२९) १९२०: सरदादेवी - भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: २२ डिसेंबर १८५३)