
Anna Hazare agitation against the Lokpal Bill ended April 9th History
अहिंसेचा इतिहास असलेल्या भारतामध्ये 2011 साली अशाच एका आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले होते. ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांचे आंदोलन. अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी केलेले उपोषण देशभरात मोठ्या आंदोलनाचे रूप धारण झाले होते. २०११ साली भ्रष्टाचाराविरोधात कठोर कायदा लागू करावा, या मागणीसाठी त्यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले. या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि हजारो नागरिकांनी पाठिंबा दर्शविला. सरकारशी अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर काही महत्त्वाच्या मागण्यांवर तडजोड झाली. त्यानंतर अण्णा हजारे यांनी आपले उपोषण मागे घेतले. या आंदोलनामुळे सरकारवर लोकपाल विधेयक आणण्याचा दबाव वाढला आणि भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती झाली. अण्णा हजारे यांच्या या आंदोलनाने देशातील जनतेला एकत्र आणले आणि लोकशाही व्यवस्थेत जनतेच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. (Dinvishesh) त्यामुळे हे आंदोलन भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा मानले जाते. आजच्या दिवशी सरकारने अटी मान्य केल्यामुळे आण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले.
09 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
09 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
09 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष