Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025 : यंदाच्या दिवाळीत घरी 5 पारंपरिक आणि गोड चवीचे मराठी पदार्थ बनवायला विसरू नका; फराळात हे नाही तर मजा नाही!

Diwali Sweets : दिवाळी हा सण फक्त प्रकाशाचा नाही तर गोड पदार्थांचाही आहे... सणाच्या रंगात रंगून जाताना घरी गोड पदार्थांची मेजवानी बनवायला विसरू नका. आजच या रेसिपीज घरी ट्राय करा आणि सणाचा गोडवा वाढवा!

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 14, 2025 | 11:45 AM
Diwali 2025 : यंदाच्या दिवाळीत घरी 5 पारंपरिक आणि गोड चवीचे मराठी पदार्थ बनवायला विसरू नका; फराळात हे नाही तर मजा नाही!

Diwali 2025 : यंदाच्या दिवाळीत घरी 5 पारंपरिक आणि गोड चवीचे मराठी पदार्थ बनवायला विसरू नका; फराळात हे नाही तर मजा नाही!

Follow Us
Close
Follow Us:

“दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि गोडव्याचा सण. या सणात प्रत्येक घर उजळून निघतं — रांगोळ्यांनी अंगण सजतं, फुलांनी घर दरवळतं आणि गोड पदार्थांच्या सुगंधाने वातावरण भारून जातं. मराठी घरांमध्ये दिवाळी म्हटलं की “फराळ” हा शब्द अगदी मनात येतो. या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचा सुंदर मिलाफ असतो. करंजी, अनर्सा, शंकरपाळे, बेसन लाडू, चिरोटे.. हे केवळ पदार्थ नाहीत, तर आपल्या परंपरेचा आणि प्रेमाचा गोड वारसा आहेत.चला तर मग जाणून घेऊया, हे ५ पारंपरिक मराठी गोड पदार्थ आणि त्यांची सोपी रेसिपी.

सकाळचा नाश्ता होईल आणखीनच मजेदार! सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा मसाला भरलेली स्टफ्ड इडली, नोट करून घ्या रेसिपी

अनारसे (Anarsa)

साहित्य:

  • तांदूळ – २ कप
  • गूळ – १ कप
  • खसखस – ३ टेबलस्पून
  • तूप – तळण्यासाठी

कृती:

  • तांदूळ दोन दिवस पाण्यात भिजवून दररोज पाणी बदलावे.
  • नंतर ते पाणी काढून तांदूळ वाळवून बारीक वाटून घ्यावे.
  • गूळ थोड्याशा पाण्यात वितळवून पीठात मिक्स करावे.
  • हे पीठ १ रात्र झाकून ठेवावे, २ ते ३ दिवस ठेवल्यास आणखीन उत्तम.
  • दुसऱ्या दिवशी छोटे गोळे करून त्यावर खसखस लावून तळावे.
  • सोनेरी रंग आल्यावर बाहेर काढून थंड होऊ द्यावे.
  • बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ अनारसे तयार!

करंजी (Karanji)

साहित्य:

  • मैदा – २ कप
  • साजूक तूप – २ टेबलस्पून
  • किसलेल सुक खोबरे – १ कप
  • साखर – ¾ कप
  • वेलदोडा पूड – १ टीस्पून
  • काजू-बदाम – थोडेसे
  • तूप/तेल – तळण्यासाठी

कृती:

  • मैद्यात तूप टाकून मोहन तयार करून पाणी घालून घट्ट पीठ मळावे.
  • कढईत तूप गरम करून त्यात किसलेल सुक खोबरे, साखर, वेलदोडा पूड आणि सुके मेवे परता आणि सारण तयार करा.
  • पीठाचे छोटे गोळे करून पोळी लाटावी आणि सारण भरून अर्धवट दुमडावे.
  • कडा नीट दाबून तेलात किंवा तुपात सोनेरी रंग येईपर्यंत तळावे.
  • दिवाळीच्या फराळातील आवडती करंजी तयार आहे!

चिरोटे (Chirote)

साहित्य:

  • मैदा – २ कप
  • साजूक तूप – ३ टेबलस्पून
  • साखर पावडर – १ कप
  • वेलदोडा पूड – १ टीस्पून
  • तेल – तळण्यासाठी

कृती:

  • मैद्यात तूप टाकून मळून मऊ पीठ तयार करावे.
  • त्याच्या लहान पोळ्या लाटून त्यावर तूप आणि पीठ लावावे, नंतर त्या एकावर एक ठेवून रोल करावा.
  • रोलचे छोटे तुकडे करून गोल लाटून तळावे.
  • सोनेरी रंग आल्यावर बाहेर काढून त्यावर साखरेची पावडर भुरभुरवावी.
  • कुरकुरीत, थरदार आणि गोड चिरोटे तयार!

शंकरपाळे (Shankarpali)

साहित्य:

  • मैदा – २ कप
  • साखर – ¾ कप
  • तूप – ३ टेबलस्पून
  • दूध – ½ कप
  • तेल – तळण्यासाठी

कृती:

  • यासाठी प्रथम दूध, साखर आणि तूप गरम करून साखर पूर्ण विरघळवावी.
  • हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात मैदा घालून घट्ट पीठ मळावे.
  • पीठ लाटून छोटे हिरेसारखे तुकडे करावेत.
  • तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळावे.
  • खुसखुशीत, हलके आणि स्वादिष्ट शंकरपाळे तयार!

हलका, कुरकुरीत आणि आरोग्यदायी… गुजराती स्टाईलमध्ये बनवा ‘मसाला मेथी खाखरा’

बेसन लाडू (Besan Ladoo)

साहित्य:

  • बेसन – २ कप
  • साजूक तूप – १ कप
  • साखर – १ कप (पावडर केलेली)
  • वेलदोडा पूड – १ टीस्पून
  • सुके मेवे – ऐच्छिक

कृती:

  • कढईत तूप गरम करून त्यात बेसन टाकावे आणि मंद आचेवर भाजावे.
  • बेसनाचा सुवास येऊन तो सोनेरी रंगाचा झाल्यावर गॅस बंद करावा.
  • मिश्रण थंड झाल्यावर त्यात साखर आणि वेलदोडा पूड घालून नीट मिसळावे.
  • हवे तसे आकार देऊन लाडू वळावे.
  • सणाला शोभणारे सुगंधी बेसन लाडू तयार!

दिवाळीच्या या गोड पदार्थांमध्ये केवळ चव नाही, तर परंपरेचा आणि घरगुती आपुलकीचा सुगंध दडलेला आहे. प्रत्येक अनारसे, करंजी आणि लाडू हे आपल्या संस्कृतीची आणि कुटुंबाच्या प्रेमाची गोड आठवण आहेत. दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा नव्हे, तर गोडव्याचा प्रकाश पसरवण्याचा सण आहे हे विसरायला नको.

Web Title: Diwali 2025 make 5 traditional marathi sweet dishes at home note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • Diwali 2025
  • Diwali food
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Diwali 2025 : दिवाळी शॉपिंगसाठी सज्ज व्हा, हे आहेत मुंबईतील 5 स्वस्त मार्केट; हजारातच पूर्ण होईल संपूर्ण शॉपिंग
1

Diwali 2025 : दिवाळी शॉपिंगसाठी सज्ज व्हा, हे आहेत मुंबईतील 5 स्वस्त मार्केट; हजारातच पूर्ण होईल संपूर्ण शॉपिंग

ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
2

ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Diwali 2025: दिवाळीला सोनेव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीची खरेदी करणे असते शुभ, देवी लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद
3

Diwali 2025: दिवाळीला सोनेव्यतिरिक्त कोणत्या गोष्टीची खरेदी करणे असते शुभ, देवी लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद

Vasubaras 2025: 17 की 18 ऑक्टोबर कधी आहे वसुबारस, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vasubaras 2025: 17 की 18 ऑक्टोबर कधी आहे वसुबारस, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.