Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anjeer Barfi : गोड पदार्थाने वाढवा सणाचा गोडवा, दिवाळीनिमित्त घरी बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट ‘अंजीर बर्फी’

अंजीर बर्फी ही केवळ एक मिठाई नाही, तर दिवाळीच्या दिवसांना आरोग्याचा गोड स्पर्श देणारी एक अनोखी रेसिपी आहे. यावर्षी दिवाळीत ही हेल्दी आणि स्वादिष्ट बर्फी बनवा आणि आपल्या प्रियजनांना थोडी गोड पण guilt-free मेजवानी द्या!

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 23, 2025 | 09:30 AM
Anjeer Barfi : गोड पदार्थाने वाढवा सणाचा गोडवा, दिवाळीनिमित्त घरी बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट 'अंजीर बर्फी'

Anjeer Barfi : गोड पदार्थाने वाढवा सणाचा गोडवा, दिवाळीनिमित्त घरी बनवा पौष्टिक आणि स्वादिष्ट 'अंजीर बर्फी'

Follow Us
Close
Follow Us:

“दिवाळी म्हटलं की घराघरात गोडधोडाचा सुगंध दरवळू लागतो. चकल्या, लाडू, करंज्या, शंकरपाळ्या या पारंपरिक पदार्थांसोबतच आजकाल लोक काहीतरी हेल्दी आणि नवीन बनवायला आवडतात. अशाच एका पौष्टिक आणि स्वादिष्ट गोड पदार्थाचं नाव आहे अंजीर बर्फी. अंजीर आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी मानले जाते. यात भरपूर फायबर, आयर्न, कॅल्शियम आणि नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे अंजीर बर्फी हा केवळ चवदारच नाही तर आरोग्यदायी पर्यायही ठरतो.

Bhaubeej 2025 : आपल्या लाडक्या भावासाठी घरीच तयार करा चविष्ट असा ‘अंजीर हलवा’; काही क्षणातच फस्त होतोय की नाही ते पहा

या बर्फीत साखरेऐवजी अंजीर आणि खजूराचा नैसर्गिक गोडवा वापरला जातो. त्यामुळे ज्यांना साखर कमी खायची आहे, त्यांच्यासाठी हा पदार्थ एकदम उत्तम आहे. दिवाळीच्या दिवसांत हा पदार्थ बनवला, तर पाहुण्यांना सर्व्ह करतानाही एक वेगळा ‘हेल्दी ट्विस्ट’ देता येतो. चवीबरोबरच आरोग्याची काळजी राखायची असेल तर तुमच्यासाठी हा पदार्थ एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग कोणताही वेळ न घालवता लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • सुकं अंजीर (फिग्स) – २०० ग्रॅम
  • खजूर – १०० ग्रॅम
  • बदाम – ५० ग्रॅम
  • काजू – ५० ग्रॅम
  • पिस्ते – २ टेबलस्पून (बारीक चिरलेले)
  • तूप – २ टेबलस्पून
  • वेलदोडा पावडर – ½ टीस्पून
  • थोडंसं दूध (भिजवण्यासाठी)
100 वर्षे जुनी रेसिपी ‘पाकपोळा’ कधी खाल्ला आहे का? गोडवा, आठवणी आणि सणांचा खास स्वाद!

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम अंजीर छोटे तुकडे करून कोमट दुधात १५-२० मिनिटं भिजवून ठेवा, म्हणजे ते मऊ होतील.
  • खजूराचे बिया काढून त्याचे छोटे तुकडे करा. जर खजूर खूप कोरडे असतील, तर त्यांनाही थोडं दूध लावून मऊ करा.
  • एका पॅनमध्ये थोडं तूप टाकून बदाम आणि काजू हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. गॅस बंद करून थंड झाल्यावर जाडसर कुटून घ्या.
  • मिक्सरमध्ये भिजवलेले अंजीर आणि खजूर एकत्र करून मऊ पेस्ट तयार करा. खूप गुळगुळीत नको, थोडं दाणेदार टेक्स्चर राहू द्या.
  • एका जाड बुडाच्या पॅनमध्ये १ टेबलस्पून तूप गरम करा. त्यात तयार पेस्ट घालून मंद आचेवर ८-१० मिनिटं परतवा. मिश्रण थोडं घट्ट होऊ लागलं की त्यात भाजलेले सुकामेवा व वेलदोडा पावडर घाला.
  • एका तुप लावलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण समान पसरवा. वरून चिरलेले पिस्ते पसरवा आणि हलके दाबा. १-२ तास फ्रीजमध्ये सेट होऊ द्या.
  • सेट झाल्यावर सुरीने हवे तसे चौकोनी किंवा डायमंड आकाराचे तुकडे कापा आणि सणासुदीच्या ताटात सुंदरपणे सजवा.
  • तुम्ही यामध्ये थोडं किसलेलं नारळ किंवा पॉपपी सीड्स (खसखस) घालून स्वाद वाढवू शकता.
  • साखर पूर्णपणे टाळली जाते म्हणून डायबेटिक लोकांसाठीही ही बर्फी उत्तम पर्याय आहे.
  • फ्रीजमध्ये ठेवली तर ही बर्फी ८-१० दिवस सहज टिकते.

Web Title: Diwali 2025 make tasty and healthy anjeer barfi recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या कच्च्या केळींपासून पारंपरिक पद्धतीत बनवा चविष्ट भाजी, वजन राहील नियंत्रणात
1

पौष्टिकतेने समृद्ध असलेल्या कच्च्या केळींपासून पारंपरिक पद्धतीत बनवा चविष्ट भाजी, वजन राहील नियंत्रणात

साधा भात कशाला, घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘सोया फ्राइड राईस’; चायनीज लव्हर्ससाठी खास, नोट करा रेसिपी
2

साधा भात कशाला, घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘सोया फ्राइड राईस’; चायनीज लव्हर्ससाठी खास, नोट करा रेसिपी

Food Recipe: जिभेवर ठेवताच विरघळून जाईल शाही चवीचा ‘कॅरॅमल शिरा’, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
3

Food Recipe: जिभेवर ठेवताच विरघळून जाईल शाही चवीचा ‘कॅरॅमल शिरा’, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

हॉटेलसारखी परफेक्ट दही-पुदिन्याची चटणी कशी तयार करायची? नोट करा रेसिपी
4

हॉटेलसारखी परफेक्ट दही-पुदिन्याची चटणी कशी तयार करायची? नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.