• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Bhaubeej 2025 Make Tasty Anjeer Halwa At Home Recipe In Marathi

Bhaubeej 2025 : आपल्या लाडक्या भावासाठी घरीच तयार करा चविष्ट असा ‘अंजीर हलवा’; काही क्षणातच फस्त होतोय की नाही ते पहा

Anjeer Halwa Recipe : बहीण-भावाच्या नात्याला समर्पित भाऊबीज हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. आता सण म्हटलं की, गोडधोड घरी बनायलाच हवं, काहीतरी नवीन ट्राय करा आणि यंदा घरी बनवा अंजीर हलवा.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 22, 2025 | 08:15 PM
Bhaubeej 2025 : आपल्या लाडक्या भावासाठी घरीच तयार करा चविष्ट असा 'अंजीर हलवा'; काही क्षणातच फस्त होतोय की नाही ते पहा

(फोटो सौजन्य: youtube)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय सणांमध्ये प्रत्येक दिवस एक विशिष्ट भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्व घेऊन येतो. त्यातीलच एक अत्यंत हृदयस्पर्शी सण म्हणजे भाऊबीज. दिवाळीचा शेवटचा दिवस असलेली ही बीज केवळ भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा उत्सव नसून, प्रेम, जिव्हाळा आणि परस्पर आदर यांचे प्रतीक आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळते, त्याच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करते आणि भावाकडून मिळणाऱ्या गिफ्टसोबत त्या नात्यातील गोडवा अधिक गहिरा होतो. या खास दिवशी बहिणीने भावासाठी स्वतःच्या हाताने काहीतरी गोड आणि पौष्टिक बनवलं, तर त्याहून सुंदर काय असू शकतं? अशाच एका गोड आणि आरोग्यदायी पदार्थाची रेसिपी आज आपण पाहणार आहोत ज्याचं नाव आहे अंजीर हलवा.

भाऊबीजनिमित्त लाडक्या भावासाठी १० मिनिटांमध्ये बनवा तोंडात विरघळणारा इन्स्टंट पेढा, नोट करून घ्या रेसिपी

अंजीर, हे एक अत्यंत पोषक आणि फायबरयुक्त फळ आहे. कोरड्या अंजीरामध्ये भरपूर प्रमाणात लोह, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक साखर असते. अंजीर हलवा हा एक असा पदार्थ आहे, जो गोड असूनही अति गोडसर वाटत नाही, आणि आरोग्यासाठी देखील लाभदायक असतो. हा हलवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. विशेष म्हणजे, या हलव्यात साखर फार कमी लागते किंवा काहीवेळेस अजिबात साखर न घालता फक्त खजूर आणि अंजीराच्या नैसर्गिक गोडव्यावर बनवता येतो. त्यामुळे तो डायबिटिक किंवा हेल्थ कॉन्शस लोकांसाठीही योग्य ठरतो.

साहित्य:

  • सुकवलेले अंजीर – १ कप (सुमारे १०-१२ अंजीर)
  • खजूर (बी काढून) – ½ कप
  • दूध – ½ कप (गरजेनुसार)
  • साजूक तूप – ३-४ टेबलस्पून
  • वेलदोडा पूड – ½ चमचा
  • ड्रायफ्रूट्स (काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड) – आवडीनुसार
  • केशर – काही काड्या (ऑप्शनल)
5 मिनिटांत बनवा हटके आणि हेल्दी ‘ढोकळा चाट’; पारंपारिक स्वादाला झणझणीत ट्विस्ट

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम सुके अंजीर आणि खजूर १५-२० मिनिटे गरम पाण्यात भिजवा.
  • त्यानंतर त्याचं बारीक पेस्ट मिक्सरमध्ये तयार करा. थोडं दूध वापरून गुळगुळीत पेस्ट बनवा.
  • कढईत १ चमचा तूप गरम करून ड्रायफ्रूट्स थोडेसे खरपूस भाजून वेगळे काढा.
  • त्याच कढईत उरलेलं तूप टाकून अंजीर-खजूर पेस्ट मंद आचेवर परतायला सुरुवात करा.
  • पेस्ट चिकट होऊ लागेल आणि त्याचा रंग थोडा गडद होईल. सतत ढवळत राहा.
  • आता त्यात दूध आणि केशर घाला. मिश्रण छान हलव्यासारखं एकजीव करा.
  • तूप सुटायला लागलं आणि कढईला चिकटणं थांबलं की समजावं की हलवा तयार आहे.
  • शेवटी त्यात वेलदोडा पूड आणि भाजलेले ड्रायफ्रूट्स घालून नीट ढवळा.
  • गरम गरम सर्व्ह करा किंवा थंड करून वड्या करून देखील द्यायला छान दिसतो.
  • जर अंजीर फारच सुकलेला असेल, तर रात्रभर दूधात भिजवून मऊ करून घ्या.
  • साखर घालण्याची आवश्यकता नाही, पण अधिक गोड हवं असल्यास १-२ टेबलस्पून साखर घालू शकता.
  • हा हलवा फ्रीजमध्ये ३–४ दिवस टिकतो

Web Title: Bhaubeej 2025 make tasty anjeer halwa at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • easy food recipes
  • sweet dish

संबंधित बातम्या

कोकणी चवीचा पारंपरिक पदार्थ! कच्च्या कोवळ्या फसणापासून बनवा झणझणीत पूस भाजी, नोट करून घ्या रेसिपी
1

कोकणी चवीचा पारंपरिक पदार्थ! कच्च्या कोवळ्या फसणापासून बनवा झणझणीत पूस भाजी, नोट करून घ्या रेसिपी

दिवसाची सुरुवात करा आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पिझ्झा टोस्ट सँडविच, नोट करून घ्या रेसिपी
2

दिवसाची सुरुवात करा आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पिझ्झा टोस्ट सँडविच, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : नाश्ता होईल आणखी मजेदार, घरी बनवा कॅफे स्टाईल ‘वॉफल’, लहानच काय तर मोठेही होतील खुश
3

Recipe : नाश्ता होईल आणखी मजेदार, घरी बनवा कॅफे स्टाईल ‘वॉफल’, लहानच काय तर मोठेही होतील खुश

PCOD पासून केसांपर्यंत…. महिलांसाठी वरदान आहेत हे ‘लाडू’, रेसिपी नोट करा आणि आजपासूनच खायला सुरुवात करा
4

PCOD पासून केसांपर्यंत…. महिलांसाठी वरदान आहेत हे ‘लाडू’, रेसिपी नोट करा आणि आजपासूनच खायला सुरुवात करा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Crime News: रत्नागिरीत खैराच्या अवैध वाहतुकीवर कारवाई; 11 लाखांचा माल जप्त 

Crime News: रत्नागिरीत खैराच्या अवैध वाहतुकीवर कारवाई; 11 लाखांचा माल जप्त 

Mar 09, 2026 | 02:20 PM
Surat Crime: खळबळजनक! मंदिराच्या बाथरूममध्ये दोन तरुणींचे मृतदेह; आत्महत्येपूर्वी ChatGPTला विचारलं आणि…

Surat Crime: खळबळजनक! मंदिराच्या बाथरूममध्ये दोन तरुणींचे मृतदेह; आत्महत्येपूर्वी ChatGPTला विचारलं आणि…

Mar 09, 2026 | 02:18 PM
इशानची गर्लफ्रेंड तर सुर्याची बायको… नजर टाका विश्वचषकाच्या फायनलच्या दिनी खेळाडूंचे परिवारासोबत खास क्षण!

इशानची गर्लफ्रेंड तर सुर्याची बायको… नजर टाका विश्वचषकाच्या फायनलच्या दिनी खेळाडूंचे परिवारासोबत खास क्षण!

Mar 09, 2026 | 02:18 PM
Middle East War : इस्रायलचे बराक ठरले ‘या’ अरब देशाचे कवच; इराणच्या मिसाईल अन् ड्रोन्स खेळ एका झटक्यात खल्लास

Middle East War : इस्रायलचे बराक ठरले ‘या’ अरब देशाचे कवच; इराणच्या मिसाईल अन् ड्रोन्स खेळ एका झटक्यात खल्लास

Mar 09, 2026 | 02:15 PM
World War 3: बांगलादेशमध्ये आणीबाणीची स्थिती! इंधन वाचवण्यासाठी सरकारने उचलले टोकाचे पाऊल; युद्धाचे भीषण परिणाम

World War 3: बांगलादेशमध्ये आणीबाणीची स्थिती! इंधन वाचवण्यासाठी सरकारने उचलले टोकाचे पाऊल; युद्धाचे भीषण परिणाम

Mar 09, 2026 | 02:15 PM
Delhi Liquor Scamची हाय कोर्टात सुनावणी! CBI च्या ‘या’ तीन मागण्या मान्य केल्याने केजरीवालांच्या अडचणी वाढल्या

Delhi Liquor Scamची हाय कोर्टात सुनावणी! CBI च्या ‘या’ तीन मागण्या मान्य केल्याने केजरीवालांच्या अडचणी वाढल्या

Mar 09, 2026 | 02:12 PM
पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर; कुणाकुणाला मिळाली संधी?

पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी जाहीर; कुणाकुणाला मिळाली संधी?

Mar 09, 2026 | 02:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.