आपल्यातील अनेकांना कायमच ॲसिडीटी होते. आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे थोडस सुद्धा सेवन केल्यामुळे अपचनाच्या समस्या वाढू लागतात, आणि सतत आंबट ढेकर, उलट्या, मळमळ इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. आहारात होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे वाढत्या ॲसिडीटीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी या भाज्यांचे सेवन करावे. या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. शरीरात वाढलेले पित्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी पाणीदार भाज्या खाव्यात. चला तर जाणून घेऊया सविस्तर. (फोटो सौजन्य – istock)
जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा 'या' भाज्यांचा समावेश

कोहळ्यात विटामिन सी, फायबर, लोह इत्यादी अनेक घटक असतात. याशिवाय कमी कलरिजयुक्त कोहळा सहज पचन होतो. कोहळ्याच्या वरील साल काढून मध्यम आकारात तुकडे करून भाजी बनवू शकता.

दुधी भोपळ्याची भाजी लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खायला आवडत नाही. पण या भाजीमध्ये असलेले गुणकारी घटक पित्त कमी करतात आणि वाढत्या अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळवून देतात.

पित्तदोष कमी करण्यासाठी पडवळ खावे. हिरव्या मिरचीमध्ये बनवलेली पडवळ भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. याशिवाय पडवळ भाजी सहज पचन होते.

ॲसिडीटीचा त्रास असणाऱ्या लोकांनी आठवड्यातून एकदा तरी गिलक्यांची भाजी खावी. या भाजीमध्ये असलेले शीत गुणधर्म अपचनाचा त्रास कमी करतात.

शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी भोपळ्याची भाजी खावी. भोपळ्यापासून बनवलेले विविध पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात.






