फोटो सौजन्य- istock
नोव्हेंबर महिन्याची सुरुवात लक्ष्मी योगाने होत आहे. चंद्र आणि मंगळ यांच्या युतीत हा योग तयार होत आहे. मंगळ आधीच कर्क राशीत असल्याने चंद्राच्या कर्क राशीतील संक्रमणाच्या वेळी म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मी योग तयार होणार आहे. लक्ष्मी योगामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग शुभ मानला जातो. लक्ष्मी योगाचा फायदा कोणत्या राशींना होणार आहे जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांना नोव्हेंबरच्या सुरुवातीला तुमच्या राशीच्या चौथ्या घरात लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. हा योग तुमच्यासाठी फायदेशीर राहील. बऱ्याच काळापासून तग धरून असलेला निधी परत मिळू शकतो. या काळात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. या शुभ योगामुळे तुम्हाला जमीन आणि इमारतींमध्ये फायदा होऊ शकतो.
व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. विद्यार्थ्यांना या काळात अपेक्षित यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. कामच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात.
कर्क राशींमध्ये लक्ष्मी योग तयार होत आहे. लक्ष्मी-नारायण योग तुमच्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. काही लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. लक्ष्मी योगामुळे तुमचा मानसिक ताणही कमी होऊ शकतो.
तुमच्या वैवाहिक जीवनातही तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होऊ शकते.
कन्या राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग अत्यंत शुभ असणार आहे. हा योग तुमच्या जीवनात सकारात्मक वळण आणू शकतो. नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात अपेक्षित यश मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे तयार होणाऱ्या शुभ योगांपैकी लक्ष्मी योग एक मानला जातो. हा योग धन, समृद्धी आणि आर्थिक प्रगतीशी जोडला जातो.
Ans: या योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, उत्पन्नाच्या नवीन संधी किंवा रखडलेली कामे मार्गी लागण्याचे संकेत असल्याचे ज्योतिषशास्त्रात मानले जाते.
Ans: लक्ष्मी योगाचा फायदा मेष, कर्क आणि कन्या राशींच्या लोकांना होणार आहे






