Diwali Diya Lighting Tips (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिवाळी आली की घरात वेगळीच धावपळ असते. घर साफ करायचं, सजवायचं, अंगणात पणत्या लावायच्या. संध्याकाळी दारात, खिडकीत, गॅलरीत पणत्या लावल्या की घर कसं लख्ख उजळून निघतं. पण एक मोठा त्रास असतो, बाहेरून वारा आला की पणती विझते.
पुन्हा पेटवा, परत विझते. असं सारखं सारखं करून कंटाळा येतो. यंदाच्या दिवाळीत हाच त्रास होत असेल तर सोशल मीडियावर एक वेगळीच ट्रिक फिरतेय. ती बघून सगळे म्हणतायत, अरे हे खरंच होतं का? Diwali Diya Lighting Tips:
Renuka’s Marathi Kitchen Katta यांनी त्यांच्या पेजवर एक व्हिडिओ टाकला आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की वातीच्या टोकाला नेलपेंट लावा. वेगवेगळ्या रंगाचं नेलपेंट लावायचं, ते थोडा वेळ सुकू द्यायचं आणि मग दिवा पेटवायचा. त्यांचं म्हणणं आहे की असं केलं तर वारा आला तरी दिवा विझत नाही, जास्त वेळ तेवत राहतो.
व्हिडिओ बघून बऱ्याच जणींनी ही ट्रिक करून पण बघितली. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नेलपेंट ही ज्वलनशील गोष्ट आहे. म्हणजे ती लगेच पेट घेऊ शकते. त्यामुळे ही ट्रिक करताना जरा जपूनच करायला हवी. आगीशी खेळ नको.
आपण बाजारातून नवीन मातीच्या पणत्या आणतो, त्या तशाच वापरू नका. आधी त्यांच्यावरची धूळ, माती काढून टाका. पाण्याने धुवून घ्या आणि कोरड्या फडक्याने पुसून पूर्ण वाळू द्या. पणतीमध्ये जर थोडं पण पाणी किंवा ओलावा राहिला तर तेल नीट बसत नाही. दिवा पण नीट पेटत नाही. त्यामुळे पणती एकदम कोरडी झाल्यावरच त्यात तेल टाका.
नेलपेंटची ट्रिक करायची नसेल तर दुसरे सोपे आणि सुरक्षित उपाय पण आहेत. ते करून बघा.
1. काचेचं कव्हर वापरा
बाहेरच्या पणतीवर काचेचं कव्हर ठेवा किंवा कंदिलासारखा बंद दिवा वापरा. त्यामुळे थेट वारा लागत नाही आणि ज्योत शांत तेवते. पण ज्योत आणि काचेमध्ये थोडं अंतर ठेवा, नाहीतर काच गरम होईल.
2. वात नीट ठेवा
खूप मोठी वात लावली तर ज्योत मोठी होते आणि तेल पण लवकर संपतं. खूप छोटी वात लावली तर दिवा लवकर विझतो. त्यामुळे पणतीच्या आकाराला शोभेल अशी मध्यम कापसाची वात वापरा.
3. पणती ठेवायची जागा महत्वाची
खिडकीच्या अगदी कडेला, दरवाजाजवळ जिथे जोराचा वारा येतो तिथे पणती ठेवू नका. सपाट, स्थिर जागेवर ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, पडदे, कागदाची सजावट, फुलं यापासून पणती लांब ठेवा. नाहीतर अपघात होऊ शकतो.
दिवाळीत घर सजवणं जितकं महत्वाचं आहे, तितकीच सुरक्षितता पण महत्वाची आहे. सोशल मीडियावर रोज नवीन नवीन जुगाड येत असतात. सगळेच जुगाड घरी करून बघायला हवेत असं नाही. जिथे आग, तेल, मेणबत्ती आणि केमिकलचा संबंध येतो तिथे तर जास्तच काळजी घ्या.नेलपेंटची ट्रिक भारी वाटत असली तरी आधी एका पणतीवर करून बघा, लांबून बघा, आणि मगच सगळ्या पणत्यांना लावा. दिवाळी आनंदाची जावी, टेन्शनची नको.
Ans: वातीच्या टोकाला वेगवेगळ्या रंगांचे नेलपेंट लावून ते सुकवल्यानंतर पणती पेटवण्याची ट्रिक व्हिडिओमध्ये दाखवली आहे.
Ans: नाही. नेलपेंट ज्वलनशील असल्याने आगीचा धोका निर्माण होऊ शकतो.
Ans: काचेचे योग्य कव्हर वापरा, मध्यम आकाराची वात ठेवा आणि पणती वाऱ्यापासून सुरक्षित जागी ठेवा.






