
सफरचंद सोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन
निरोगी जीवनशैली जगण्यासाठी नियमित एक सफरचंद खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सफरचंद खाल्यामुळे आजरांपासून शरीराचे नुकसान होत नाही. त्यामुळे रोजच्या आहारात एक तरी सफरचंद खावेच. सफरचंदमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स, आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच यामध्ये जीवनसत्त्वे, फायबर, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी गुणधर्म आढळून येतात. सफरचंद खाल्यामुळे शरीरातील अशक्तपणा कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते. पण सफरचंद खाल्यानंतर काही ठरविक पदार्थ खाल्यास पोटाचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सफरचंद खाल्यानंतर कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: रात्री Vitamin-E च्या कॅप्सूलचा असा करा फायदा, त्वचा जाईल उजळून
सफरचंद खाल्यानंतर लगेच दूध किंवा दह्याचे सेवन करू नये. यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. कारण सफरचंदमध्ये असलेले फायबर आणि दुधामध्ये असलेले प्रोटीन पोटात एकत्र झाल्यामुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. पचनक्रिया पूर्णपणे मंदावते. यामुळे गॅस, अपचन किंवा असिडिटीचा त्रास निर्माण होतो. त्यामुळे सफरचंद खाल्यानंतर लगेच दूध किंवा दही खाऊ नये.
सफरचंद आणि कच्च्या भाज्यांचे सेवन अतिशय चुकीचे आहे. सफरचंद खाल्यानंतर कच्च्या भाज्या खाल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. कच्च्या भाज्या पचनास जड असतात. त्यामुळे फळे खाल्ल्यानंतर लगेच भाज्यांचे सेवन करू नये. या दोन्ही पदार्थांचे एकत्र सेवन केल्यामुळे पोटात दुखणे किंवा पोट फुगणे इत्यादी समस्या जाणवू लागतात.
विटामिन सी युक्त आंबट फळे खाल्यानंतर पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सफरचंद खाल्यानंतर लगेच आंबट फळांचे सेवन करू नये. यामध्ये लिंबू, संत्री, मोसंबी इत्यादी आंबट फळे खाऊ नयेत. हे पदार्थ एकत्र खाल्यामुळे सायट्रिक अॅसिड आणि फायबर एकत्र होते ज्यामुळे पोटात विषारी पदार्थ तयार होतात.
हे देखील वाचा: बडीशेपचा चहा प्यायल्याने मिळतील इतके सारे फायदे
सफरचंद किंवा इतर फळे खाल्यानंतर लगेच मसालेदार किंवा तेलकट पदार्थांचे सेवन करू नये. यामुळे पोटामध्ये विषारी पदार्थ तयार होण्याची शक्यता असते. सफरचंद पचण्यास वेळ लागतो. त्यामुळे सफरचंद खाल्याच्या एक किंवा दोन तासाने इतर कोणतेही फळ किंवा पदार्थांचे सेवन करावे. सफरचंद खाल्यानंतर इतर कोणत्याही पदार्थांचे सेवन लगेच करू नये.