Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वातावरणातील बदलांमुळे चेहरा तेलकट होतो? त्वचेवरील तेल कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय, त्वचा होईल फ्रेश

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चेहऱ्यावर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते. हे तेल कमी करण्यासाठी घरगुती उपाय करून त्वचेची योग्य काळजी घ्यावी. जाणून घ्या तेलकट त्वचेची कशी काळजी घ्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 05, 2025 | 09:53 AM
त्वचेवरील तेल कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय

त्वचेवरील तेल कमी करण्यासाठी करा 'हे' उपाय

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात बदल होत असतो. ढगाळ वातावरण, दमटपणा आणि ओलाव्यामुळे त्वचा अतिशय चिकट आणि तेलकट होऊन जाते. त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्स किंवा मोठे मोठे फोड येतात. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी स्किन केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारातील महागडे प्रॉडक्ट वापरले जातात. मात्र यामुळे बऱ्याचदा त्वचेचे आणखीन नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची योग्य काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात तेलकट त्वचेची कशी काळजी घ्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे त्वचेवर पिंपल्स किंवा मोठे फोड येणार नाहीत.

भाजल्यानंतर हातांवर पडलेले डाग एका रात्रीतच करा दूर; डॉक्टरांनी सांगितला आयुर्वेदिक उपाय

चेहरा पाण्याने स्वच्छ धुवणे:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर जमा झालेले तेल त्वचेच्या छिद्रांमध्ये तसेच साचून राहते. ज्यामुळे पिंपल्स किंवा फोड येतात. हे फोड येऊ नये म्हणून सगळ्यात आधी त्वचा स्वच्छ करणे आवश्यक आहे. दिवसभरात दोन किंवा तीन वेळा चेहरा फेसवॉश लावून स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होईल. पावसाळ्यात घामामुळे त्वचा अधिकच खराब होऊन जाते. अशावेळी त्वचा स्वच्छ करण्यासाठी जेल-बेस्ड सॅलिसिलिक अ‍ॅसिड असलेले फेसवॉश वापरावे.

टोनरचा नियमित वापर:

घाईगडबडीमध्ये अनेक महिला चेहऱ्यावर टोनर लावत नाहीत. पण असे न करता नियमित चेहऱ्यावर टोनर लावावे. यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल. टोनर लावल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि पोर्सही टाइट होण्यास मदत होते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही गुलाबजल किंवा अ‍ॅस्ट्रिजेंट टोनरचा वापर करू शकता. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली धूळ माती निघून जाईल.

मॉइश्चरायजर लावणे:

त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवणे नियमित मॉइश्चरायजर लावणे गरजेचे आहे. स्किन केअर करताना टोनर लावून झाल्यानंतर मॉइश्चरायजर लावावे. यामुळे तेलकट होत नाही. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो ऑइल-फ्री मॉइश्चरायजरचा वापर करावा. ज्यांची त्वचा अतिशय तेलकट किंवा चिकट आहे अशांनी जेल बेस्ट मॉइश्चरायजर लावावे.(फोटो सौजन्य – istock)

डोळ्यांखाली आलेले काळे डाग कायमचे होतील गायब! स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाने नियमित करा मसाज, त्वचा वाटेल फ्रेश

भरपूर पाणी प्यावे:

शरीर कायमच हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि त्वचेवर कोणतेही पिंपल्स किंवा ऍक्ने येत नाही. पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. पाणी त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते. याशिवाय आहारात हिरव्या पालेभाज्या आणि ताज्या फळांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do these remedies to reduce oil on the skin monsoon skin care tips oily skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2025 | 09:53 AM

Topics:  

  • home remedies
  • oily skin
  • skin care tips

संबंधित बातम्या

सुगंधी कढीपत्याच्या पानांचे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना होतील भरमसाट फायदे, ‘या’ पद्धतीने करा पानांचे सेवन
1

सुगंधी कढीपत्याच्या पानांचे शरीरासोबतच त्वचा आणि केसांना होतील भरमसाट फायदे, ‘या’ पद्धतीने करा पानांचे सेवन

Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा कायमच राहील ताजी टवटवीत! ‘या’ साध्या सोप्या सवयी त्वचा करतील सुंदर
2

Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचा कायमच राहील ताजी टवटवीत! ‘या’ साध्या सोप्या सवयी त्वचा करतील सुंदर

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस
3

स्वयंपाकघरातील ही चिमूटभर पावडर डायबिटीजला ठेवेल नियंत्रणात, सटासट कमी होईल रक्तातील साखरेचे प्रमाण; स्वतः डॉक्टरांनी केली शिफारस

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय
4

फक्त 5 रुपये खर्च करा आणि 7 दिवसांतच चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या दूर करा, तरुण त्वचेसाठी प्रभावी घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.