Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ear Care: सावधान! कॉटन बडने कान साफ करता? ही सवय ठरू शकते धोकादायक

तुम्हालाही कॉटन बडने साफ करण्याची सवय आहे का? तसं असेल तर तुम्ही सावध रहायला पाहिजे. कारण तज्ज्ञांनी याबाबत सर्वांना इशारा दिला आहे. नक्की काय सांगत आहेत तज्ज्ञ

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 17, 2026 | 04:36 PM
कानातील मळ काढताना कॉटन बड्स वापरता का (फोटो सौजन्य - iStock)

कानातील मळ काढताना कॉटन बड्स वापरता का (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • तुम्हीही कान साफ करण्यासाठी कॉटन बड वापरता का?
  • कानात यामुळे नक्की काय त्रास होतो
  • तज्ज्ञ काय सांगतात 
अनेकांना कानातील मळ (Earwax) म्हणजे घाण वाटते आणि तो वारंवार काढून टाकला पाहिजे, असा एक गैरसमज असतो. त्यामुळे अनेक जण दररोज किंवा वारंवार कान साफ करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, प्रत्यक्षात कानातील मळ हा कानाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो नैसर्गिक संरक्षण कवच म्हणून काम करतो. त्यामुळे तो विनाकारण किंवा वारंवार काढणे कानासाठी हानिकारक ठरू शकते.

कानातील मळाला वैद्यकीय भाषेत सेरुमेन असे म्हणतात. हा कानाच्या नलिकेतील ग्रंथींमधून नैसर्गिकरित्या तयार होतो. अनेकजण कानातील मळ दिसताच तो अस्वच्छ असल्याचे समजून कापसाच्या काडीने (कॉटन बड्स), इअरबड्स किंवा इतर टोकदार वस्तूंचा वापर करून कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ही सवय धोकादायक ठरू शकते. डॉ. सलोनी राजगुरू, कान, नाक, घसा तज्ज्ञ, झायनोवा शाल्बी हॉस्पिटल, घाटकोपर, मुंबई यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

Health Tips: रात्रभर Earbuds लावून झोपता? कानांसाठी ‘ही’ सवय ठरू शकते धोकादायक

नक्की काय त्रास होतो 

कानातील मळ हा कानाच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहे. तो धूळ, घाण, जंतू आणि अगदी लहान कीटकही कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखतो. याशिवाय तो कानाच्या आतील त्वचेला ओलावा देतो, त्यामुळे कोरडेपणा, खाज आणि त्वचेची जळजळ होण्याचा धोका कमी होतो.

कोणती काळजी घ्यावी 

कॉटन बड्स किंवा इतर टोकदार वस्तूंनी कान साफ करताना मळ बाहेर येण्याऐवजी अधिक आत ढकलला जाऊ शकतो. त्यामुळे कानात मळ साचणे, कानदुखी, ऐकू कमी येणे, कानात सतत आवाज येणे (टिनिटस), चक्कर येणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये कानाच्या पडद्यालाही इजा होण्याची शक्यता असते.

कानातील मळ केवळ तो ऐकण्यावर परिणाम करत असेल, कान भरल्यासारखे वाटत असेल, वेदना होत असतील, सतत कानात आवाज येत असेल किंवा डॉक्टरांनी त्याची गरज सांगितली असेल, तरच तो काढण्याची आवश्यकता असते. अन्यथा, कान स्वतःची स्वच्छता नैसर्गिकरित्या करत असतो.

का वाढतेय बहिरेपणाची समस्या? कशी घ्याल तुमच्या कानाची काळजी? तुम्हाला कानाविषयी हे माहिती आहे का?

कानाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

  • कानाच्या आत कॉटन बड्स, हेअरपिन, चावी किंवा इतर कोणतीही टोकदार वस्तू घालू नका
  • कानाचा फक्त बाहेरील भाग मऊ, स्वच्छ आणि ओलसर कापडाने हलक्या हाताने पुसा
  • कान जोरात घासू नका
  • कानदुखी, कानातून स्त्राव येणे, ऐकण्यास त्रास होणे किंवा कान बंद झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसल्यास स्वतः उपचार करण्याऐवजी त्वरित ईएनटी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
लक्षात ठेवा, कानातील मळ ही घाण नसून कानाच्या आरोग्याचे नैसर्गिक संरक्षण करणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वारंवार कान साफ करण्याची सवय टाळा आणि गरज असल्यासच तज्ज्ञांच्या सल्ल्याने कान स्वच्छ करून घ्या

Web Title: Do you clean your ears with cotton buds habit could prove dangerous

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • ear infection
  • Health Tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
2

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
3

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत
4

Teeth Infection: अक्कल दाढेचा त्रास की हिरड्यांमधील इन्फेक्शन? चावताना वेदना होत असतील, वेळीच ओळखा संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.