Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा थंड पाणी पिता? शरीरावर होतील अनेक गंभीर दुष्परिणाम, वाढेल हृदयाची गती

फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्यामुळे शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात. पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता, सर्दी खोकला इत्यादी आजार होऊन शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 01, 2025 | 08:35 AM
उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा थंड पाणी पितात? शरीरावर होतील अनेक गंभीर दुष्परिणाम

उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा थंड पाणी पितात? शरीरावर होतील अनेक गंभीर दुष्परिणाम

Follow Us
Follow Us:

उन्हाळा सुरु झाल्यानंतर सगळ्यांच घरांमध्ये थंड पाणी प्यायले जाते. फ्रिजमधील किंवा मातीच्या मडक्यातील थंड पाणी प्यायले जाते. सर्वच ऋतूंमध्ये पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. पण अनेकांना नेहमीच बाहेरून आल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय असते. पण नेहमी नेहमी फ्रिजमधील थंड पाणी पिणे आरोग्यासाठी घातक आहे. उन्हाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी पिण्याऐवजी नारळ पाणी, ताक, दही, फळांचा रस इत्यादी पेयांचे सेवन करावे. या पेयांच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. याशिवाय शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन आरोग्य सुधारते. नियमित 7 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर निरोगी राहते.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात कपड्यांना सतत घामाचा वास येतो? त्वचेवरील इन्फेक्शन टाळण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा ट्राय, दुर्गंधी होईल गायब

दैनंदिन आहारात नेहमीच फ्रिजमधील थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. याशिवाय आयुर्वेदामध्ये थंड पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. त्यामुळे अनेकदा डॉक्टरसुद्धा थंड पाणी न पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आज आम्ही फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

फ्रिजमधील थंड पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम:

हृदयाची गती वाढते:

फ्रिजमधील थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे हृदयाची गती वाढण्याची शक्यता असते. याशिवाय हृदयाच्या कार्यात अडथळे येऊ शकतात. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे व्हॅगस मज्जातंतूवर परिणाम होऊन काहीवेळा हृदयाची गती वाढते किंवा कमी होऊन जाते. याशिवाय शरीराच्या रक्त भिसरणात अनेक अडथळे निर्माण होतात. चक्कर येणे, थकवा येणे आणि अशक्तपणा इत्यादी समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. थंड पाण्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम लगेच दिसून येतो.

बद्धकोष्ठतेची समस्या:

थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता किंवा आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. थंड पाण्याच्या सेवनामुळे पचनक्रिया पूर्णपणे मंदावते आणि आतडयांना हानी पोहचण्याची शक्यता असते. अन्नपदार्थ पचन होण्यास अतिशय जड जातात. आतड्यांची हालचाल मंदावते, आतडे आकुंचन पावणे किंवा आतड्यांच्या हालचालींमध्ये बदल दिसून येतो.

गरोदरपणात सी-सेक्शन प्रसूती टाळण्यासाठी दैनंदिन आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, शरीराला होतील फायदे

घसा खवखवणे:

थंड पाणी प्यायल्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. फ्रिजमधील थंड पाण्याचा शरीरावर लगेच परिणाम दिसून येतो. त्यामुळे घशात सूज, जळजळ किंवा वेदना जाणवू लागतात. या सर्व वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी थंड पाण्याचे सेवन करू नये. थंड पाण्याचे सेवन केल्यास वारंवार खोकला लावून घशातील इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do you drink cold water in summer beware of serious health risks and increased heart rate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • side effect
  • summer care tips

संबंधित बातम्या

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
1

बद्धकोष्ठतेमुळे शौचाला जोर लावावा लागतोय? ‘या’ समस्यांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर
2

Health Update: टीबी निदानासाठी ‘नॅट’ चाचणी वापर वाढवण्याची गरज! ग्रामीण भागात जुन्या तंत्रज्ञानाचा वापर

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे
3

वाढलेल्या वजनाने त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा भिजवलेल्या काळ्या मनुक्यांचे सेवन, शरीराला होतील भरमसाट फायदे

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक
4

दिवसभरात किती वेळात चहा प्यावा? जास्त वेळ ठेवलेला चहा ठरू शकतो आरोग्यासाठी धोकादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.