
डेंग्यूच्या एलायझा नोंदींत १३, तर लेप्टोमध्ये ३९% घट! डेंग्यूचा सप्टेंबरमध्ये, तर लेप्टोचा ऑगस्टमध्ये उच्चांक
Health Update: मुंबईत पावसाळ्यात डेंग्यू आणि लेप्टोचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी मागील वर्षांच्या तुलनेत २०२६ मध्ये या दोन्ही आजारांच्या एलायझा चाचण्यांशी संबंधित नोंदींमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ आणि याच कालावधीतील २०२६ च्या आकडेवारीची तुलना केली असता डेंग्यूच्या नोंदींमध्ये १२.७ टक्के, तर लेप्टोच्या नोंदींमध्ये ३८.६ टक्के घट झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांना माहिती अधिकारातून मिळालेल्या पाच वर्षांच्या आकडेवारीतून हे चित्र स्पष्ट झाले आहे. २०२५ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत डेंग्यूच्या एलायझा नोंदी ५,१०७ होत्या.(फोटो सौजन्य – istock)
Women health: महिलांमध्ये गुडघेदुखीची समस्या का वाढतेय? जाणून घ्या कारणे आणि वेळीच करा हे उपाय
२०२६ मध्ये याच कालावधीत त्या ४,४५७ झाल्या. म्हणजेच ६५० नोंदींची घट झाली. लेप्टोच्या बाबतीत २०२५ मध्ये याच कालावधीत ७०० ७०० नोंदी होत्या. २०२६ मध्ये ही संख्या ४३० वर आली. म्हणजेच २७० नोंदी कमी झाल्या. मात्र, महिनानिहाय आकडेवारी पाहता पावसाळ्यात दोन्ही आजारांच्या नोंदींमध्ये चढ-उतार दिसून येतात. २०२६ मध्ये डेंग्यूच्या नोंदी जूनमध्ये २६६ होत्या. जुलैमध्ये ४६६, ऑगस्टमध्ये ८३१ आणि सप्टेंबरमध्ये १,३७८ पर्यंत पोहोचल्या. ऑक्टोबरमध्ये त्या १,०२१ झाल्या. लेप्टोच्या नोंदींमध्ये जूनमधील ३३ वरून जुलैमध्ये ७८ आणि ऑगस्टमध्ये १४४ पर्यंत वाढ झाली. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये प्रत्येकी ३१ नोंदी झाल्या.
या आकडेवारीत डेंग्यू एलायझा आणि लेप्टो एलायझा या प्रयोगशाळेतील चाचणी पद्धतींचा स्वतंत्रपणे उल्लेख आहे. एलायझा म्हणजे ‘एन्झाइम-लिंक्ड इम्युनोसॉर्बेट असे’ असें असून या पद्धतीचा वापर विशिष्ट प्रतिजन किंवा प्रतिपिंडे शोधण्यासाठी केला जातो. त्यामुळे रॅपिड टेस्टच्या आकडेवारीपेक्षा एलायझा चाचण्यांशी संबंधित नोंदी वेगळ्या समजणे आवश्यक आहे. एकूणच, मागील वर्षाच्या तुलनेत २०२६ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत दोन्ही आजारांच्या नोंदी कमी झाल्या असल्या, तरी पावसाळ्यातील ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये डेंग्यू आणि ऑगस्टमध्ये लेप्टोच्या नोंदींत स्पष्ट दिसून येते.
Ans: डेंग्यू हा संक्रमित एडिस डासाच्या चाव्यामुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे. तर लेप्टोस्पायरोसिस हा संक्रमित प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित झालेल्या पाणी किंवा मातीच्या संपर्कातून पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे.
Ans: अचानक तीव्र ताप येणे, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ आणि अंगावर पुरळ येणे ही डेंग्यूची सामान्य लक्षणे आहेत.
Ans: ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थंडी वाजणे, उलट्या आणि डोळे लाल होणे ही लेप्टोची प्रमुख लक्षणे आहेत. गंभीर स्थितीत किडनी आणि यकृतावर परिणाम होऊ शकतो.