खराब कोलेस्ट्रॉल वाढवणाऱ्या 'या' पदार्थांमुळे जीवन येईल धोक्यात
कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?
कोणत्या पदार्थांच्या सेवनामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढते?
कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून काय खावे?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात सतत होणारे बदल, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता, वारंवार उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्या आणि जंक फूडचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे कायमच आहारात सहज पचन आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. हल्ली कोणत्याही वयात हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होऊन आरोग्य बिघडते. केवळ लठ्ठपणामुळे नाहीतर आहारात होणाऱ्या बदलांमुळे सुद्धा शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
छातीत साचून राहिलेला कफ होईल मोकळा! नियमित चघळून खा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, कायमचा मिळेल आराम
खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर सुरुवातीला अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र कालांतराने शरीरात गंभीर लक्षणे दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या याच लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्यामुळे शरीराला हानी पोहचते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तात वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून आरोग्य बिघडते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हृदयविकाराच्या झटक्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे.
आपल्यातील अनेकांना सकाळच्या नाश्त्यात सतत काहींना काही तेलकट तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. समोसे, कचोरी, फ्रेंच फ्राइज, पॅकेटमधले चिप्स किंवा इतर तिखट पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. ट्रान्स फॅट्स शरीरासाठी विषासमान मानले जातात. या पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तात वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी जमा होण्यास सुरुवात होते. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कायमच चांगल्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
आपल्यातील अनेकांना चिकन, मटण खायला खूप जास्त आवडते. पण आवडीने खाल्लेले जाणारे शाहाकारी पदार्थ शरीरासाठी काहीवेळा अतिशय घातक ठरतात. या पदार्थांमध्ये असलेले घटक शरीरासाठी विष आहेत. कारण लाल मांस खाल्ल्यामुळे शरीराला धोका निर्माण होतो. यामध्ये असलेल्या सॅच्युरेटेड फॅटसमुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढते. त्यामुळे रोजच्या आहारात प्रोसेस्ड मीट सॉसेज, सलामी, हॉटडॉग्स इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.
रोजच्या आहारात ताजी फळे, पालेभाज्या आणि दूध, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. ओट्स, हिरव्या भाज्या, फळं आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी पदार्थांमध्ये चांगले फॅट्स असतात. हे पदार्थ रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. आहारात कायमच डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीर स्वच्छ राहील.
Ans: कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तातील एक मेणासारखा, चरबीसारखा पदार्थ आहे, जो शरीरातील पेशी आणि हार्मोन्ससाठी आवश्यक असतो.
Ans: उच्च कोलेस्ट्रॉलची सहसा कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, म्हणून याला 'सायलेंट किलर' म्हणतात.
Ans: फळे, भाज्या, ओट्स, कडधान्ये, मासे, नट्स, बिया यांचा आहारात समावेश करा.






