Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तासंतास लघवी रोखून धरता? चुकीच्या सवयींमुळे महिलांना होऊ शकते ‘या’ गंभीर आजारांची लागण, वेळीच व्हा सावध

तासंतास लघवी रोखून धरल्यामुळे मूत्राशय निकामी होणे, लघवी मार्गात इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वेळीच लघवीला जाणे शरीरासाठी फायदेशीर आहे. जाणून घ्या लघवीसंबंधित आजार कशामुळे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 14, 2026 | 07:56 AM
तासंतास लघवी रोखून धरता? चुकीच्या सवयींमुळे महिलांना होऊ शकते 'या' गंभीर आजारांची लागण, वेळीच व्हा सावध

तासंतास लघवी रोखून धरता? चुकीच्या सवयींमुळे महिलांना होऊ शकते 'या' गंभीर आजारांची लागण, वेळीच व्हा सावध

Follow Us
Follow Us:

स्त्रियांनी जास्त वेळ लघवी का रोखून धरू नये?
लघवीसंबंधित आजार कशामुळे होतात?
मूत्राशय निकामी होण्याची कारणे?

सर्वच महिला कामाच्या धावपळीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. सतत काम, कौटुंबिक जबाबदाऱ्या, पोषक घटकांचा अभाव आणि बिघडलेले मानसिक आरोग्य शरीरावर थेट परिणाम करते. पण शरीराच्या नैसर्गिक गरजांकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. तासंतास एका जागेवर बसून राहिल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची जास्त शक्यता असते. महिला कामाच्या घाईमध्ये किंवा स्वच्छते अभावी लघवी रोखून धरतात. पण असे केल्यामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. पण कालांतराने समस्या अतिशय गंभीर होतात आणि संपूर्ण आरोग्य बिघडून टाकतात. स्त्रिया अतिशय सामान्य वाटणारी समस्या भविष्यातील आजारांचे गंभीर कारण बनते.(फोटो सौजन्य – istock)

Belly Fat: सुटलेले पोट होईल फ्लॅट! जिमचीही गरज नाही, घरीच करा ‘हे’ सोपे व्यायाम

तासंतास लघवी रोखून धरल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात. लघवीवाटे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होते. पण वेळीच लघवीला न गेल्यामुळे विषारी घाण तशीच शरीरात साचून राहते, ज्याच्या परिणामामुळे किडनीसंबंधित आजार किंवा लघवीसंबंधित आजारांचा सामना करावा लागतो. महिलांनी तासंतास लघवी रोखून धरल्यास शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात आणि आरोग्य बिघडते. आज आम्ही तुम्हाला तासंतास लघवी रोखून धरल्यामुळे शरीराला कोणत्या आजारांची लागण होऊ शकते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे महिलांनी चुकीच्या सवयी सोडून शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.

स्त्रियांनी जास्त वेळ लघवी का रोखून धरू नये?

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन:

शरीरातील विषारी घाण लघवीवाटे बाहेर पडून जाते. पण हेच विषारी घटक वेळीच बाहेर पडून न गेल्यास किडनीचे आरोग्य बिघडण्यासोबतच महिलांना इतर गंभीर आजारांची लागण होऊ शकते. दीर्घकाळ लघवी रोखून धरल्यामुळे जिवाणूंना वाढण्यास पुरेसा वेळ मिळतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यानंतर लघवी करताना जळजळ होणे, वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे, पोटाच्या खालच्या भागात दुखणे किंवा लघवीला दुर्गंधी येणे तसेच लघवीच्या रंगात असामान्य बदल जाणवू लागतो. त्यामुळे शरीरात वरील लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे.

मुत्राशयाच्या आरोग्यावर परिणाम:

ज्यावेळी तुम्ही तासंतास लघवी रोखून धरता तेव्हा मूत्राशयावर दबाव पडतो. सामान्य क्षमतेपेक्षा जास्त दबाव पडल्यामुळे महिलांना लघवी करताना किंवा लघवी झाल्यानंतर वेदना होतात. मूत्राशय पूर्णपणे रिकामे न वाटणे किंवा वारंवार लघवीला येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. यामुळे मूत्राशयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.लघवीला तासंतास न गेल्यामुळे UTI चा धोका वाढतो. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास संसर्ग किडनीपर्यंत पोहचण्याची शक्यता असते.

आतड्यांमध्ये साचलेली विषारी घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा डिटॉक्स ड्रिंक, वजन होईल कमी

डॉक्टरांच्या मते, तासंतास लघवी थांबवून ठेवणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे किडनीमध्ये खडे सुद्धा होतात. लघवी रोखून धरल्यामुळे स्नायूंवर जास्तीचा तणाव पडतो. हा तणाव कायम टिकून राहिल्यास युरिनरी इनकंटिनन्स होऊन खोकल्यावर किंवा शिंकल्यावर लघवी गळण्याची समस्या उद्भवू शकते. मूत्राशयाचे आकुंचन-प्रसरण व्यवस्थित न झाल्यामुळे मूत्राशय निकामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे कामाच्या धावपळीमधून सुद्धा स्वतःच्या शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लघवी जास्त वेळ रोखून धरल्यास कोणते धोके संभवतात?

    Ans: लघवी दीर्घकाळ रोखल्याने मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI), मूत्राशयाचा दाह, किडनी इन्फेक्शन आणि मूत्राशय कमकुवत होण्याचा धोका वाढू शकतो.

  • Que: महिलांना UTI होण्याचा धोका अधिक का असतो?

    Ans: महिलांचा मूत्रमार्ग लहान असल्यामुळे जीवाणूंना मूत्राशयापर्यंत पोहोचणे सोपे जाते. त्यामुळे लघवी रोखून धरण्याची सवय संसर्गाचा धोका वाढवते.

  • Que: लघवी किती वेळ रोखणे सुरक्षित आहे?

    Ans: लघवीची तीव्र इच्छा झाल्यानंतर ती शक्य तितक्या लवकर करणे योग्य आहे. वारंवार किंवा तासन्तास लघवी रोखणे टाळावे.

Web Title: Do you hold in your urine for hours bad habits can put women at risk of these serious ailments be cautious in time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 07:56 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • infections
  • women health

संबंधित बातम्या

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय
1

लहान वयात का वाढते लठ्ठपणाची समस्या! वाडिया रुग्णालयात तीन वर्षांत ३०० बालरुग्णांची नोंद, पालकांसाठी चिंतेचा विषय

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात
2

Unhealthy Foods: ‘हे’ पदार्थ शरीरासाठी ठरतात अतिशय हानिकारक! वजन वाढण्यासोबतच हृदयाचे आरोग्य येईल धोक्यात

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन
3

Liver Detox Juices: आतून सडलेले लिव्हर मुळांपासून होईल स्वच्छ! Liver स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे
4

High Cholesterol: औषधांचे सेवन न करता कमी होईल खराब कोलेस्ट्रॉल! जाणून घ्या दैनंदिन आहारात कोणते पदार्थ खावे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.