Liver Damage: लिव्हर खराब होण्यापूर्वी शरीर देतं ‘हे’ संकेत; वेळीच व्हा सावध, नाहीतर वाढू शकतो धोका
प्लँक हा कोअर स्नायूंना मजबूत करणारा प्रभावी व्यायाम मानला जातो. शरीर सरळ ठेवून काही सेकंद ही स्थिती कायम ठेवल्यास पोट, पाठ आणि खांद्यांवर चांगला ताण येतो. सुरुवातीला २० ते ३० सेकंदांपासून सुरुवात करून हळूहळू वेळ वाढवू शकता.
हा व्यायाम संपूर्ण शरीर अॅक्टिव्ह करतो आणि कॅलरी बर्न करण्यास मदत करतो. या व्यायामामद्ये हात जमिनीवर ठेवून एकामागोमाग गुडघे छातीकडे वेगाने आणण्याची क्रिया केली जाते. यामुळे पोटावरील स्नायूंवर चांगला परिणाम होतो.
पाठीवर झोपून दोन्ही पाय सरळ वर उचलणे आणि हळूहळू खाली आणणे हा व्यायाम खालच्या पोटावरील स्नायूंना बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरतो. हा व्यायाम नियंत्रित गतीने करणे महत्त्वाचे आहे.
या व्यायामात सायकल चालवल्यासारखी हालचाल करत कोपर आणि विरुद्ध गुडघा एकमेकांच्या दिशेने आणला जातो. त्यामुळे पोटाच्या बाजूच्या स्नायूंवरही प्रभाव पडतो.
फक्त व्यायाम करून अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. संतुलित आणि पौष्टिक आहार, साखर व प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खाणे, पुरेसे पाणी पिणे, नियमित झोप घेणे आणि रोज किमान ३० मिनिटे शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे. कोणतीही आरोग्य समस्या असल्यास किंवा दीर्घकाळ व्यायाम केला नसेल, तर नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे योग्य ठरते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






