Recipe : भाजी काय बनवावी ते सुचत नाहीये? मग चिंता सोडा आणि घरी बनवा रसरशीत ‘पापडाची भाजी’
Papad Subji Recipe : भारताच्या अनेक भागात पापडाची चमचमीत भाजी तयार करुन खाल्ली जाते. याची चव फार अप्रतिम लागते आणि रेसिपी फार झटपट तयार होते. तुम्ही ही डिश ट्राय केली नसेल तर एकदा नक्की बनवून खा.
तुम्हाला माहिती आहे का? पापडाची भाजी देखील बनवली जाते
भारतीय पदार्थांना साथ देणारा आणि जेवणाची चव वाढवणारा फेमस कुरकुरीत पदार्थ म्हणजे पापड. आपण आजवर पापडला भाजून किंवा टाळून खाल्लं आहे पण तुम्हाला माहिती आहे का पापडाची मसालेदार भाजी देखील बनवली होते. विशेषत: जेव्हा घरी भाजी नसते, बाजारात जायची इच्छा नसते किंवा अचानक पाहुणे येतात, तेव्हा पापडाची भाजी म्हणजे तारणहार ठरते. कुरकुरीत पापड मसालेदार रसात मऊ होत जातात आणि तयार होते एकदम घरगुती, साधी पण अतिशय स्वादिष्ट डिश. ही भाजी बनवायला अत्यंत कमी वेळ आणि साधे साहित्य लागते. शिवाय पापडाची भाजी गरम भात, चपाती, भाकरी किंवा अगदी खिचडीसोबतही मस्तच लागते. परंपरेतून आलेली ही भाजी आपल्या दैनंदिन स्वयंपाकात एक वेगळाच आनंद देते. चला या रेसिपीसाठी लागणारे आवश्यक साहित्य आणि कृती नोट करून घेऊया.