त्वचेवरील इन्फेक्शन टाळण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की करा ट्राय
वाढत्या उन्हाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरासह त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळा वाढल्यानंतर घामामुळे त्वचेवर सतत खाज येणे, अंगावर घामोळं येणे, त्वचा लाल होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात. मात्र त्वचेसंबंधित समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची शक्यता असते. सतत येणाऱ्या घामामुळे अंगावर खाज येऊन काहीवेळा कपडे देखील खराब होऊन जातात. सतत आलेल्या घामामुळे शरीर पूर्णपणे चिकट आणि तेलकट होऊन जाते. केस ओले होऊन अंग पूर्ण घामाने भिजते. तर काहीवेळा घामाचा वास संपूर्ण शरीराला येऊ लागतो.(फोटो सौजन्य – iStock)
गरोदरपणात सी-सेक्शन प्रसूती टाळण्यासाठी दैनंदिन आहारात करा ‘या’ फळांचे सेवन, शरीराला होतील फायदे
घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक महिलांसह पुरुषदेखील बाजारात उपलब्ध असलेले सुंगधी अत्तर किंवा स्प्रेचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा घामामुळे वाढलेली दुर्गंधी कमी होत नाही. आधीकाळ घाम त्वचेमध्ये टिकून राहिल्यामुळे त्वचेवर हानिकारक बॅक्टरीया तयार होतात, ज्यामुळे त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास त्वचा दुर्गंधीविरहित होईल आणि त्वचा अधिक स्वच्छ राहील.
पूर्वीच्या काळापासून कडुलिंबाचा वापर औषध म्हणून केला जात आहे. यामध्ये असलेले घटक त्वचा. केस आणि संपूर्ण शरीराचे कार्य निरोगी ठेवते. यासाठी अंघोळीच्या पाण्यात तुम्ही कडुलिंब टाकून अंघोळ करू शकता. यामुळे शरीरावर चिटकून राहिलेले हानिकारक बॅक्टरीया नष्ट होतील आणि त्वचा सुंदर होईल. आठवड्यातून तीन वेळा अंघोळीच्या पाण्यात कडुलिंब टाकून अंघोळ केल्यास त्वचा स्वच्छ होईल.
अंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस टाकून अंघोळ करावी. यामुळे घामाचा वास, शरीरावर चिटकून राहिलेले हानिकारक बॅक्टरीया, शरीराची होणारी जळजळ थांबेल. लिंबाच्या रसात असलेले विटामिन सी त्वचा चमकदार करण्यासाठी मदत करतात. संवेदनशील असलेल्या लोकांनी लिंबाचा वापर करताना काळजीपूर्वक करावा. यामुळे त्वचा काहीवेळ जळजळ करू शकते.
अंड खाल्यामुळे वाढतो खराब कोलेस्ट्रॉलचा धोका! जाणून घ्या दिवसभरात किती अंड्यांचे आहारात सेवन करावे
हळदीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. मात्र त्वचेसंबंधित कोणत्याही समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी हाल;हळदीचा वापर करावा. मांड्यांमध्ये, काखेत किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये घाम साचून राहिल्यानंतर त्वचा अधिक काळी होऊन जाते. अशावेळी काळवंडलेली त्वचा सुधारण्यासाठी हळदीचा लेप त्वचेवर लावून काहीवेळ तसाच ठेवा. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.