अंड खाल्यामुळे वाढतो खराब कोलेस्ट्रॉलचा धोका!
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते.शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. चांगले कोलेस्ट्रॉल आणि खराब कोलेस्ट्रॉल.चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात निरोगी पेशी वाढवतात, पण खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या पूर्णपणे ब्लॉक होऊन जातात. ज्यामुळे कोणत्याही वेळी हार्ट अटॅक किंवा स्टोक येण्याची शक्यता असते. शरीराचे कार्य सुधारण्यासाठी नियमित अंड्यांचे सेवन केले जाते. अँड खाल्यामुळे शरीराला योग्य ते कॅल्शियम आणि विटामिन्स मिळतात. पण अंड्याचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढते का? असा प्रश्न अनेकदा सगळ्यांचं पडला असेल. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – iStock)
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात अंड्याचे सेवन केले जाते. अंड खाल्यामुळे स्टॅमिना, ताकद, प्रोटीन, जीवनस्तवे शरीराला मिळतात. याशिवाय वजन वाढवण्यासाठी अनेक लोक नियमित्त ४ किंवा ५ अंड्यांचे सेवन करतात. मात्र खरंच अंड खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत.
अंड्यामध्ये कोलेस्ट्रॉल आढळून येते. विशेषता अंड्याच्या पिवळ्या बल्कमध्ये भरपूर कोलेस्ट्रॉल आढळून येते. एका मोठ्या अंड्यात १८६ मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे नियमित अंड खाल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढत जाते आणि हृदयाचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. अंड खाल्यामुळे शरीराला फायदे होतात, त्यासोबतच शरीराचे नुकसान होण्याची सुद्धा शक्यता असते.
दैनंदिन आहारात तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. अंड्याचे सेवन केल्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत जाते. ज्यामुळे शरीराला हार्ट अटॅक येण्याची जास्त शकता असते. मात्र संशोधनात सांगण्यात आल्यानुसार, आहारातील कोलेस्ट्रॉलचा आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलचा कोणताही थेट संबंध नाही. याशिवाय लिव्हरमध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल शरीराला अन्नपदार्थांमधून मिळत नाही. त्याची शरीरात वाढ स्वतःच होते.
दैनंदिन आहारात अंड्यांचे जास्त सेवन करू नये. आहारात २ पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत. यामुळे पचनावर परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय तुम्ही आठवड्यामध्ये ५ किंवा ६ अंड्यांचे सेवन करू शकता. यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत नाही. मात्र शरीरात कोलेस्ट्रॉलची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे.