तुरटी लावल्यामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा जाणवतो? मग ड्रायनेस टाळण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
त्वचा सुंदर दिसण्यासाठी आणि चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी महिला सतत काहींना काही घरगुती उपाय करत असतात. त्यात प्रामुख्याने वापरला जाणारा पदार्थ तुरटी. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि पिंपल्सच्या डागांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी महिला तुरटीचा वापर करतात. तुरटीचा फेसपॅक किंवा फेसमास्क तयार करून लावला जातो. सोशल तुरटीचा वापर कशा पद्धतीने करावा, याचेसुद्धा अनेक व्हिडिओ शेअर करण्यात आले. महिलांसह पुरुषसुद्धा सुंदर त्वचेसाठी चेहऱ्यावर तुरटी लावतात. मात्र बऱ्याचदा चेहऱ्यावर तुरटी लावल्यानंतर त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज वाटू लागते. तुरटीच्या वापरामुळे त्वचेमधील ओलावा अतिशय कमी होऊन जातो. म्हणूनच आज आम्ही तुरटी लावल्यानंतर चेहऱ्यावर नेमके काय लावावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
तुरटी लावून चेहऱ्यावर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. गुलाब पाण्यात असलेले घटक त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यास मदत करतात. गुलाब पाण्याचा वापर तुम्ही टोनर म्हणून सुद्धा करू शकता. यामध्ये असलेले घटक त्वचा कायम हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. याशिवाय गुलाब पाण्यामुळे त्वचेचे पीएच संतुलित राहते.
तुरटीचा फेसपॅक लावून चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्यावर गुलाब पाणी लावावे. गुलाब पाणी लावून झाल्यानंतर वरून मॉइश्चरायजर लावावे. त्वचेला सूट होईल असे मॉइश्चरायजर वापरावे. त्वचा रखरखीत आणि निर्जीव दिसू लागल्यास मॉइश्चरायजरचा वापर करावा. यामुळे त्वचा कायम हायड्रेट राहते. कोरडी त्वचा सुंदर आणि मुलायम करण्यासाठी मॉइश्चरायजरचा वापर करावा. तेलकट त्वचा असल्यास तुम्ही जेलबेस मॉइश्चरायजर वापरू शकता, तर ड्राय स्किन असल्यास तुम्ही क्रीमबेस मॉइश्चरायजर वापरू शकता.
त्वचेसाठी विटामिन सी अतिशय महत्वाचे आहे. कारण यामुळे चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, काळे डाग, डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. त्वचेला सूट होईल असे विटामिन सी सीरम वापरावे. यामुळे त्वचा हेल्दी राहते. त्वचेवरील डाग, पिंपल्स आणि इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी विटामिन सी सीरमचा वापर करावा.
मानेवर वाढलेला काळेपणा कमी करण्यासाठी ‘या’ दोन घरगुती पदार्थांचा करा वापर, मानेवर येईल ग्लोइंग चमक
त्वचेवर लावले जाणारे सगळ्यात महत्वाचे प्रॉडक्ट म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीन लावल्यामुळे हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते. वर्षाच्या बाराही महिने स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीनचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स कमी होण्यास मदत होते. टॅनिंग आणि सनबर्न टाळण्यासाठी चेहऱ्यावर नियमित सनस्क्रीन लावावे.