Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हृदयाच्या आरोग्यावरही होतो Constipation चा परिणाम? आतड्यांवर सतत ताण आल्याने रक्तदाबात होते वाढ, जाणून घ्या

आतड्यांवर सतत ताण आल्यामुळे रक्तदाबात वाढ होते आणि याशिवाय बद्धकोष्ठतेकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला आहे. बद्धकोष्ठतेचा हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो का जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 11, 2025 | 12:17 PM
बद्धकोष्ठतेचा हृदयावर काय परिणाम होतो (फोटो सौजन्य - iStock)

बद्धकोष्ठतेचा हृदयावर काय परिणाम होतो (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

दीर्घकालीन बद्धकोष्ठता ही केवळ तुमच्या पचनसंस्थेवरच परिणाम करते असे नाही तर ती तुनच्या हृदयावरही दबाव आणू शकते. हे विशेषतः वयोवृध्दांमध्ये किंवा आधीच हृदयरोग असलेल्या व्यक्तींमध्ये आढळून येऊ शकते. म्हणूनच, कोणताही विलंब न करता बद्धकोष्ठतेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

सध्या, मोठ्या संख्येने लोक बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करतात. हे खूपच चिंताजनक आणि लाजिरवाणे असू शकते. बद्धकोष्ठतेची लक्षणे म्हणजे आठवड्यातून तीनपेक्षा कमी मलविसर्जन करणे, कडक, कोरडे मल, मल विसर्जनास त्रास होणे किंवा वेदना होणे, पेट पूर्णपणे रिकामे झाल्यासारखे न वाटणे आणि पोट फुगणे किंवा अस्वस्थता जाणवणे. बद्धकोष्ठतेच्या कारणांमध्ये म्हणजे फायबरयुक्त आहाराचे प्रमाण कमी असणे, पाणी कमी पिणे, शारीरिक हालचालींचा अभाव, काही औषधे (जसे की वेदनाशामक किंवा अँटीडिप्रेसेंट्स), वेळीच मलविसर्जन न करणे आणि थायरॉईड समस्या, मधुमेह किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) यांचा समावेश आहे.

काय सांगतात तज्ज्ञ

तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॅास्पीटलचे जनरल सर्जन डॉ. लक्ष्मण साळवे सांगतात की , लोकांना बद्धकोष्ठतेबद्दल चर्चा करण्यास अनेकदा लाज वाटते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यामध्ये आतड्यांचे नुकसान, मूळव्याध आणि हृदयाचा धोका वाढणे यांचा समावेश आहे. आतड्यांचे आरोग्य आणि हृदयाचे आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. बद्धकोष्ठता ही अनेकदा किरकोळ पचन समस्या म्हणून नाकारली जाते, परंतु ती हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. 

Constipation: बद्धकोष्ठता आहे की नाही कसे ओळखाल? डॉक्टरांनी सांगितलेली लक्षणे ओळखाच

रक्तदाबात धोकादायक वाढ

रक्तदाब अचानक वाढू शकतो

आतड्यांवर सतत ताण आल्याने रक्तदाबात तात्पुरती पण धोकादायक वाढ होऊ शकते. हृदयरोगाचा वैद्यकिय इतिहास असलेल्या लोकांसाठी, यामुळे छातीत दुखणे, एरिथमिया किंवा क्वचित प्रसंगी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. बद्धकोष्ठतेकडे कधीही दुर्लक्ष करू नये, विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये किंवा हृदयरोग असलेल्यांमध्ये ही समस्या गंभीर रुप धारण करु शकते. शौचास ताण देण्याच्या कृतीमुळे छातीवरील दाब वाढतो आणि हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे हे चिंतेचे कारण ठरु शकते.

कशी घ्यावी काळजी 

कोणते पदार्थ खाणे ठरेल फायदेशीर

डॉ. साळवे पुढे सांगतात की, दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी प्या, फळे, भाज्या आणि तृणधान्यांना रोजच्या आहारात समावेश करा. उच्च फायबरयुक्त पदार्थ खा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा. मल रोखून ठेवणे टाळा आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर बद्धकोष्ठता एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली, विशेषतः छातीत दुखणे किंवा थकवा येत असेल, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या, त्याकडे दुर्लक्ष करू नका.

काय आहे परस्परसंबंध

झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत पटेल म्हणाले की, बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्यामध्ये एक परस्परसंबंध आहे. यामुळे केवळ आतड्यांनाच नव्हे तर तुमच्या हृदयालाही त्रास होतो. मलविसर्जन करताना ताण आल्याने छातीवरील दाब वाढू शकतो, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर ताण येऊ शकतो. हृदयरोग असलेल्या लोकांमध्ये, यामुळे गंभीर गुंतागुत देखील होऊ शकते. म्हणून, विलंब न करता बद्धकोष्ठतेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. बध्दकोष्ठतेचा सामना करण्यासाठी हायड्रेटेड रहा, अधिक फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा, जास्त वेळ एका ठिकाणी बसणे टाळा आणि मल रोखून धरु नका. नियमित शारीरिक हालचाली देखील मलविसर्जन क्रिया सुरळीत आणि नियमित राखण्यास मदत करतात.

5 दिवसात बद्धकोष्ठता होईल नष्ट, 6 फळं आतड्यांतून काढतील सडलेला शौच; डॉक्टरांनी सांगितली खाण्याची पद्धत

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Does constipation also affect heart health constant stress on the intestines causes an increase in blood pressure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • blood pressure
  • constipation home remedies
  • heart care tips

संबंधित बातम्या

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर
1

Constipation Home Remedies: बद्धकोष्ठतेमुळे शौच होतेय कडक, ‘या’ भुशाचा करा वापर, पोटातील चिकटलेली घाण त्वरीत येईल बाहेर

उच्च रक्तदाबामुळे महिलांमध्ये वाढतोय heart attack चा धोका! हृद्यासंबंधित आजारापासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी
2

उच्च रक्तदाबामुळे महिलांमध्ये वाढतोय heart attack चा धोका! हृद्यासंबंधित आजारापासून सुटका मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय ठरतील प्रभावी

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP
3

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक, घरगुती उपाय ठरतील प्रभावी
4

छातीमध्ये वारंवार चमक येते? दैनंदिन आयुष्यातील ‘या’ चुकीच्या सवयी शरीरासाठी ठरतील घातक, घरगुती उपाय ठरतील प्रभावी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.