Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्ड ड्रिंकच्या सेवनामुळे आतडे आतून सडतात का? पोट आतड्यांसंबंधित दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

कोल्ड्रिंक आणि तोंडाच्या कर्करोगाचा कोणताही थेट संबंध नाही. पण अतिप्रमाणात कोल्ड्रिंकचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यासोबतच पचनक्रिया मंदावण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 13, 2026 | 07:56 AM
कोल्ड ड्रिंकच्या सेवनामुळे आतडे आतून सडतात का? पोट आतड्यांसंबंधित दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

कोल्ड ड्रिंकच्या सेवनामुळे आतडे आतून सडतात का? पोट आतड्यांसंबंधित दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

कोल्ड्रिंकच्या सेवनामुळे होणारे आजार?
कर्करोग आणि कोल्ड्रिंकचा थेट संबंध?
कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स प्यायल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या?

उन्हाळा असो वा हिवाळा सर्वच ऋतूंमध्ये अतिशय आवडीने कोल्ड्रिंक प्यायले जाते. कडाक्याच्या उन्हाळ्यात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर सगळ्यात आधी कोल्ड्रिंक किंवा एखादे थंड पेय प्यायले जाते. दैनंदिन जीवनात लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कोल्ड्रिंक पिण्याची सवय असते. तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरात अ‍ॅसिडिटी वाढते आणि अपचनाच्या समस्या उद्भवू लागतात. अशावेळी वाढत्या अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी कोल्ड्रिंक किंवा कोणताही सोडा प्यायला जातो. पण नेहमीच सोडा किंवा हानिकारक कोल्ड्रिंकचे सेवन केल्यामुळे आतड्यांसंबंधित समस्या वाढून आरोग्य बिघडते. थंड तापमानापेक्षा कोल्ड ड्रिंक्समधील अतिरिक्त साखर, कार्बोनेशन आणि कृत्रिम घटक शरीराला हानी पोहचवतात.(फोटो सौजन्य – AI)

Fridge Storage Tips: प्रत्येक वस्तू फ्रिजमध्ये ठेवताय? चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर होईल नुकसान

वारंवार कोल्ड्रिंक किंवा सोडा प्यायल्यामुळे पोट आणि आतड्यांसंबंधित आजार होण्याची जास्त शक्यत असते. पोट फुगणे, गॅस, GERD आणि मेटाबॉलिक आजारांचा धोका वाढवतात. त्यामुळे वारंवार कोल्ड्रिंकचे सेवन करू नये. थंड पेयांच्या सेवनामुळे पोट खराब होणे, आतड्यांसंबंधित आजार आणि तोंडाला कर्करोग होतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. कोल्ड्रिंकच्या सेवनामुळे कर्करोग होतो, असे कोणतेही वैद्यकीय पुरावे नाहीत. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

थंड पेयाचे तापमान आणि पचनक्रिया:

कोल्ड्रिंकमधील थंड तापमानामुळे शरीराला हानी पोहचते. याशिवाय एका निरोगी व्यक्तीने कोल्ड्रिंक प्यायल्यास पचनसंस्थेचे कोणतेही मोठे नुकसान होत नाही. पण बाजारात उपलब्ध असलेली विशिष्ट प्रकारच्या थंड पेयांमध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे पोटाच्या आतील स्थराला नक्कीच हानी पोहचू शकते. काही व्यक्तींना जेवणासोबत कोणतेही कोल्ड्रिंक किंवा इतर थंड पेय पिण्याची सवय असते. या सवयींमुळे शरीराची पचनक्रिया मंदावते.

कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स आणि अ‍ॅसिडिटीचा संबध:

सोडा किंवा कार्बन डायऑक्साइडयुक्त पेये पोटाच्या आजारास कारणीभूत ठरतात. ही पेय प्यायल्यानंतर पोट गॅस निर्माण होतो. ज्यामुळे सतत आणि मोठ्या प्रमाणावर करपट ढेकर येणे, पोट जड होणे आणि पोटात अस्वस्थता जाणवणे, क्रॉनिक अ‍ॅसिडिटी, छातीत जळजळ किंवा पचनाच्या विविध समस्या उद्भवतात. यामध्ये असलेल्या अतिरिक्त साखरेमुळे आणि गॅसमुळे पचनाचे आजार होऊ शकतात. नियमित अतिप्रमाणात साखरेचे वापर करून बनवलेल्या पेयांचे सेवन केल्यामुळे आतड्यांमधील चांगल्या आणि वाईट जिवाणूंचा समतोल बिघडून जातो तर काहीवेळा मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते.

Brain Health: तुमच्या शरीरात ‘या’ व्हिटॅमिन्सची कमतरता तर नाही? होऊ शकतो मेदूंचा ‘हा’ गंभीर आजार, संशोधनातून धक्कादायक समोर

कोल्ड ड्रिंक्स आणि तोंडाचा कर्करोगाचा थेट संबंध:

अनेकांच्या मनात कायम हीच भीती असते की, वारंवार कोल्ड्रिंक किंवा इतर पेयांचे सेवन केल्यामुळे तोंडाला कर्करोग होतो. पण कोल्ड ड्रिंक्सचा आणि तोंडाच्या कर्करोगाचा थेट कोणताही संबंध नाही. तोंडाच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे तंबाखूचे अतिसेवन करणे, मावा-गुटखा, सुपारी, धूम्रपान, अति प्रमाणात मद्यपान इत्यादी गोष्टींमुळे तोंडाला कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते. वारंवार कोल्ड्रिंक प्यायल्यामुळे दातांची झीज होणे, दात किडणे आणि हिरड्यांचे आजार होऊन तोंडाच्या समस्या उद्भवू शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोल्ड ड्रिंक प्यायल्याने आतडे आतून सडतात का?

    Ans: नाही, कोल्ड ड्रिंक प्यायल्याने आतडे थेट "सडत" नाहीत. मात्र जास्त प्रमाणात साखर असलेली पेये नियमित घेतल्यास लठ्ठपणा, पचनाच्या समस्या, रक्तातील साखर वाढणे आणि इतर आरोग्य समस्या होण्याचा धोका वाढू शकतो.

  • Que: कोल्ड ड्रिंकमधील साखर शरीरासाठी हानिकारक ठरू शकते का?

    Ans: होय, जास्त साखरेचे सेवन केल्याने वजन वाढणे, इन्सुलिन प्रतिरोध आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

  • Que: कोल्ड ड्रिंक पचन सुधारते का?

    Ans: नाही. कोल्ड ड्रिंक हे पचन सुधारण्यासाठी आवश्यक पेय नाही. उलट काही लोकांमध्ये गॅस आणि अॅसिडिटी वाढू शकते.

Web Title: Does consuming cold drinks cause the intestines to rot from within do not ignore these symptoms related to the stomach and intestines

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 07:56 AM

Topics:  

  • acidity
  • cancer
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Fridge Storage Tips: प्रत्येक वस्तू फ्रिजमध्ये ठेवताय? चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर होईल नुकसान
1

Fridge Storage Tips: प्रत्येक वस्तू फ्रिजमध्ये ठेवताय? चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर होईल नुकसान

Oral  Health: अनेक दिवसांपासून एकच टूथब्रश वापरता? आरोग्यासाठी ठरू शकतो धोकादायक; जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ
2

Oral Health: अनेक दिवसांपासून एकच टूथब्रश वापरता? आरोग्यासाठी ठरू शकतो धोकादायक; जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ

तंबाखूचे धोके माहिती तरीही 10 पैकी 9 जण करतात सेवन, सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
3

तंबाखूचे धोके माहिती तरीही 10 पैकी 9 जण करतात सेवन, सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Cancer Medicine: कॅन्सर रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय, 2 औषधांची वाढवली Price Cap, कसा मिळणार लाभ
4

Cancer Medicine: कॅन्सर रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय, 2 औषधांची वाढवली Price Cap, कसा मिळणार लाभ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.