
पावसाळ्यातील केस कोरडे आणि निस्तेज होतात? मग जास्वंदीच्या फुलांपासून घरीच तयार करा हेअर मास्क
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे वातावरणात थंडावा निर्माण होतो. मात्र या दिवसांमध्ये त्वचा आणि केसांसंबधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्वचा अतिशय तेलकट आणि चिकट होऊन जाते, तर केस पूर्णपणे कोरडे आणि निस्तेज होतात. केसांची काळजी घेण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे शॅम्पू, हेअर मास्क, हेअरन केअर प्रॉडक्ट इत्यादी अनेक गोष्टींचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारत नाही. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी कोणत्याही केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारावी.(फोटो सौजन्य – pinterest)
वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे केस अतिशय कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. अचानक केस तुटणे, सतत केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. केस कोरडे झाल्यानंतर केसांमध्ये अधिक गुंता वाढू लागतो, ज्यामुळे केस विचरतांना वारंवार तुटू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांमधील कोरडेपणा कमी करण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा हेअर मास्क तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने तयार केलेला हेअर मास्क केसांसाठी अतिशय प्रभावी ठरेल.
जास्वंदीची पाने आणि फुले केसांसाठी अतिशय महत्वाची आहेत. यामुळे केसांना योग्य पोषण मिळते. त्यामुळे जास्वंदीच्या पानांचा आणि फुलांचा वापर केसांच्या वाढीसाठी करावा. कोरफड जेल केस आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यामुळे तुमचे केस मॉइश्चराइज होऊ मऊ आणि चमकदार दिसू लागतील. खोबऱ्याच्या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांची वाढ निरोगी होते. केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी दह्याचा वापर करावा.