
फोटो सौजन्य - Social Media
ते म्हणतात ना पहिली भेट ही महत्वाची असते. हे खरं आहे की वधू-वराची पहिली भेट ही आधीच झालेली असते. परंतु, पहिली रात्र ही पहिल्या भेटीसारखीच असते. या रात्रीपासून वधू वरच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात होते. सगळं काही नवीन असतं. अशामध्ये या रात्री चुका होणे सामान्य गोष्ट आहे. परंतु, आपण खबरदारी घेतली पाहिजे. देशात लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. जागोजागी सनईचे सूर कानी पडत आहे. रस्त्याने जोराशोरात लगाच्या वराती जाताना दिसत आहेत. जर तुमचेही यंदा कर्तव्य असेल तर हा लेख संपूर्ण वाचा आणि जरी तुमचा बार यंदाच्या वर्षी उडणार नसेल तरीही हा लेख वाचा. कारण ही रात्र प्रत्येकाच्या नशिबी असते. अशात काही चुका होऊ नये म्हणून काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे.
सर्वप्रथम नव्या जोडीदारांनी एकमेकांच्या आरोग्याची काळजी करता रूममध्ये मेडिकल किट सोबत ठेवा. सकाळपासून वेगवगळ्या रीती रिवाजांना करून थकून जाणे सामान्य गोष्ट आहे. अशामध्ये जर जवळ मेडिकल किट जवळ असेल तर होणारा त्रास कमी करून रात्र खराब करण्यापासून वाचवू शकतो. लग्नाची पहिली रात्र जवळीक साधण्यासाठी असते अशी एक समज बनून गेली आहे. या रात्री शारीरिक संबंध तयार करण्याची इच्छा असणे वाईट नाही, परंतु जर आपला जोडीदार तयार नसेल किंवा त्याला बरं वाटत नसेल तर इंटिमेसीसाठी जबरदस्ती करणे चुकीचे ठरेल. याने तुमच्या प्रति तुमच्या जोडीदाराच्या मनात एक चुकीची प्रतिमा तयार होईल. तर या रात्री जास्त उतावळे होणे टाळा!
लग्नाच्या पहिल्या रात्री कधीही जोडीदाराला त्याच्या भूतकाळाविषयी विचारू नका. जोडीदाराचा भूतकाळ कदाचित तुमच्या वर्तमानाला प्रभावित करेल, त्यामुळे अशा गोष्टी विचारून स्वतःचे नाते खराब करणे टाळा. या रात्री एकमेकांविषयी भरपूर जाणून घ्या पण एकमेकांना एकमेकांच्या भूतकाळापासून लांब ठेवा. तुम्ही स्वतःचा भूतकाळ आणि वर्तमान यामध्ये फरक करू नका. नाते जोडले गेले आहे तर त्याला फुलवण्यावर भर द्या.
जेव्हा एखादे नाते तयार होते तेव्हा आपल्या जोडीदाराचा कुटुंब आपला कुटुंब होतो. दोन्ही कुटुंब एकत्र नांदण्यास सुरु होतात. अशामध्ये दोघांनी एकमेकांच्या कुटुंबाचा आदर करावा. एकमेकांच्या कुटुंबाविषयी चुका सांगणे टाळावेच!