Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toxic Relationship मधून बाहेर पडायला त्रास होतोय का? 5 मंत्र फॉलो कराच, आरामात व्हाल Move On, येणार नाही Ex ची आठवण

Toxic Relationship असे असते ज्यामध्ये प्रेमापेक्षा ताण, संशय आणि भावनिक थकवा जास्त जाणवतो. अशा नात्यात मानसिक शांतता व्यक्ती गमावते. म्हणूनच टॉक्झिक नात्यातून वेळेवर बाहेर पडणे अत्यंत महत्वाचे आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 29, 2025 | 05:59 PM
Toxic Relationship मधून कसे बाहेर पडावे (फोटो सौजन्य - iStock)

Toxic Relationship मधून कसे बाहेर पडावे (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • टॉक्झिक रिलेशनशिप म्हणजे काय 
  • टॉक्झिक नात्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे 
  • ५ मंत्र तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील
जेव्हा नवीन नाते सुरू होते तेव्हा पहिले काही महिने स्वप्नासारखे वाटतात. तुमचा जोडीदार तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेतो आणि तुम्ही हळूहळू प्रेमात पडता. पण कालांतराने, जेव्हा तीच काळजी, आदर आणि प्रयत्न कमी होतात तेव्हा तक्रारी वाढू लागतात. नात्यामध्ये अनादर करणे सुरु होते. हे कधीतरी बदलले या अपेक्षेने मुलगी वा मुलगा या नात्यात राहतात. 

क्षुल्लक गोष्टींवरून भांडणे, नकारात्मकता आणि भावनिक थकवा हे Toxic नात्याचे वैशिष्ट्य बनतात. अशा नात्यातून बाहेर पडणे सोपे नसते, परंतु ते अशक्य नाही. जर तुम्हाला पुढे जाण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल, तर हे पाच मंत्र मदत करू शकतात. वेळीच अशा नात्यातून बाहेर पडलात तर तुमचं भविष्य तुम्ही चांगलं घडवू शकता. बरेचदा एकटेपणा हे या नात्यातून बाहेर न पडण्याचं कारण असतं. पण अशा नात्यात मनावर ओझं घेऊन जगण्यापेक्षा ५ सोप्या गोष्टी तुम्ही करून पहा आणि आयुष्य नक्कीच सुंदर आहे यावर तुमचा विश्वास बसू शकतो. 

स्वतःला दोष देणे थांबवा 

अशा त्रासदायक नात्यातून बाहेर पडल्यानंतर, लोक अनेकदा स्वतःला दोष देतात. ते वारंवार हाच विचार करतात की, त्यांनी हे किंवा ते केले नसते तर कदाचित गोष्टी वेगळ्या असत्या. लक्षात ठेवा, दोन्ही जोडीदार नात्यात जबाबदारी सामायिकरित्या वाटून घेतात आणि तसं नसेल तर ते नातंच चुकीचं आहे. प्रत्येक चूक तुमची नसते, प्रत्येक नात्यात देवाणघेवाण असतेच. स्वतःला क्षमा करणे हे पुढे जाण्याचे पहिले पाऊल आहे. त्यामुळे हे का घडलं याचा विचार न करता आणि स्वतःला दोष न देता पुढे काय करायचं याचा विचार करा

तुमचा जोडीदार Red Flag आहे का? अशा वागण्यातून ओळखा आणि वेळीच सोडवा पिछा

संपर्क पूर्णपणे कमी करा 

वारंवार कॉल करणे, संदेश वाचणे किंवा सोशल मीडियावर स्टॉक करणे यामुळे जखमा पुन्हा ओल्या होतात. जर तुम्हाला खरोखर पुढे जायचे असेल, तर तुमच्या एक्सशी संपूर्णतः संपर्क तोडा आणि समोर आल्यानंतरही कामापुरतंच बोला. हे तुमच्या मनाला हळूहळू त्या व्यक्तीपासून वेगळे होण्यास शिकण्यास मदत करते. कितीही त्यांच्याबद्दल प्रेम वाटत असेल तरी ते तुमच्याशी कसे तुटक वागले होते हे आठवा आणि त्यांनी तुम्हाला कसे फसवले अथवा त्यांच्या वागण्याने कसा त्रास झाला याची आठवण त्यावेळी करा, जेणेकरून तुम्ही पुन्हा फसणार नाही आणि त्यांच्यापासून दूर जाल

तुमच्या भावना दाबू नका  

दुःखी, रागावलेले, निराश किंवा मन रिकामे वाटणे हे अगदी सामान्य आहे. लोकांसमोर तुम्ही कणखर आहात हे दाखविण्यासाठी तुम्ही तुमच्या भावना दाबणे योग्य नाही. विश्वासू मित्राशी बोला, डायरी लिहा किंवा गरज पडल्यास सल्ला घ्या. तुमच्या भावना मोकळ्या झाल्यावरच तुम्हाला हलके वाटेल. तुम्हाला जो काही त्रास होत असेल तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने व्यक्त करा. अजिबात मनात साठवून ठेऊ नका. 

स्वतःवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात करा  

टॉक्झिक रिलेशनशिपमध्ये लोक स्वतःला विसरतात. आता स्वतःची काळजी घेण्याची वेळ आली आहे हे मनाशी पक्कं करा. एक नवीन छंद जोपासा, फिटनेसवर लक्ष केंद्रित करा, प्रवास करा किंवा तुम्हाला आनंद देणारे काहीतरी करा. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता तेव्हा तुमच्या जोडीदाराची आठवण आपोआप कमी होईल.

अत्यंत टॉक्झिक डेटिंग ट्रेंड ठरतोय ब्रेडक्रंबिंग, या संकेतांकडे नका करू दुर्लक्ष

समजून घ्या की एकाकीपण चुकीचे नाही 

बहुतेकदा, लोक फक्त एकटे राहण्याच्या भीतीमुळे वाईट आणि त्रास देणाऱ्या नात्यात राहतात. पण सत्य हे आहे की, अशा नात्यात राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले. एकटेपणा तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची आणि मजबूत होण्याची संधी देतो. हे भविष्यात निरोगी नात्याचा पाया रचते.

टॉक्झिक नात्यातून बाहेर पडणे ही एक प्रक्रिया आहे ज्याला वेळ लागतो. स्वतःवर विश्वास ठेवा आणि छोटी पावले उचलत रहा. हळूहळू, तुम्ही केवळ पुढे जालच नाही तर पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि आनंदी देखील वाटाल.

Web Title: 5 mantras to move on from toxic relationship you will never miss ex partner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • lifestyle news
  • relationship advice
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

सकाळी उठताच पोट फुगल्यासारखं वाटतं? नकळत करताय या 8 मोठ्या चुका; आजपासूनच सुधार आणा नाहीतर महागात पडेल
1

सकाळी उठताच पोट फुगल्यासारखं वाटतं? नकळत करताय या 8 मोठ्या चुका; आजपासूनच सुधार आणा नाहीतर महागात पडेल

डाय-केमिकल्सना करा रामराम! पांढरे केस 7 दिवसांतच नैसर्गिकरित्या होतील काळे, या घरगुती पदार्थांची पेस्ट केसांना लावा
2

डाय-केमिकल्सना करा रामराम! पांढरे केस 7 दिवसांतच नैसर्गिकरित्या होतील काळे, या घरगुती पदार्थांची पेस्ट केसांना लावा

गणितात ‘I Love You’ ला काय म्हणतात? 99% लोकांना माहीतच नाही, योग्य उत्तर तुम्ही ओळखत असाल तर ‘खरे प्रेमी’
3

गणितात ‘I Love You’ ला काय म्हणतात? 99% लोकांना माहीतच नाही, योग्य उत्तर तुम्ही ओळखत असाल तर ‘खरे प्रेमी’

‘मूल होत नाही कमतरता तर स्त्री मध्येच…’, टेस्ट केल्यानंतर सत्य समोर, आजही बाळ होण्यासाठी द्यावी लागते महिलांना परीक्षा
4

‘मूल होत नाही कमतरता तर स्त्री मध्येच…’, टेस्ट केल्यानंतर सत्य समोर, आजही बाळ होण्यासाठी द्यावी लागते महिलांना परीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.