बीट हेअर कलर बनवण्याची सोपी कृती
वय वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. त्यातील प्रामुख्याने दिसून येणारा बदल म्हणजे पांढरे केस. केस पांढरे झाल्यानंतर अनेक महिला ते काळे करण्यासाठी काहींना काही उपाय करत असतात. मात्र वाढलेल्या वयामुळे आणि शरीरात होणाऱ्या बदलांमुळे केस पांढरे दिसू लागतात. केस पांढरे झाल्यानंतर केसांमध्ये सतत खाज येऊ लागते. याशिवाय केसांसंबधित अनेक समस्या सुद्धा वाढू लागतात. पांढरे केस काळे करण्यासाठी महिला आणि पुरुष बाजारात उपलब्ध असलेले हेअर कलर आणून लावतात. मात्र त्यामध्ये असलेल्या केमिकलमुळे केस अधिक पांढरे आणि निस्तेज होऊन जातात. केस पांढरे झाल्यानंतर महिलांचे सौदंर्य कमी होते.(फोटो सौजन्य – iStock)
रात्रभर चेहऱ्यावर मुलतानी माती लावून ठेवल्यास काय होईल? चेहऱ्यावर दिसून येतील ‘हे’ परिणाम
केस पांढरे झाल्यानंतर ते पुन्हा एकदा काळे करण्यासाठी हेअर कलर किंवा हेअर डाय वापरला जातो. हेअर डाय लावल्यानंतर १५ दिवस केस अतिशय सुंदर आणि चमकदार दिसू लागतात. मात्र कालांतराने हळूहळू केसांचा रंग उडून जातो आणि केस पुन्हा एकदा पांढरे होऊन जातात. पांढऱ्या झालेल्या निस्तेज केसांची कोणतीही हेअर स्टाईल केली तरीसुद्धा केसांना हवा तसा लुक येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पांढऱ्या केसांवर हेअर कलर करण्यासाठी बीटच्या रसाचा कशापद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
बीटपासून हेअर कलर बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटचे तुकडे करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून घ्या. नंतर त्यात एक चमचा आवळा पावडर, एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि आल्याचा रस टाकून मिक्स करून घ्या. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण केसांवर लावून २ तास तसाच ठेवून घ्या. यामुळे तुमच्या केसांवर नॅचरल हेअर कलर दिसून येईल. २ तास झाल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे तुमच्या केसांवर चांगला रंग येईल आणि केस अधिक सुंदर आणि उठावदार दिसतील.
चेहऱ्यासह ‘या’ अवयवांना स्क्रबिंग करणे आवश्यक! अन्यथा तारुण्यात येईल म्हातारपण, त्वचा होईल निस्तेज
बीट हेअर मास्कचा वापर केसांसाठी केल्यास केस काळे दिसतील. यासाठी तुम्ही मेहंदीमध्ये बीटचा रस मिक्स करू शकता. यासाठी लाल रंगाच्या कोणत्याही मेहंदीमध्ये बीटचा रस मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात आवळा पावडर आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण केसांवर व्यवस्थित लावून घ्या. मेंहदी २ तास केसांवर ठेवून नंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवा. यामुळे केसांवर नैसर्गिक रंग दिसून येईल.






