मैदा साखरेचा वापर न करता कमीत कमी साहित्यामध्ये बनवा ओट्स खजूर केक
लहान मुलांसह मोठ्यांना केक हा पदार्थ खायला खूप आवडतो. वाढदिवस, लग्नाची अनिव्हर्सरी किंवा इतर कोणत्याही शुभ प्रसंगी केक कापून सेलिब्रेशन केले जाते. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवरचे केक उपलब्ध आहेत. केक खाल्यानंतर पोटही लगेच भरते आणि चवही अतिशय सुंदर लागते. मात्र केक बनवताना मैदा आणि साखरेचा वापर केला जातो. केक बनवताना जास्त प्रमाणात साखर मैद्याचा वापर केला जातो, जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. केकमध्ये मैदा आणि साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढून मधुमेह होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला साखर मैद्याचा वापर न करता ओट्स खजूर केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ओट्स खजूर केक चवीला अतिशय सुंदर लागतो. हा केक मधुमेह असलेले रुग्णसुद्धा खाऊ शकतात. कारण यामध्ये नैसर्गिक गोडवा वाढवण्याचे काम खजूर करतो. चला तर जाणून घेऊया ओट्स खजूर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
साधं पण चवदार असं काही खायचंय? मग सोप्या पद्धतीने घरी बनवा सिंधी स्टाइल दाल पकवान
उपवासाच्या दिवशी पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट ‘रताळ्याचे थालीपीठ’