Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छातीत वाढलेली जळजळ अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करत असाल तर वेळीच व्हा सावध! शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

छातीत वाढणाऱ्या जळजळकडे वारंवार दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू येतात. जाणून घ्या अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 12, 2025 | 05:30 AM
छातीत वाढलेली जळजळ अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करत असाल तर वेळीच व्हा सावध!

छातीत वाढलेली जळजळ अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करत असाल तर वेळीच व्हा सावध!

Follow Us
Follow Us:
  • छातीत वाढलेली जळजळ कोणत्या आजाराचे लक्षण आहे?
  • अन्ननलिकेचा कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात?
  • कॅन्सर झाल्यानंतर पहिल्या स्टेजमध्ये कोणती लक्षणे दिसतात?
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, अपुरी झोप, जंक फूडचे अतिसेवन, मानसीम तणाव इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे कायमच शरीरात ऍसिडिटी वाढते. ऍसिडिटी होणे ही सामान्य समस्या आहे. चुकीच्या वेळी अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात अतिरिक्त पित्त तयार होते, ज्यामुळे उलट्या, मळमळ, पोटात दुखणे, डोके दुखी इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर सुद्धा अतितिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात आणखीनच ऍसिडिटी वाढून आरोग्याला हानी पोहचते. याशिवाय वारंवार होणारी ऍसिडिटी कॅन्सरचे गंभीर लक्षण असू शकते. त्यामुळे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

बद्धकोष्ठतेमुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांमध्ये चिकटलेली घाण होईल साफ

छातीत वाढलेली जळजळ पोटातील अ‍ॅसिड अन्ननलिकेत परत आल्यानंतर होते. अन्ननलिकेची आतील त्वचा पोटाच्या तुलनेत अतिशय नाजूक असते, त्यामुळे त्वचेमध्ये जळजळ वाढणे किंवा वेदना जाणवू लागतात. छातीत वारंवार जळजळ होत असेल तर या स्थितीला गॅस्ट्रो-इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असे म्हणतात. त्यामुळे छातीमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी जीवनशैलीतील बदलांकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. आहारात कमी तेलकट, कमी मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यास ऍसिडिटीवर नियंत्रण मिळवता येईल. तसेच अन्ननलिका किंवा छातीत वाढलेली जळजळ कमी होईल आणि शरीर कायमच निरोगी राहील.

कॅन्सरचा धोका कशामुळे वाढतो?

कॅन्सर झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार घेऊन शरीराची काळजी घ्यावी. शरीरात दीर्घकाळ अ‍ॅसिड रिफ्लक्स होत राहिल्यामुळे अन्ननलिकेतील सेल्सचे गंभीर नुकसान होते. शरीर स्वतःचे संरक्षण करण्यासाठी अन्ननलिकेच्या खालच्या भागातील पेशी बदलण्यास सुरुवात करते, ज्यामुळे ऍसिडिटी सहन होते. या पेशींमध्ये होणाऱ्या बदलांना ‘बॅरेट्स इसोफॅगस’ असे म्हणतात. या स्थितीला कॅन्सरची पहिली स्टेज मानली जाते. बॅरेट्स इसोफॅगस असलेल्या व्यक्तीला कॅन्सर होईलच असे नाही, पण कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

दिवसभरात किती पाण्याचे सेवन करावे? शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना

कॅन्सरच्या कोणत्या लक्षणांकडे वेळीच लक्ष द्यावे?

  • २ ते ३ आठवड्यांपेक्षा जास्त वेळ छातीमध्ये जळजळ होणे
  • अन्नपदार्थ गिळताना छातीमध्ये अडकल्यासारखे वाटते.
  • कोणताही डाएट किंवा व्यायाम न करता वजन झपाट्याने कमी होणे
  • उलटी किंवा विष्ठेमधून रक्त येणे
  • भूक न लागणे आणि रात्री वाढणारा खोकला
  • आवाज बसने किंवा आवाजात जडपणा जाणवणे, इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. अन्यथा कॅन्सर होऊन कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कर्करोग म्हणजे काय?

    Ans: कॅन्सर म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ. हा आजार बरा होण्यासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या विविध उपचारांनी शक्य आहे.

  • Que: अन्ननलिकेचा कर्करोग म्हणजे काय?

    Ans: हा कर्करोग अन्ननलिकेमध्ये विकसित होतो, जी घसा आणि पोट यांना जोडणारी नळी आहे.

  • Que: लक्षणे कोणती आहेत?

    Ans: गिळताना त्रास होणे किंवा अन्न अडकल्यासारखे वाटणे.छातीत दुखणे किंवा जळजळ होणे.

Web Title: Dont even accidentally ignore these symptoms in the body esophageal cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • cancer risks
  • Digestion Problem
  • gut health

संबंधित बातम्या

चिकन-मटण खाऊन पोट डबडबीत झाले आहे? आतड्यांमध्ये चिकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
1

चिकन-मटण खाऊन पोट डबडबीत झाले आहे? आतड्यांमध्ये चिकलेली घाण स्वच्छ करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
2

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? उपाशी पोटी ‘या’ पद्धतीने करा आल्याचे सेवन
3

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे अपचनाचा त्रास वाढला आहे? उपाशी पोटी ‘या’ पद्धतीने करा आल्याचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.