दिवसभरात किती पाण्याचे सेवन करावे? शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर 'या' अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना
शरीराला पाण्याची कायमच आवश्यकता असते. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजारांची लागण होत नाही. दिवसभरात कमीत कमी २ ते ३ लीटर पाणी प्यावे. यासोबतच वेगवेगळ्या फळांच्या रसाचे किंवा शरीराला ऊर्जा देण्याऱ्या घरगुती पेयांचे सेवन करावे. तसेच बाहेर उन्हात काम करण्याऱ्या लोकांनी ३ लीटर पेक्षा जास्त पाणी प्यावे. भरपूर पाण्याचे सेवन केल्यामुळे पचन सुधारण्यासाठी, वजन कमी होते, शरीराला ऊर्जा, त्वचेवरील तेज कायमच टिकून राहते.
दिवसभरात शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन न केल्यामुळे पोटात तीव्र वेदना होतात. तसेच ऍसिडिटी, अपचनाच्या समस्या वाढून संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. पाण्याच्या कमतरतेमुळे किडनी स्टोन किंवा किडनीसंबंधित आजारांची लागण होण्याची शक्यता असते. किडनीमध्ये स्टोन झाल्यानंतर पोटात तीव्र वेदना जाणवू लागतात. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे डोकेदुखीचा त्रास देखील होतो. त्यामुळे नियमित २ ते ३ लीटर पाण्याचे सेवन करावे.
बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर सांध्यांमध्ये वेदना किंवा हाडांमध्ये वाढू लागतात. या वेदना पाण्याच्या कमतरतेमुळे होण्याची शक्यता असते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हाडे आणि स्नायूंचे आरोग्य बाधित होते, ज्यामुळे हाडांमध्ये वेदना किंवा मसल्समध्ये वेदना वाढू लागतात. डिहायड्रेशन झाल्यानंतर लघवीमध्ये सुद्धा गंभीर लक्षणे दिसू लागतात.
Ans: शरीरातील प्रत्येक अवयवाच्या आणि पेशीच्या योग्य कार्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.
Ans: दिवसभरात सुमारे २ ते ३ लिटर (सुमारे ८ ग्लास) पाणी प्यावे.
Ans: पाणी उकळणे हा एक प्रभावी मार्ग आहे.






